सेवेत चुका झाल्यावर लक्षात ठेवायचे काही दृष्टीकोन !

अ. परात्पर गुरु डॉक्टर काही वेळा त्यांनी स्वतः केलेले लिखाण मला पडताळण्यासाठी देतात. मी त्यामध्ये काही लहानसहान सुचवले असले, तरी ते साधकांना सांगतात, ‘‘बरे झाले. आता लिखाण अजून परिपूर्ण झाले.’’ ‘सनातनचे कोणतेही कार्य परिपूर्ण व्हायला हवे’, ही त्यांच्यासारखी तळमळ आपणही ठेवली, तर दुसर्‍यांनी आपल्या सेवेत चुका दाखवल्यास आपल्याला वाईट वाटणार नाही. आ. ‘चुकांतून देव आपल्याला … Read more

ईश्वरचरणी कृतज्ञता का व्यक्त करायची ?

‘ईश्‍वराच्या सृष्टीत एक दाणा पेरला, तर त्याचे सहस्रो दाणे मिळतील. जगातील कोणती बँक किंवा ऋणको एवढे व्याज देते ? म्हणून एवढे व्याज देणार्‍या ईश्‍वराला थोडे तरी स्मरा. एवढी तरी कृतज्ञता असू द्या.’

व्यक्तीचे खरे सौंदर्य !

निरागसता हे मनाचे, विवेकता हे बुद्धीचे आणि लीनता हे शुद्ध अहंचे (देहधारणेसाठी आवश्यक असलेल्या न्यूनातिन्यून अहंचे) सौंदर्य आहे.

व्यक्तीला आत्मोन्नत करणारा विकास, हाच खरा विकास !

‘पूर्वीच्या काळी असुर अमरत्वप्राप्तीसारख्या लोभापोटी तप करायचे, तर ऋषिमुनी सृष्टीच्या कल्याणासाठी तप करायचे. आज हिंदुस्थानातील अनेक जण स्वार्थापोटी भ्रष्टाचार करतात, स्वदेशात उच्च शिक्षण घेऊन देशातील गरिबी दूर करण्याऐवजी अधिक पैशांच्या हव्यासापोटी विदेशात नोकरी करतात आणि जल अन् वायू प्रदूषित करणारे कारखाने काढतात. अशासारखी दुष्प्रवृत्ती असणार्‍यांना कर्मफलन्यायानुसार फळ मिळणार, हे ठरलेले आहे. आज शासनकर्ते देशाच्या विकासासाठी … Read more

जागरण करून केलेल्या सेवेपेक्षा सकाळी लवकर उठून केलेली सेवा अधिक फलनिष्पत्तीदायी !

‘दिवसभर श्रम झाल्यामुळे निसर्गतःच रात्री शरीर थकते, तसेच मन आणि बुद्धी हेही थकतात. रात्री वातावरणातील वाईट शक्तींचा संचार अधिक असल्यामुळे मन आणि बुद्धी यांवर त्रासदायक आवरण येण्याची शक्यताही वाढते. त्यामुळे जागरण करून सेवा, विशेषतः बौद्धिक सेवा करतांना सेवेत सुचण्याचे प्रमाण आणि सेवेची गती अल्प होते अन् चुका होण्याची शक्यता वाढते. यामुळे सेवेची फलनिष्पत्ती घटते. जागरणाचे … Read more

प्रतिकूल परिस्थितीला अनुकूल बनवण्यासाठी प्रयत्नशील रहा !

परिस्थिती प्रतिकूल असल्याची कारणे सांगणारा मनुष्य जीवनात कधी यशस्वी होऊ शकत नाही. याउलट प्रतिकूल परिस्थितीला अनुकूल बनवण्यासाठी प्रयत्नशील असणारा मनुष्य जीवनात यशस्वी होतो !

सध्याच्या संकटकाळात अनुभूती येत नाही म्हणून निराश होण्यापेक्षा हिंदु राष्ट्र पहाता येण्यासाठी देवाने जीवित ठेवले आहे, या अनुभूतीविषयी सतत कृतज्ञ रहा !

काही साधकांचे साधनेचे प्रयत्न पूर्वीच्या तुलनेत चांगले चालू असतांनाही त्यांना अनुभूती येत नाहीत; म्हणून ते निराश होतात. देव प्रामुख्याने साधकाची अध्यात्मावरील श्रद्धा वाढण्यासाठी त्याला अनुभूती देत असतो. एखाद्याची अध्यात्मावर श्रद्धा असेलच, तर देव त्याला अनुभूती कशाला देईल ? सध्याच्या संकटकाळात सहाव्या आणि सातव्या पाताळांतील वाईट शक्तींची साधकांवर जीवघेणी आक्रमणे होत असतांनाही गुरूंच्या कृपेमुळे साधक जीवित … Read more

चुका झाल्यावर केवळ क्षमायाचना नको, तर प्रायश्चित्तही घ्यायला हवे !

चुका झाल्यावर क्षमायाचना केल्याने चुकांमुळे निर्माण झालेला मनावरचा ताण घटतो आणि मनाला समाधान लाभते. मनुष्याचे जीवन हे कर्ममय आहे. मनुष्याने केलेल्या प्रत्येक कर्माचे फळ हे त्याला मिळतेच. चुका केल्याने पाप लागते. चुका झाल्यावर केवळ क्षमायाचना केल्याने पाप नष्ट होत नाही; पण प्रायश्‍चित्तही घेतले, तर पापाचे परिमार्जन होण्यास साहाय्य होते.

त्रास असणाऱ्या साधकांनो, त्रासामुळे पुनःपुन्हा होणाऱ्या चुकांमुळे निराश होऊ नका !

‘त्रास असणार्‍या साधकांचे मन आणि बुद्धी यांवर त्रासदायक आवरण सारखे सारखे येतच असते. त्यामुळे बर्‍याचदा अशा साधकांकडून ‘त्याच त्याच चुका पुनःपुन्हा होतात’, असे लक्षात आले आहे. चुका झाल्यावर त्याविषयी सतर्क होऊन चुका होऊ नयेत, यासाठी उपाययोजना काढूनही परत परत त्याच त्याच चुका झाल्यामुळे साधकांना निराशा येते. अशा चुका होण्यामागील मुख्य कारण ‘मन आणि बुद्धी यांवर … Read more

हे आदिशक्ति, ‘हिंदु राष्ट्र’ स्थापण्यासाठी आम्हाला बळ दे !

‘अफझलखानरूपी नराधमाला वधण्यासाठी जशी तू शिवछत्रपतींच्या तलवारीचे तेज बनलीस, तसे भ्रष्टाचार, बलात्कार, धर्मांधता, जात्यंधता, गोहत्या आदी राष्ट्रद्रोही अन् धर्मद्रोही प्रवृत्तींच्या विरोधात संघटित होण्यासाठी आम्हालाही तेज दे ! हिंदु धर्माची कीर्ती जगभर पसरवण्यासाठी जशी तू स्वामी विवेकानंदांच्या पाठीशी राहिलीस, तसे हिंदु धर्म आणि साधना यांचा जगद्व्यापी प्रचार करण्यासाठी आमचीही स्वामिनी बन !! स्वातंत्र्यवीर सावरकरांनी बालवयातच देशाच्या … Read more