हिंदुस्थानातच राहिलेला हिंदु अंतःकरणाने मात्र गोरा साहेब झालेला असणे

आज भारतियांच्या घराघरातील तेजस्वी शिक्षणाचे, संस्काराचे निर्मळ निर्झर आटून कोरडे ठणठणीत झाले आहेत. हिंदुस्थानात, हिंदु घराण्यात, हिंदु म्हणून जन्मला, हिंदु म्हणून वाढला, हिंदुस्थानातच राहिला असला, तरी आज अंतःकरणाने तो हिंदु, गोरा साहेब झाला आहे.

इंग्रजी शिक्षण आणि आधुनिक पाश्‍चात्त्य प्रणालींचा प्रभाव यांमुळेच भारतात हुंडाबळीच्या घटनांत वाढ होणे

सती आणि हुंडाबळी यांचा संबंध काय ? सतीची घटना १०० वर्षांत एखादीच घडते आणि हुंडाबळी हे प्रकरण इंग्रजी राज्य आणि इंग्रजी शिक्षण आल्यानंतर चालू झाले. इंग्रजी शिक्षणाने निर्माण केलेल्या आधुनिक पाश्‍चात्त्य प्रणालींच्या चैनी, ऐषारामी जीवनाची ओढ, व्यक्तीस्वातंत्र्य, सनातन हिंदु धर्म परंपरा-रुढी-रिवाज यांकडे तुच्छतेने पहाण्याची वृत्ती, मुलींचे वाढते वय (म्हणजे २८ ते ३२ वर्षे किंवा त्यापेक्षा … Read more

‘ख्रिश्चन धर्मात हिंदु धर्मातून ‘अपराध स्वीकारणे’ आणि ‘प्रायश्चित्त’ घेतले आहेत

‘ख्रिश्‍चन धर्मात आमच्या हिंदु धर्मातून ‘अपराध स्वीकारणे’ (कन्फेशन) आणि ‘प्रायश्‍चित्त’ (रिपेंटन्स) घेतले आहेत. ख्रिश्‍चनांच्या ‘अपराध स्वीकारणे’ यामध्ये केवळ मानसिक स्तरावरची शुद्धीच अभिप्रेत आहे. वैदिक धर्मात मानसिक पापनिष्कृती तर आहेच, तसेच व्रताचरणादी काही शास्त्रीय कर्मे आचरावी लागतात.’ – गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (ग्रंथ ‘दिव्यत्वाची शिखरे’, प्रथमावृत्ती : वर्ष २०१०)

हिंदूद्रोह्यांनो, सत्यमेव जयते हे लक्षात ठेवा !

असत्याच्या पायावर कोणताही अन्याय, अविवेक अथवा काहीही टिकू शकत नाही. भलेही त्यामागे सत्ता, संपत्तीचे बळ असो ! काळ हाच सत्याचा संस्थापक आहे आणि असत्याचा विनाशक आहे. – गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (घनगर्जित, मार्च २०१५)

भारताच्या रक्तरंजित फाळणीचे काहीच न वाटणारे भारतीय कवी !

आमचे लेखन, भाषण, चिंतन, स्वप्न, शिंका, भावना असे सगळे अमेरिकन झाले आहे. अमेरिकन संस्कृतीने आमच्या देशाला अंतर्बाह्य व्यापून टाकले आहे. हिरोशिमावर आमचे कवी काव्य करतात ! हिटलरच्या क्रौर्याला आणि संहाराला लाजवणारे हत्याकांड फाळणीच्या प्रसंगी घडले. त्यावर किती काव्ये झाली ? किती नाटके झाली ? व्हिएतनाम, हिरोशिमा आम्हाला जर्जर करते. भारताच्या फाळणीचे ते भयानक प्रसंग मात्र… … Read more

अर्थ आणि काम या पुरुषार्थांवर धर्माचे नियंत्रण असल्याविना समाजोन्नती केवळ अशक्यच !

