साधना सर्वांना सर्वस्वाचा त्याग करायला शिकविते

‘धर्म त्याग शिकवतो, तर राजकारण स्वार्थ शिकवते; म्हणून भ्रष्टाचार इत्यादी प्रकार वाढत गेले आहेत. यावर एकच उपाय आहे आणि तो म्हणजे सर्वांना सर्वस्वाचा त्याग शिकवणारी साधना शिकवणे !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

राजकारणी आणि साधक यांच्या कार्यातील भेद !

‘राजकारणी समाजात स्वतःच्या लाभासाठी ‘मला मत द्या’, असे सांगतात. याउलट साधक लोकांकडे स्वतःसाठी काही मागत नाहीत, उलट ‘ईश्वरप्राप्तीसाठी साधना करा’, असे सांगतात !’ – (परात्पर गुरु) डॉ. जयंत बाळाजी आठवले

‘पंडित’ कोणाला म्हणावे ?

सत्-असत् जाणणारा आणि ज्याच्यामध्ये विवेकबुद्धी आहे, अशा विवेकी पुरुषाला ‘पंडित’ म्हणतात. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (८.१.२०२२)

अध्यात्मात साधनेचा आरंभ कसा होतो ?

‘अध्यात्मात साधनेचा आरंभ, म्हणजे ‘अ’ (A) असे काही नसते. ज्याच्या त्याच्या पातळीप्रमाणे आणि साधनामार्गाप्रमाणे प्रत्येकाच्या साधनेचा आरंभ होतो.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (२९.१२.२०२१)

हिंदूंच्या दु:स्थितीमागील कारण !

‘मशिदी आणि चर्च यांमध्ये साधना शिकवतात अन् करून घेतात. हिंदूंच्या एकाही देवळात असे करत नसल्यामुळे हिंदूंची स्थिती केविलवाणी झाली आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

देवाचे स्थळ असलेल्या ठिकाणी चुकून पाय लागल्यास लाभही होणे !

सात्त्विक जागा, उदा. देवाचे स्थळ अशा ठिकाणी चुकून पाय लागल्यास, त्या चैतन्यदायी जागेला आपला पाय लागला; म्हणून आपल्याला वाईट वाटते. असे असले, तरी त्या चैतन्यदायी जागेच्या स्पर्शाने आपल्या देहात तेथील देवतेचे तत्त्व संक्रमित होते. हा त्याचा लाभही आहे. असे असले, तरी मुद्दामहून पाय लावू नये. त्यामुळे अधिक हानी होते. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (२६.१.२०२२)

हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात अपेक्षित असलेलला दृष्टीकोन !

‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्यात मी साहाय्य करीन’, असा दृष्टीकोन नको, तर ‘हे माझेच कार्य आहे’, असा दृष्टीकोन हवा ! तसा दृष्टीकोन असल्यास कार्य चांगले होते आणि स्वतःचीही प्रगती होते. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

सध्याच्या काळातील काही सुखलोलूप मनुष्य म्हणजे केवळ ‘देहधारी मनुष्यप्राणी’ !

‘बहुतांश जण आयुष्यातील प्रत्येक कृती करतांना ‘मला यातून अजून सुख कसे मिळेल ?’, यासाठीच धडपड करतात. देवाने इतर प्राण्यांच्या तुलनेत मनुष्याला साधना करून जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त होण्यासाठीचे क्रियमाणकर्म दिले आहे; परंतु ते वापरत नसल्यामुळे त्यांचे जीवन किडा-मुंगीप्रमाणे केवळ स्वतःच्या सुखासाठी जगण्यासारखे झाले आहे. त्यामुळे सध्याच्या काळातील असे मनुष्य म्हणजे ‘देहधारी मनुष्यप्राणी’ झाले आहेत.’ – (परात्पर … Read more

साधनेत स्थुलातील चुका सांगण्याचे महत्त्व !

‘साधनेमध्ये मनाच्या स्तरावर होणारी अयोग्य विचारप्रक्रिया ही अधिक बाधक असते. अंतर्मुखतेच्या अभावामुळे साधकाला स्वतःच्या चुका कळत नाहीत आणि त्या मनाच्या स्तरावरील चुका असल्यामुळे इतरांच्या लक्षात येत नाहीत. ही विचारप्रक्रिया अयोग्य कृतीच्या माध्यमातून व्यक्त होत असते. त्यामुळे या अयोग्य कृतीची जाणीव संबंधिताला करून दिल्यास त्याला त्याच्या अयोग्य विचारप्रक्रियेची जाणीव होण्यास साहाय्य होते, उदा. एका साधकाच्या मनातील … Read more