बुद्धीप्रामाण्यवाद्यांना सूक्ष्मातील विषय समजून घेण्याची जिज्ञासा नसते !

‘आंधळा म्हणतो, ‘दृश्य जग असे काही नाही.’ त्याचप्रमाणे अंधश्रद्धा निर्मूलन समितीवाले आणि बुद्धीप्रामाण्यवादी म्हणतात, ‘सूक्ष्म जग’, भूते इत्यादी काही नाही’; कारण त्यांना सूक्ष्मातील विषय समजून घेण्याची जिज्ञासा नसते आणि त्यांच्यात सूक्ष्म जग अनुभवण्यासाठी जी साधना करावी लागते, ती करण्याची क्षमता नसते !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव … Read more

घरात एकच मूल असण्याचे तोटे !

‘सध्याच्या काळात बर्‍याच कुटुंबांमध्ये एकच मूल असते. त्यामुळे त्याचे सर्व प्रकारचे लाड पुरवले जातात; परंतु असे करतांना पालक त्याच्या स्वभावदोषांकडे डोळेझाक करतात. अशा मुलांना स्वतःच्या वस्तू इतरांना देणे, न्यूनपणा घेऊन इतरांकडे मागणे आणि इतरांनी वापरलेल्या वस्तू वापरणे जमत नाही. पुढे ही मुले हट्टी होतात. त्यांचे प्रबळ झालेले स्वभावदोष त्यांना, कुटुंबियांना आणि समष्टीलाही त्रासदायक ठरतात. याउलट … Read more

गुरुप्राप्तीसाठी लायकी हवी !

‘बहुतेकांना पुष्कळ प्रयत्न करूनही गुरुप्राप्ती होत नाही. याउलट अर्जुनाला काही प्रयत्न न करता श्रीकृष्णासारखा गुरु लाभला, म्हणजे त्याचा आध्यात्मिक स्तर किती उच्च असेल, हे लक्षात येते !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (८.१.२०२२)

श्रीकृष्णाने अर्जुनाला एकदाच सांगितलेली गीता कळणे; पण इतरांना अनेकदा अभ्यासूनही न कळणे !

‘श्रीकृष्णाने अर्जुनाला एकदाच आणि काही श्लोकांतच गीता सांगितली अन् अर्जुनाला ती कळली. यावरून अर्जुनाची क्षमता किती असेल, ते लक्षात येते. आपण गीता अनेकदा वाचूनही आपल्याला ती कळत नाही. त्यामुळे त्यानुसार आचरण करणे, तर दूरचीच गोष्ट झाली !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (८.१.२०२२)

निवडणुकीसाठी उभे रहाणा-या उमेदवारांनो, हे लक्षात घ्या !

‘राष्ट्रप्रेम आणि धर्मप्रेम नसलेल्या उमेदवाराकडून पैसे घेऊन त्याला मते देणार्‍या जनतेचे लोकप्रतिनिधी म्हणून निवडून येण्यापेक्षा ‘ईश्वराने भक्त म्हणून निवडणे अनंत पटींनी महत्त्वाचे आहे’, हे लक्षात घ्या ! ’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

साधना करण्याचे महत्व !

‘जे आध्यात्मिक क्षमता नसल्याने संतांचे ‘संतत्व’ ओळखू शकत नाहीत, त्यांनी संतांना ‘ते संत नाहीत’ असे म्हणणे, हे वैद्यकीय शिक्षण नसणार्‍याने एखाद्या वैद्यांना ‘ते वैद्य नाहीत’, असे म्हणण्यासारखे हास्यास्पद आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (८.१.२०२२)

निवडणूक लढवण्याचे खरे कारण !

‘राष्ट्र आणि धर्म यांसाठी काहीतरी करता यावे; म्हणून कोणी निवडणुकीला उभा रहात नाही, तर स्वतःला मान आणि पैसे मिळावे, यासाठी बहुतेक जण उभे रहातात !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

बुद्धीप्रामाण्यवाद्यांचा अध्यात्माविषयी हास्यास्पद अहंकार !

‘बुद्धीप्रामाण्यवादी वैद्यकीय, अभियांत्रिकी इत्यादी बौद्धिक स्तराच्या विषयांवर आधुनिक वैद्य (डॉक्टर), अभियंते इत्यादींशी वाद घालत नाहीत; मात्र बुद्धीच्या पलीकडील आणि स्वतःला शून्य ज्ञान असलेल्या अध्यात्मशास्त्राविषयी स्वतः सर्वज्ञ असल्याप्रमाणे संतांवर टिका करतात.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

कुठे समष्टी स्तरावर कार्य करणा-या मुंग्या, तर कुठे स्वार्थी मनुष्य !

‘कोठे अन्नपदार्थांचे कण असल्यास त्याला लगेच मुंग्या लागतात. यामध्ये त्यांचे वैशिष्ट्य असते की, त्या कधीच स्वतःसाठी अन्न गोळा करत नाहीत. अन्नकण गोळा करतांना सर्व मिळून ते त्यांच्या वारुळामध्ये घेऊन जातात. एखादी मुंगी तेथेच खात आहे किंवा मुग्यांमध्ये एखाद्या कणासाठी खेचाखेची चालू आहे, असे दिसत नाही. याउलट सर्व प्राण्यांमध्ये ‘बुद्धीमान’ असणारा मनुष्य नेहमी स्वतःचाच विचार करत … Read more

राष्ट्राच्या सर्वांगीण प्रगतीचा मार्ग !

‘ज्यांच्या मनात राष्ट्र आणि धर्म यांच्याविषयी प्रेम आहे अन् जे त्यासाठी काही करतात, त्यांनाच निवडणुकीत मत द्यायचा अधिकार असावा. केवळ त्यानंतर राष्ट्राची सर्वांगांनी प्रगती होईल.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले