
‘सध्या संपूर्ण जग आपत्काळाच्या उंबरठ्यावर आहे. युद्ध, नैसर्गिक आपत्ती, कोरोनासारखी रोगराई यांसारख्या विविध माध्यमांतून आपत्काळ कधीही येऊ शकतो. आजवर देवाने आपली साधना होण्यासाठी हा काळ थोपवून धरला आहे; पण तो आज ना उद्या येणारच आहे. या भयंकर आपत्काळात केवळ साधना असेल, तरच आपण टिकू शकतो.
पण केवळ बौद्धिक स्तरावर साधनेचे महत्त्व लक्षात घेऊन साधना करणारे काही साधक श्रद्धेच्या अभावामुळे विकल्प, मायेचे आकर्षण, आर्थिक लोभ किंवा परिस्थिती या कारणांमुळे साधना सोडत आहेत. त्यांना वाटते की, ‘मला साधना कळली आहे. मी बाहेर राहूनही माझी साधना करू शकतो.’ विकल्प असणार्या साधकांनी त्यांच्या मनातील शंकांचे योग्य प्रकारे निरसन करून घ्यावे. मायेचे आकर्षण, आर्थिक लोभ किंवा परिस्थिती यांमुळे साधनेत खंड पडत असल्यास त्याबाबतही मार्गदर्शन घेऊन त्यावर उपाययोजना काढावी. ‘मला साधना कळली’, असे वाटत असले, तरी अंतर्मुखता आणि पुढील टप्प्यांची साधना, हे नियमित इतरांकडूनच शिकावे लागते. त्यांनीही पुढील टप्प्याची साधना शिकण्यावर भर द्यावा.
मनात विकल्प असलेले काहीजण साधनेपासून दूर जातात, तसेच ते इतरांशी नकारात्मक चर्चा करून त्यांच्यात विकल्प निर्माण करतात. याचा गंभीर परिणाम साधक आणि समष्टी कार्य यांवर होतो. यामुळे पापकर्म घडते. साधकानी अशांपासून सावध आणि सतर्क रहावे.
साधकांनो, आपत्काळाची तीव्रता आणि ‘ही साधनेची शेवटची संधी असू शकते’, हे लक्षात घेऊन श्रद्धेच्या बळावर साधनेतील अडथळ्यांवर त्या त्या वेळी मात करा !’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (२२.५.२०२६)
श्रावण मासात अध्यात्मप्रसाराच्या दृष्टीने पुढील प्रयत्न करून गुरुकृपा संपादन करा !
‘सनातन’चे साधक-हितचिंतक यांच्या ‘सोशल मिडिया पोस्ट’संदर्भात सनातन संस्थेची भूमिका !
सनातन संस्थेच्या नावाने येणार्या फसव्या ई मेलपासून सावध रहा !
एखाद्याला प्राणशक्तीवहन उपाय पद्धतीनुसार उपाय शोधून देतांना त्याला होणार्या त्रासाचे कारण शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक...
शाळा आणि महाविद्यालये यांमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धांमध्ये विजेत्या विद्यार्थ्यांना सनातनचे ग्रंथ अन् लघुग्रंथ पारितोषिक...
अर्पणदात्यांनो, गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने धर्मकार्यार्थ धन अर्पण करून गुरुतत्त्वाचा लाभ करून घ्या !