१५ वर्षांपासून वैद्यकीय उपचार करूनही हातावरील चट्टे न जाणे आणि गोअर्क अन् कापूर एकत्रित करून हाताला लावल्यावर हातावरील चट्टे पूर्णपणे जाणे

KapurGOMUTRAमी माझ्याकडे येऊन सनातनचे सात्त्विक साहित्य घेऊन जाणार्‍यांना नमस्कार करत असे; परंतु आता सात्त्विक साहित्याची उपयुक्तता अनुभवायला आल्यामुळे येणार्‍या व्यक्तीच मला नमस्कार करतात. जळगाव येथील एका गृहस्थांच्या हाताला भाजल्याप्रमाणे चट्टे पडलेले दिसले; म्हणून मी त्यांना त्याविषयी विचारले. ते म्हणाले, गेल्या १५ वर्षांपासून यावर डॉक्टरांचे उपाय चालू आहेत, तरी काहीच फरक पडला नाही. तुमच्याकडे काही औषध आहे का ? मी त्यांना म्हटले, माझ्याकडे काही औषध नाही; पण तुम्ही गोअर्क आणि कापूर एकत्रित करून हाताला लावून पहा. शक्य असल्यास गोमूत्र १ चमचा पोटातही घेऊ शकता ! नंतर त्यांनी गोअर्क आणि कापूर एकत्र करून १ मास हाताला लावले आणि आश्‍चर्य म्हणजे देवाच्या कृपेने त्यांच्या हातावरील चट्टे पूर्णपणे गेले. (हा साधकाचा वैयक्तिक अनुभव आहे. तो सरसकट सर्वांना येईलच, असे नाही. – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

– श्री. लक्ष्मण शिंदे, जळगाव (७.५.२०१६)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात