समष्टी जीवनाशी संबंधित त्रासांसंदर्भात उपाय एकच आणि तो म्हणजे प्रतिकूल काळ संपेपर्यंत वाट पहाणे

आतापर्यंत कोणत्याही वाईट गोष्टीच्या संदर्भात आपण शारीरिक, मानसिक कि आध्यात्मिक कारणामुळे त्रास होत आहे, याचा विचार करून त्यानुसार उपाययोजना करत होतो. हे व्यष्टी जीवनाशी संबंधित असते. आता समष्टी जीवनातील आपत्काळ आल्यामुळे अवर्षण, आतंकवाद अशा त्रासांना सामोरे जावे लागत आहे. पुढे जागतिक महायुद्धही होऊन कोट्यवधी मानव मरणार आहेत. व्यष्टी जीवनाशी संबंधित त्रासांसंदर्भात आपण उपाय करतो, तसे … Read more

धर्मशिक्षण न देता, केवळ कायद्याने सुव्यवस्था आणू, असे म्हणणारे राज्यकर्ते मूर्खांच्या नंदनवनात रहात आहेत !

सत्ययुगात कायदेच नव्हते, म्हणजे त्यांची आवश्यकताच नव्हती; कारण प्रत्येक जण नीतीवान होता. त्रेतायुगात थोडेफार कायदे होते; पण त्यांची आवश्यकता फारच अल्प होती. द्वापरयुगापासून कलियुगापर्यंत कायद्यांची संख्या वाढत गेली आहे. प्रत्यक्षात कितीही कायदे केले आणि कायद्यांनुसार कितीही कडक शिक्षा केल्या, तरी त्यांचा गुन्हेगारांवर काहीही परिणाम होत नाही, हे पुनःपुन्हा तेच गुन्हे करणार्‍यांवरून सिद्ध झाले आहे. धर्मशिक्षणाच्या … Read more

सौंदर्य वर्धनालयात (ब्युटीपार्लरमध्ये) जाणार्‍यांनो, हे लक्षात घ्या !

१. सौंदर्य वर्धनालयात जाणे म्हणजे स्थूलदेहात अडकणे आणि दुसर्‍यांनी आपल्याला सुंदर म्हणावे, अशी बहिर्मुखता निर्माण होणे २. मनोरुग्ण स्थूलदेहात अडकू नयेत; म्हणून मी माझ्या चिकित्सालयात Beautiparlour for Mind म्हणजे मनाचे सौंदर्य वर्धनालय असा फलक लावला होता. ३. उपचारामुळे स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन झाले की, व्यक्तीचे स्वतःच्या चेहर्‍याकडे विशेष लक्ष जात नाही. ४. भावामुळे सौंदर्य … Read more

कोणता जयघोष कधी करावा ?

१. लढ्याचा आरंभ होतांना आणि चालू असतांना : हर हर महादेव । २. लढा जिंकल्यावर : जयतु जयतु हिंदू राष्ट्रम् । या सूचनेत प्रसंगानुसार पालट करता येईल.- डॉ. आठवले (३१.१२.२०१३)

व्यक्तीस्वातंत्र्यामुळे होणारी हानी

१. व्यक्तीस्वातंत्र्यामुळे व्यक्तीची (व्यष्टीची) होणारी धूळधाण ! : व्यक्तीस्वातंत्र्यामुळे सुखलोलुपता, स्वैराचार इत्यादी सर्व वाढतात आणि इच्छा पूर्ण न झाल्यामुळे व्यक्ती अधिकाधिक दुःखी होते. याउलट सर्वस्वाचा त्याग आणि साधना करणार्‍यांना तात्कालिक सुख नाही, तर चिरंतन आनंदाची, म्हणजे परमात्म्याची प्राप्ती होते. २. व्यक्तीस्वातंत्र्यामुळे राष्ट्राची (समष्टीची) झालेली वाताहत ! : व्यक्तीपेक्षा समाज आणि समाजापेक्षा राष्ट्र मोठे, हे न … Read more

कधी साध्या गोष्टीही लक्षात न येणे

गेले ४ – ५ महिने मी तोंडाला अतिशय कोरड पडते, या त्रासासाठी डॉक्टर आणि वैद्य यांचे उपाय केले. तेव्हा लिमलेटच्या गोळ्या चघळायचो; पण फरक पडला नाही. कोरड पडते तेव्हा पाणी प्यायला हवे, हे लक्षात यायचे नाही. काल ते लक्षात आले आणि पाणी अधिक प्रमाणात प्यायला लागलो. तेव्हापासून तोंडाला कोरड पडणे कमी झाले. – डॉ. आठवले … Read more

मायेतील सूक्ष्मातील कळणेही निरर्थक असणे

काही जणांना वनस्पती, पशू-पक्षी, इतकेच काय, तर निर्जीव वस्तूही काय बोलतात, हे कळते. ते आयुष्यभर त्यातच रममाण होतात. हा झाला सिद्धीचा एक प्रकार. मायेतील स्थुलातील कळणे जसे ईश्‍वरप्राप्तीच्या संदर्भात निरर्थक असते, तसेच मायेतील सूक्ष्मातील कळणेही निरर्थक असते. – डॉ. आठवले (चैत्र शुक्ल पक्ष दशमी, कलियुग वर्ष ५११५ (२१.४.२०१३))

कुठे पाश्‍चात्त्य विवाह तर कुठे हिंदू विवाह !

१. पाश्‍चात्त्य विवाह : हा केवळ शारीरिक स्तरावरचा असतो; म्हणून त्यामुळे पती-पत्नीला एकमेकाचा मानसिक आधार मिळत नाही. त्यामुळे मनावर ताण येऊन त्यांना मनोविकारतज्ञांकडे जावे लागते. २. हिंदु विवाह : हा शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक या तिन्ही स्तरांवर आधार देणारा आहे. आध्यात्मिक स्तरावर दोघांनी एकमेकांना साहाय्य करून सप्तलोक पार करून मोक्षाला जायचे असते. यासाठीच सप्तपदी असते.- … Read more

साधनेतील कठीणता

म्हातारपणी किंवा थकवा आल्यावर पाऊल उचलून उंबरठ्यावरून पुढे जाणे कठीण होते (हे मी अनुभवतो.), तर एकेका लोकात पावले टाकून पुढच्या पुढच्या लोकांत जाऊन सप्तलोकांच्या पलिकडे, म्हणजे निर्गुणात जाणे किती कठीण असेल ! – डॉ. आठवले (चैत्र शुक्ल पक्ष द्वादशी, कलियुग वर्ष ५११५ (२३.४.२०१३))

हल्लीच्या कुटुंबांची केविलवाणी स्थिती !

एकुलता एक मुलगा असला की, वडिलांची सर्व संपत्ती मिळते; पण भावंडांबरोबर कसे रहायचे ? भावंडांचे प्रेम म्हणजे काय ?, हे शिकायला मिळत नाही. पुढे आई-वडिलांचे सर्व उत्तरदायित्वही सांभाळावे लागते. ते नको असल्याने हल्लीची मुले आई-वडिलांना वृद्धाश्रमात पाठवून देतात. साधना केल्यास मुले कृतज्ञतापूर्वक आई-वडिलांचे शेवटपर्यंत सर्व करतात आणि त्यांच्या मुलांसमोरही एक आदर्श ठेवतात. – डॉ. आठवले … Read more