लोकांच्या प्रारब्धानुरूप समस्यांवर कायमस्वरूपी उपाययोजना, म्हणजे त्यांना साधना न शिकवता केवळ वरवरची उपाययोजना काढणारे संत !

‘बरेच संत त्यांच्याकडे येणार्‍या भक्तांच्या शारीरिक, मानसिक, कौटुंबिक, आर्थिक यांसारख्या अडचणी सोडवण्यावर भर देतात. वस्तुतः या सर्व समस्या व्यक्तीच्या प्रारब्धानुसार किंवा त्याला असणार्‍या वाईट शक्तींच्या त्रासामुळे होत असतात. त्यावर मूळ उपायोजना म्हणजे संबंधितांनी साधना करणे. संतांनी स्वतःची साधना खर्च करून त्यांच्या भक्तांच्या अडचणी दूर केल्या, तर तो भक्त परावलंबी होतो आणि प्रारब्धभोग भोगण्यासाठी पुन्हा जन्माला येतो. याउलट भक्तांना या जन्मात साधना शिकवली, तर त्यांना या जन्मात शक्य झाले नाही, तरी किमान पुढील २ – ३ जन्मांनंतर तरी ते जीवनमुक्त होतील. हे ते संत लक्षात घेत नाहीत. अशा प्रकारे मानसिक स्तरावर वागल्यामुळे संतांची स्वतःची साधना आणि वेळ दोन्ही वाया जातात.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले (३.१.२०२२)

Leave a Comment