धर्माचे नियंत्रण नसल्यास मानवाचे गिधाड होणे अर्थ आणि काम पुरुषार्थांवर धर्माचे नियंत्रण अटळ आहे. तेच धर्माचे ध्येय आहे. ते डोळ्यांसमोरून हटले की, माणसाचे गिधाड होते. मग सत्य-असत्य, शुभ-अशुभ, सत्प्रवृत्ती-दुष्प्रवृत्ती, विधी-निषेध यांतील अंतर त्यांच्या लेखी संपून जाते. विधि-निषेधशून्य नागडा स्वार्थ असलेला गिधाडाचा जीवनधर्म समाजाच्या सुधारणा आणि क्रांत्यांच्या मुळाशी असणे अन् त्यामुळे धर्मजीवन पाला-पाचोळ्याप्रमाणे भिरभिरणे प्रत्येक दुर्गुण … Read more

सजीव आणि निर्जीव वस्तूंत स्वतःला पहाणारे, पूर्ण ब्रह्माशी एकरूप झालेले संत

हे मृत्यू, हे नश्वर शरीर हवे तर खुशाल घेऊन जा ! मला त्याची खंत नाही. मी कुठल्याही मूर्त-अमूर्त शरिराने कार्यरत राहू शकतो. या शीतल चंद्रकिरणांना धारण करून मी पृथ्वीवर संचार करीन, पर्वतावरून खळखळणाऱ्या झऱ्याचे, ओढ्या-नाल्याचे वस्त्र पांघरून दिव्य संचार करीन, समुद्राच्या लाटेच्या रूपाने मी नृत्य करीन. मंद वाऱ्याची झुळूक हीच माझी प्रसन्न धुंद पाऊले असतील….. … Read more

आज धर्मरक्षणाकरता स्त्रियांनी सर्वस्व त्यागण्याचा विलक्षण दुर्धर प्रसंग ओढवला आहे !

धर्माकरता केलेला सर्व त्यागच ‘इह’ आणि ‘पर’ जीवन कृतार्थ करतो. स्त्रीची तृप्ती मातृत्वात असली, तरी त्याहीपेक्षा श्रेष्ठतम, परमतृप्ती देणारा स्व-धर्माकरता मातृत्वाचाही त्याग करण्यात, प्रसंगी सर्वस्वाचा होम करण्यात आहे. हे सतीचे वाण आहे. किंबहुना त्याहीपेक्षा दिव्यदाहक आहे. सतीला किमान सरणावरच्या पतीशवाचा तरी आधार असतो. इथे तोही नाही. धर्म ही चीजच मुळी अमूर्त, अदृष्ट आहे. आज धर्मरक्षणाकरता … Read more

सनातन हिंदु संस्कृतीचा विध्वंस करणारे नेहरू चाचा

हिंदु विवाहपद्धती म्हणजे वेश्यावृत्ती आहे, (Hindu marriage is a prostitution.) असे सुभद्रा जोशी या सदस्या विदुषीने संसदभवनामध्ये सर्वांसमोर सांगितले. नेहरू आदींनी त्याला संमती दिली. नेहरूंच्या दहशतीमुळे संसदेमध्ये कुणी काहीही बोलले नाही, विरोध केला नाही. हिंदु कोड बिल संमत झाले ! आपण ईश्वरासारखे सत्ताधीश असल्याचा बेगुमान उन्माद असलेल्या नेहरूंनी हिंदु कोड बिल संमत करून घेतले ! … Read more

कोणालाही न्याय मिळणार नाही, अशी ब्रिटिशांची न्यायदान पद्धत !

स्वार्थाकरता ब्रिटिशांनी मेकॉलेची सदोष शिक्षणपद्धती रूजवली नव्हे, तर ब्रिटिशांची न्यायदान पद्धतीही रुजवली, जिच्यापासून न्याय मिळणे शक्य नव्हते. दुर्दैवाने स्वातंत्र्याची सहा दशके उलटून गेली, तरी तीच न्यायसंस्था आजही भारतात अस्तित्वात आहे. आम्ही न्यायाची अपेक्षा कशी करावी ? याचा विचार आमचा उत्तम (elite) वर्ग का करीत नाही ? गेल्या २५-३० वर्षात भारतात कोणती चांगली घटना घडली आहे … Read more