गुढीपाडवा २०२३ निमित्त श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचा शुभसंदेश !

श्रीगुरूंना अपेक्षित असलेले रामराज्‍य अंतर्बाह्य अवतरावे, यासाठी साधनेचे प्रयत्न झोकून देऊन करण्‍याचा शुभसंकल्‍प करा ! ‘यंदा २२ मार्च या दिवशी गुढीपाडवा आहे. गुढीपाडवा, म्‍हणजे सृष्‍टीचा निर्मितीदिन ! या नववर्षारंभ दिनाच्‍या निमित्ताने श्रीरामस्‍वरूप सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्‍या चरणी शरण जाऊन साधनेचे प्रयत्न वृद्धींगत करण्‍याचा शुभसंकल्‍प करूया ! त्रेतायुगात प्रभु श्रीरामचंद्रांनी अवतारी कार्य करतांना पितृआज्ञेने … Read more

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा संदेश

भारताच्या इतिहासामध्ये सात्त्विक आणि पराक्रमी राज्यकर्त्यांचा काळ हा ‘सुवर्णकाळ’ म्हणून गणला जातो; पण या इतिहासाची दुसरी बाजू बघितली, तर त्यामध्ये पारतंत्र्याचा, म्हणजेच परकियांनी भारतावर राज्य केल्याचाही इतिहास आहे.

विजयादशमीनिमित्त परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा संदेश

‘विजयादशमी’ हा हिंदूंच्या देवता आणि महापुरुष यांच्या विजयाचा दिवस आहे. ‘आसुरी शक्तींचा पराभव आणि दैवी शक्तींचा विजय’, हा या दिवसाचा इतिहास आहे.

चातुर्मासातील सण, व्रते आणि उत्सव

या लेखात चातुर्मासातील व्रते-सण यांचा उल्लेख थोडक्यात केला आहे. बहुतेक व्रते स्त्रियांनीच करायची आहेत. संसारात येणार्‍या अनेक अडचणींना त्यांना तोंड देता यावे, हा त्यामागील प्रधान हेतू आहे. ‘ऐहिक सुखापेक्षा पारलौकिक सुखाकडे लक्ष द्या, म्हणजेच फलासक्ती न ठेवता कर्म करत रहा’, हा भगवद्गीतेचा संदेशच वेगवेगळ्या प्रकारे सांगितला आहे.

गुरुपौर्णिमेनिमित्त सप्तर्षी यांचा संदेश

पोहायला येत नसलेला मनुष्य समुद्रात बुडू लागल्यावर त्याने त्याला साहाय्य मिळेपर्यंत पाण्यात थोडे तरी हात-पाय मारायला हवेत, म्हणजे क्रियमाण वापरायला हवे.

गुरुपौर्णिमा महोत्सवाला प्रत्यक्ष उपस्थित रहाण्यासाठी अवश्य वाचा

गुरुपौर्णिमा म्हणजे गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस ! बुधवार, आषाढ पौर्णिमा, कलियुग वर्ष ५१२४ (१३ जुलै २०२२) गुरुपौर्णिमा महोत्सवाला प्रत्यक्ष उपस्थित रहाण्याचे लाभ १. सत् विचारांचे सत्त्वगुणी लोक एकत्र आल्याने तेथील सात्त्विकता आणि चैतन्य वाढलेले असते. या वातावरणात गेल्याने त्याचा लाभ आपल्याला आध्यात्मिक लाभ मिळतो. २. गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुतत्त्व १ सहस्र पटींनी अधिक कार्यरत असते, … Read more

गुरुपौर्णिमेनिमित्त परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचा संदेश (2022)

भारतातही धार्मिक ध्रुवीकरणामुळे सर्वत्र दंगली किंवा प्रचंड हिंसात्मक घटना घडणार आहेत. त्यामुळे सामाजिक असुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होईल. सध्या कोणीही सत्तेवर असले, तरी देशाची स्थिती अराजकसदृश्य होईल. हे अराजक कुठल्याही राजकीय पक्षाला रोखता येणार नाही.

गुरुपौर्णिमेनिमित्त श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ आणि श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचा संदेश (2022)

शिष्याने श्री गुरूंना अपेक्षित धर्मकार्य करणे, हीच खरी गुरुदक्षिणा असते. सध्याचा काळ धर्मसंस्थापनेसाठी, म्हणजेच हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी अनुकूल आहे.