आपत्काळात जीवितरक्षणासाठी करायच्या पूर्वसिद्धता भाग – ६

आपत्काळातून तरून जाण्यासाठी साधना शिकवणारी सनातन संस्था !

भाग ५ वाचण्यासाठी भेट द्या. आपत्काळात जीवितरक्षणासाठी करायच्या पूर्वसिद्धता भाग – ५

 

अखिल मानवजातीला आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी सिद्धता
करण्याविषयी मार्गदर्शन करणारे एकमेव परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले !

आपत्कालीन लेखमालिकेतील या भागात आपण कौटुंबिक स्तरावर लागणार्‍या नित्योपयोगी वस्तूंविषयी जाणून घेणार आहोत. या वस्तू कोणत्या आहेत, ऋतूंप्रमाणे लागणार्‍या वस्तू, संरक्षणासाठी लागणार्‍या वस्तू आदींविषयी या लेखात माहिती देण्यात आली आहे.

 

३. आपत्काळाच्या दृष्टीने दैनंदिन (शारीरिक) स्तरावर करायच्या विविध सिद्धता !

३ उ. कुटुंबासाठी लागणार्‍या नित्योपयोगी वस्तूंची,
तसेच वेळप्रसंगी लागणार्‍या वस्तूंची खरेदी आतापासूनच करावी !

आपत्काळाच्या दृष्टीने कोणकोणत्या वस्तू घरात असाव्यात, हे काही वेळा एकदम सुचत नाही. वाचकांना अशा वस्तूंची खरेदी करणे सोपे जावे, या हेतूने पुढे विविध वस्तूंची सूची दिली आहे. कुटुंबातील सदस्यांची संख्या, त्यांचे वयोमान आणि घरातील खोल्यांची संख्या यांनुसार त्यांतील आवश्यक त्या वस्तू योग्य प्रमाणात खरेदी करून ठेवाव्यात. पुढील वस्तूंव्यतिरिक्त काही वेगळ्या वस्तू सुचल्या, तर त्याही खरेदी कराव्यात.

३ उ १. नेहमी लागणार्‍या वस्तू : दंतमंजन, दाढीचे साहित्य (सामान), केशकर्तनाचे साहित्य, अंघोळीचा आणि कपडे धुण्याचा साबण, कपडे, केसांना लावायचे तेल, कुंकू, आरसा, फणी, कंगवा, ‘नेल कटर’(नखे कापणारे उपकरण), उपनेत्र म्हणजे चष्मा (नेहमीच्या वापरातील चष्मा फुटू शकतो.), इस्त्री (शक्यतो कोळशावर चालणारी), अंथरूण-पांघरूण, केरसुणी, प्रसाधनगृहाच्या स्वच्छतेसाठी लागणारे साहित्य, लेखणी (पेन आणि पेन्सिल), पादत्राणे इत्यादी

(दंतमंजन, स्नानाचा साबण (७ सुगंधांत), केशतेल आणि कुंकू ही सनातनची सात्त्विक उत्पादने उपलब्ध आहेत. – संकलक)

३ उ २. स्वयंपाकघराशी संबंधित वस्तू

गावी म्हणजे पक्कड (वापरात असलेली गावी मोडू शकते.), खलबत्ता, विळीला धार लावण्याचा दगड इत्यादी

३ उ ३. ऋतूंनुसार लागणार्‍या वस्तू

अ. उन्हाळ्यात लागणार्‍या वस्तू

वारा घेण्यासाठी हातपंखा, काळा चष्मा (गॉगल), उन्हात फिरतांना तोंडवळा (चेहरा) आणि मान झाकण्यासाठी बांधायचा मोठा रुमाल (स्कार्फ), टोपी इत्यादी

आ. पावसाळ्यात लागणार्‍या वस्तू : छत्री, ‘रेनकोट’, पावसाळी पादत्राणे इत्यादी

इ. हिवाळ्यात लागणार्‍या वस्तू : ‘स्वेटर’, हातमोजे, पायमोजे, कानटोपी, शाल, मफलर, कांबळे (ब्लँकेट) इत्यादी

३ उ ४. घरात हव्यात अशा वस्तू

अ. घरातील लहान दुरुस्त्यांसाठी उपयुक्त वस्तू

टेकस, चुका, खिळे, हातोडी, पान्हे, पक्कड, ‘स्क्रू ड्रायव्हर’, ‘कटर’, लहान फळी कापण्यासाठी करवत, फळीची कडा घासण्यासाठी ‘पॉलीश पेपर’, कात्री, ‘मीटर टेप’ इत्यादी

