अलंकारांतील विविध रत्नांचा शरिरावर होणारा परिणाम

दागिन्यांमध्ये निरनिराळ्या प्रकारची रत्ने जडवली जातात. या रत्नांचा शरिरावर होणारा परिणाम, तसेच अलंकारांतील रत्नांप्रती अलंकार परिधान करणार्‍याने कसा भाव ठेवावा, ते या लेखातून जाणून घेऊया.

 

१. सोने, मोती आणि हिरे यांनी बनवलेल्या अलंकारांत आकृष्ट होणार्‍या लहरी

 

अलंकारांचे
प्रकार
आकृष्ट होणार्‍या लहरी
‘एक विद्वान’ यांनी
दिलेले ज्ञान (टीप १)
‘ईश्वरा’ने
दिलेले ज्ञान (टीप २)
१. ‘सुवर्णालंकार तेजतत्त्वयुक्त लहरी तेजतत्त्वयुक्त ईश्वरी लहरी
२. मोत्याचे अलंकार आपतत्त्वाचे प्राबल्य आणि
अंशतः तेजतत्त्वयुक्त लहरी
वायू आणि तेज या तत्त्वांनी
युक्त देवतांच्या लहरी
३. हिर्‍याचे अलंकार पृथ्वी आणि तेज या तत्त्वांनी
युक्त लहरी (टीप ३)
प्रकट शक्ती आणि तेजतत्त्वयुक्त
देवतांच्या लहरी’

 

टीप १ : सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, १६.११.२००७, सकाळी ११.२८
टीप २ : कु. मधुरा भोसले यांच्या माध्यमातून
टीप ३ : हिर्‍यामध्ये तेजतत्त्व आकृष्ट करून ते शक्तीच्या स्तरावर घनीभूत करण्याची क्षमता प्रक्षेपणापेक्षा जास्त असते; परंतु सोने इतर सर्व धातूंच्या तुलनेत सर्वांत जास्त प्रमाणात तेजतत्त्वग्राही आणि तेजतत्त्वप्रक्षेपी आहे.

 

२. दागिन्यांत जडवलेल्या रत्नांचा शरिरावर चांगला परिणाम होणे

‘सोन्या-चांदीच्या दागिन्यांमध्ये वेगवेगळे खडे, हिरा, माणिक, पोवळे, पाचू यांसारखी रत्ने जडवलेली असतात. या रत्नांमुळे शरिराला वेगळे तेज प्राप्त होते. सूर्य, चंद्र आणि इतर ग्रह यांच्यापासून येणारे किरण रत्नांमधून परावर्तित झाल्यामुळे त्याचा शरिरावर चांगला परिणाम होतो. सध्या ही रत्ने कृत्रिमरीत्या बनवून मिळू लागल्याने त्यांचा खरा परिणाम दिसत नाही.’

अ. अलंकारांत जडवलेल्या विविध रत्नांचा शरिरावर होणारा परिणाम

१. माणिक : ‘हे शक्तीदायी असल्याने ते स्थूलदेहाला संरक्षण देऊ शकते.

२. हिरा : हिर्‍यातून प्रक्षेपित होणारे तेज हे प्रवाहातील गतीमानतेत सातत्य राखणारे असल्याने ते अल्प (कमी) कालावधीत स्थूलदेहाची आणि मनोदेहाची शुद्धी करू शकते.

३. पोवळे : हे जास्त प्रमाणात शरिरातील प्राणशक्तीतत्त्वात्मक चेतनेला जागृती देणारे असल्याने ते क्रियाधारकतेचे प्रतीक म्हणून वापरले जाते. याच्या स्पर्शाने कार्यातील उत्तेजनेत वृद्धी होते.

४. मोती : हे आपतत्त्वस्वरूप शीतलरूपी तारकतेचे प्रतीक असल्याने याच्यामुळे जिवाला सतत जागृत चेतनेच्या रूपात सजगता आणि प्रसन्नता प्राप्त होते.

५. पाचू : हे तारकतेचे, म्हणजेच शक्तीरूपी तारकता घनीभूत करून ठेवण्याचे प्रतीक असल्याने अप्रकट शक्तीतत्त्वात सातत्य राखण्यासाठी याचा उपयोग केला जातो.’

