दत्ताची प्रमुख तीर्थक्षेत्रे

Article also available in :

 

दत्त Datta

दत्त

 

१. माहूर : तालुका किनवट, जिल्हा नांदेड, महाराष्ट्र.

२. गिरनार : जुनागडजवळ, सौराष्ट्र. याला १० सहस्त्र पायर्‍या आहेत.

३. कारंजा : श्री नृसिंह सरस्वतींचे जन्मस्थान. लाड-कारंजे हे याचे दुसरे नाव होय. काशीचे ब्रह्मानंद सरस्वती यांनी या स्थानी प्रथम दत्तमंदिर उभारले.

४. औदुंबर : श्री नृसिंह सरस्वतींनी येथे चातुर्मास-निवास केला. हे स्थान महाराष्ट्रातील भिलवडी स्थानकापासून १० कि.मी. अंतरावर कृष्णाकाठी आहे.

५. नरसोबाची वाडी : हे महाराष्ट्रात असून श्री नृसिंह सरस्वती येथे बारा वर्षे राहिले. येथे कृष्णा आणि पंचगंगा या नद्यांचा संगम आहे. हे टेंबेस्वामींचे प्रेरणास्थान आहे.

दत्ताची सर्वच तीर्थक्षेत्रे अत्यंत जागृत आहेत. या तीर्थक्षेत्रांना भेट दिल्यानंतर शक्तीची अनुभूतीकित्येक भक्तांना येते. नरसोबाची वाडी हे स्थान किती जागृत आहे, याची प्रचीती पुढील अनुभूतीवरूनही येते.

वाईट शक्तींच्या त्रासामुळे नृसिंहवाडी येथील दत्तमंदिरात अस्वस्थ वाटणे आणि नंतर अशक्तपणा येऊन डोके दुखणे

मी, माझी पत्नी आणि सासू, आम्ही सांगलीजवळच्या नृसिंहवाडी येथील दत्तमंदिरात गेलो होतो. तेथे काही वेळातच मला अस्वस्थ वाटू लागले. देवाचे दर्शन घेतल्यानंतर प्रदक्षिणा घालत असतांना प्रदक्षिणेच्या संख्येबरोबर माझी अस्वस्थता वाढू लागली. तरीही एक शक्ती मला पुढे ढकलत होती, असे जाणवले. नंतर काही घंटे माझे डोके दुखत होते आणि दिवसभर अशक्तपणाही जाणवला. – एक साधक

(वाईट शक्तीचा त्रास असलेली व्यक्ती नरसोबावाडीसारख्या जागृत स्थानी गेल्यावर तेथील सात्त्विकता वाईट शक्तीला सहन होत नाही आणि त्यामुळे वाईट शक्तीचे प्रकटीकरण होण्यास प्रारंभ होऊ शकतो. साधकाला दत्तमंदिरात गेल्यावर अस्वस्थ वाटू लागणे, हे याचेच लक्षण आहे. तरीही साधकाचा ईश्वराप्रती भाव असल्यास त्याला ईश्वर साहाय्य करतो, हे साधकाला प्रदक्षिणा पूर्ण करण्यात एका चांगल्या शक्तीने साहाय्य केले यावरून लक्षात येते. दत्तस्थानातील चैतन्य आणि वाईट शक्ती यांच्यातील युद्धक्षेत्र म्हणजे साधकाचे शरीर असल्याने, युद्धानंतर त्याचा परिणाम साधकाची प्राणशक्ती अल्प होण्यात झाला. त्यामुळे साधकाला अशक्त वाटणे वगैरे त्रास झाले. – संकलक)

६. गाणगापूर : हे पुणे-रायचुर या मार्गावर कर्नाटकात आहे. येथे भीमा आणि अमरजा या नद्यांचा संगम आहे. येथे श्री नृसिंह सरस्वतींनी तेवीस वर्षे वास्तव्य केले आणि येथेच सर्व कार्य केले. येथूनच त्यांनी श्रीशैल्यास प्रयाण केले.

७. कुरवपूर : कर्नाटक. रायचुरहून मोटारीने पल्लदिनीपर्यंत (कुरगुड्डी) जाता येते. पुढे कृष्णेच्या पाण्यात हे बेट आहे. हे श्रीपाद श्रीवल्लभांचे कार्यस्थान होय.

८. पीठापूर : आंध्रप्रदेश. श्रीपाद श्रीवल्लभांचे जन्मस्थान. टेंबेस्वामींनी ते उजेडात आणले.

९. वाराणसी : येथे नारदघाटावर दत्तात्रेय मठ आहे. श्री नृसिंह सरस्वतींचे वंशज आजही तेथे आहेत. त्यांचे आडनाव काळे होय. पुढे काळे याचा अपभ्रंश कालिया असा झाला. कालिया नावाची बाग आणि गल्ली आजही तेथे आहे.

१०. श्रीशैल्य : भाग्यनगर(हैद्राबाद) जवळ आहे. श्री नृसिंह सरस्वतींनी तेथे गमन केले.

११. भट्टगाव (भडगाव) : हे काठमांडूपासून ३५ कि.मी. अंतरावर आहे.

१२. पांचाळेश्वर : जिल्हा बीड, महाराष्ट्र.

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘दत्त’ भाग १

4 thoughts on “दत्ताची प्रमुख तीर्थक्षेत्रे”

  1. सनातन संस्था यांच्या मना पासून खूप खूप आभार आपल्या कडून खूप छान आणि सुंदर पवित्र माहिती दिली आहे अशी च पूढे पण आम्हाला प्रत्येक सणा ची माहिती व आपली संस्कृती विशे जाणकारी द्यावे

    Reply
  2. आपले लेख वाचायला खूप आवडतात. खरोखरच आपल्या मुळे आध्यात्मिक ज्ञानात खूप भर पडली.

    Reply
  3. सनातनचे सर्व लेखन आध्यात्मिक व आभ्यासपूर्ण असतात. खूप छान माहिती व शिकण्यास मिळते. खूप खूप क्रुतज्ञता

    Reply
  4. प्रत्येक मोबाईल मध्ये सनातन चे पंचांग install पाहिजे. त्या करिता आपण सर्वानी मनापासून काम करायला पाहिजे.

    Reply

Leave a Comment