सध्याच्या संकटकाळात अनुभूती येत नाही म्हणून निराश होण्यापेक्षा हिंदु राष्ट्र पहाता येण्यासाठी देवाने जीवित ठेवले आहे, या अनुभूतीविषयी सतत कृतज्ञ रहा !

काही साधकांचे साधनेचे प्रयत्न पूर्वीच्या तुलनेत चांगले चालू असतांनाही त्यांना अनुभूती येत नाहीत; म्हणून ते निराश होतात. देव प्रामुख्याने साधकाची अध्यात्मावरील श्रद्धा वाढण्यासाठी त्याला अनुभूती देत असतो. एखाद्याची अध्यात्मावर श्रद्धा असेलच, तर देव त्याला अनुभूती कशाला देईल ?

सध्याच्या संकटकाळात सहाव्या आणि सातव्या पाताळांतील वाईट शक्तींची साधकांवर जीवघेणी आक्रमणे होत असतांनाही गुरूंच्या कृपेमुळे साधक जीवित आहेत. वाईट शक्तींच्या आक्रमणांमुळे साधकांना नानाविध त्रास होत असतांनाही गुरूंच्या कृपेमुळे साधकांकडून राष्ट्र आणि धर्म यांविषयी कार्य होत आहे. हे लक्षात घेऊन साधकांनी अनुभूती येत नाही म्हणून निराश होण्यापेक्षा हिंदु राष्ट्र पहाता येण्यासाठी देवाने जीवित ठेवले आहे आणि तो साधना करवूनही घेत आहे, या अनुभूतीविषयी सतत कृतज्ञ रहायला हवे अन् जोमाने साधना केली पाहिजे.

Leave a Comment