मोठ्या आजारांवरील आयुर्वेदातील औषधे !

Article also available in :

 

१. हृदयविकार

  • हृदरोगावर उपयोगी वनस्पती : बला (चिकणा)
  • हृदरोग, दमा, खोकला यांवर पुष्करमूळाचे चूर्ण मधासमवेत घ्यावे बकुळीच्या फुलांचा हार घालावा, तसेच बकुळीच्या सालीचा काढा प्यावा.
  • अर्जुनाचे चूर्ण दुधात उकळून त्यात तूप आणि साखर घालून घ्यावे. त्यामुळे हृदयातील आग आणि धडधड थांबते.
  • अर्जुन चूर्ण ५ ते १० ग्रॅम, वेलची चूर्ण २४० मिलिग्रॅम दूध पाव लिटर, पाणी पाव लिटर घेऊन पाणी आटून जाईपर्यंत उकळावे. १ वर्षभर प्रतिदिन सकाळी घ्यावे.

 

२. हृदयशूल

  • मृगशृंगभस्म २४० मिलिग्रॅम तुपाबरोबर घ्यावे आणि वर अर्जुन सिद्ध दूध प्यावे.
  • काश्मरी (शिवण) ही वनस्पती यावर उपयुक्त आहे.

 

३. क्षय (टी.बी.)

  • क्षयातील खोकला आणि थुंकीतून रक्त येणे
  • अर्जुन आणि रक्तचंदन समभाग चूर्ण घेऊन तांदुळाच्या धुवणासह घ्यावे.
  • अर्जुनाच्या चूर्णाला अडुळसाच्या रसाच्या ७ भावना द्याव्या आणि नंतर तूप, मध आणि साखरेसमवेत द्यावे.

(या व्यतिरीक्त या रोगांवर अनेक औषधे आयुर्वेदात आहे.)

 

४. स्त्रियांचे आजार !

अशोकाचे गर्भाशयावर अधिक प्रभावाने कार्य होते. यामुळे गर्भाशयाची शिथिलता नाहीशी होते. गर्भाशयाचा दाह आणि शूल नाहीसा होतो आणि योनीवाटे अधिक रक्तस्राव होत असल्यास थांबतो. अशोकाचे साल तुटलेले हाड जोडण्यास मदत होते.

अ. पाळीच्या वेळी ओटीपोटात होणार्‍या वेदना

ओव्याचे चूर्ण मुळ्याच्या रसासह घ्यावे.

आ. कष्टार्तव

मासिक पाळीत वेदना होत असल्यास कायफळ ४८० मिलिग्रॅम, केशर ६० मिलिग्रॅम, तीळ ३ ग्रॅम जुन्या गुळामध्ये गोळी बनवून गरम पाण्यासमवेत रात्री घ्यावे.

इ. पाळी येत नसल्यास किंवा पाळी येतांना त्रास होत असल्यास

५०० मिलिग्रॅम ते १ ग्रॅम प्रमाणात रात्री केशर द्यावे.

Leave a Comment