– सूक्ष्म जगतातील ‘एक विद्वान’ (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, २७.१२.२००७, दुपारी २.३९)

 

३. अलंकारातील धातू किंवा रत्ने आणि भाव यांचा संबंध

‘अलंकारातील धातू किंवा रत्ने ही पंचतत्त्वांच्या साहाय्याने त्यांच्या अलंकारिक पद्धतीप्रमाणे घडवलेल्या आकृतीबंधाच्या प्रमाणात देवत्वदर्शक लहरी जिवाच्या भावाप्रमाणे ग्रहण करून त्या आवश्यकतेप्रमाणे प्रक्षेपित करतात.

अ. भावाचे महत्त्व : जिवाने कोणत्याही प्रकारचे अलंकार घातले, तरी त्या जिवाचा त्या अलंकाराप्रती भाव असेल, तरच ते अलंकार त्याला त्याच्या भावानुसार देवत्वाच्या माध्यमातून अधिकतम स्तरावर त्या त्या पंचतत्त्वांच्या साहाय्याने लाभ मिळवून देतात.

आ. धातू किंवा रत्ने ही कोणत्या देवतेच्या तत्त्वाशी संबंधित आहेत, यापेक्षा ती ब्रह्मांडातील कोणत्या पंचतत्त्वांशी संबंधित आहेत, हे महत्त्वाचे ठरते.

इ. सोने : सोन्याचा स्पर्श कोणत्याही जिवाच्या अंतःकरणातील त्या त्या देवतेच्या तत्त्वाच्या भावाप्रमाणे त्याला तेजाच्या स्तरावर लाभ करून देतो.

ई. चांदी : हा धातू कार्याचा रजोगुणाच्या आधारे वेग वाढवतो.

उ. मोती : हा त्याला आपाच्या स्तरावर प्रतिसाद देतो.’

– सूक्ष्म जगतातील ‘एक विद्वान’ (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, आषाढ कृष्ण ७, कलियुग वर्ष ५११० (२५.७.२००८), सायं. ६.२०)

 

४. सात्त्विकता आणि चैतन्य प्रदान करणार्‍या सोन्याच्या अलंकारांचे महत्त्व

अ. ‘सुवर्ण हे शरिरातील प्रतिकूल कीटाणूंचा नाश करते. – ब्राह्मणग्रंथ’

आ. सर्व धातूंमध्ये सोने हा सर्वांत सात्त्विक धातू आहे.

इ. सोने हा सात्त्विक आणि चैतन्यमय लहरींचे ग्रहण अन् प्रक्षेपण करणारा धातू : ‘सोने हा धातू सात्त्विक आणि चैतन्यमय लहरींचे ग्रहण अन् तेवढ्याच वेगाने वायूमंडलात प्रक्षेपण करतो. सोने हा धातू तेजतत्त्वरूपी चैतन्यमय लहरींचे संवर्धन करण्यात अग्रेसर आहे.’ यामुळे सोन्याचे अलंकार परिधान करणार्‍या व्यक्तीला सात्त्विकता आणि चैतन्य यांचा लाभ मोठ्या प्रमाणावर होतो.’ – एक विद्वान (सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ ‘एक विद्वान’, या टोपणनावानेही लिखाण करतात, १०.१०.२००५)

ई. सोन्यातून प्रक्षेपित होणार्‍या तेजोमय लहरींमुळे स्त्रीमधील शक्तीतत्त्व कार्यरत होणे : ‘अलंकार सोन्याचे असल्याने, तसेच सोने हा धातू तेजोमय, म्हणजेच तेजतत्त्व प्रदान करणारा असल्याने या धातूतून प्रक्षेपित होणार्‍या तेजोमय लहरींमुळे स्त्रीच्या शरिरातील सूर्यनाडी कार्यरत होऊन तिच्या आधारे स्त्रीमधील शक्तीतत्त्व कार्यरत होऊन संपूर्ण कुटुंबाचे रक्षण करते.’ – एक विद्वान (सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ ‘एक विद्वान’, या नावानेही लिखाण करतात. १७.१२.२००५)

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘अलंकारशास्त्र’

Leave a Comment