आ. शिवणकामाच्या वस्तू : सुई-दोरा, बटणे, कात्री, ‘मेझरिंग टेप’ (कापड मोजण्यासाठी), शिवण यंत्र इत्यादी

इ. उपद्रवी प्राण्यांना प्रतिबंध करणार्‍या वस्तू

डास, उंदीर, ढेकूण, मुंग्या, उवा, लिखा (उवांची अंडी) इत्यादींना प्रतिबंध करणारी औषधे; उंदीर पकडायचा पिंजरा, मच्छरदाणी इत्यादी

ई. घरात अतिरिक्त असाव्यात, अशा वस्तू

अंघोळीची बालदी आणि पाणी अंगावर घेण्यासाठीचा ‘मग’, कपडे भिजवण्यासाठीचा ‘टब’, कपडे धुण्याचा ‘ब्रश’, विजेशी संबंधित वस्तू [विद्युत् दिवे, दंडदीप (ट्यूब्स), विजेची जोडणी करणारी ‘टुपीन’, ‘थ्रीपीन’ प्लग अन् ‘होल्डर’], पायांत घालायच्या ‘स्लीपर’चे पट्टे इत्यादी

उ. अन्य वस्तू

आकाशवाणीवरून देण्यात येणार्‍या शासकीय सूचना ऐकण्यासाठी लहान रेडिओ (ट्रान्झिस्टर) किंवा रेडिओ, किल्लीवर चालणारे घड्याळ, उत्पादनाच्या दिनांकापासून पुढे १० वर्षे चालणारे स्वयंचलित (ऑटोमॅटिक) घड्याळ, भ्रमणभाष प्रभारित करण्यासाठी ‘पोर्टेबल सोलर चार्जर’,‘गॅस लायटर’, वार्‍याने ज्योत न विझणारा ‘लायटर’ (विंडप्रूफ लायटर), मेणबत्ती, सुतळ, सुंभ, कपडे वाळत घालण्यासाठी दोरी, सायकलमध्ये हवा भरण्याचा ‘पंप’, वीजप्रवाह तपासण्यासाठी ‘टेस्टर’ इत्यादी

३ उ ५. रुग्णांसाठी उपयुक्त वस्तू

तापमापक (थर्मोमीटर), अंग शेकण्यासाठी गरम पाण्याची रबरी पिशवी, आयुर्वेदीय गोळ्यांचे चूर्ण करण्यासाठी लहान खलबत्ता, ‘कमोड’ची खुर्ची, डायपर (मल-मूत्र शोषून घेणारे वस्त्र) इत्यादी

३ उ ६. स्वसंरक्षणासाठी उपयुक्त वस्तू

आपत्काळात अराजकासारखी स्थिती किंवा दंगलीसारख्या समस्या उद्भवू शकतात. अशा वेळी समाजकंटकांपासून रक्षण होण्यासाठी या वस्तू उपयोगी पडतील – ‘पॅपर स्प्रे (मिरचीचा अर्क भरलेला लहान फवारा)’, लाठी, दंडसाखळी इत्यादी.

३ उ ७. आध्यात्मिक उपायांसाठीची सात्त्विक उत्पादने

सनातन-निर्मित कुंकू, अत्तर, गोमूत्र-अर्क, उदबत्ती, कापूर, देवतांची चित्रे, देवतांच्या नामजप-पट्टया इत्यादी

आध्यात्मिक उपायांविषयीच्या सविस्तर माहितीसाठी पुढील मार्गिकेला भेट द्या – www.sanatan.org/mr/spiritual-remedies किंवा आध्यात्मिक उपायांविषयी सनातनच्या साधकांकडून जाणून घ्या !

३ उ ८. काही कालावधीसाठी घर सोडून अन्यत्र स्थलांतर करावे लागल्यास उपयुक्त ठरतील, अशा वस्तू

पुरासारख्या प्रसंगी शासकीय सूचना मिळाल्यानंतर काही वेळातच घर सोडावे लागते. अशा वेळी कोणत्या वस्तू समवेत असाव्यात, यांची सर्वसाधारण सूची पुढे दिली आहे. यामुळे ऐन वेळी धावपळ होणार नाही आणि ‘घराबाहेर पडतांना महत्त्वाचे साहित्य घरातच राहिले’, असेही होणार नाही.

अ. सर्व वस्तू भरण्यासाठी भक्कम आणि वाहतुकीस सोपी अशी मोठी पिशवी अन् पाठीवर लावण्याची पिशवी (सॅक)

आ. दंतमंजन, दाढीचे साहित्य, साबण, लहान आरसा, कंगवा, नेहमीच्या वापरातील कपडे, अंथरूण-पांघरूण आणि नियमित घ्यावी लागणारी औषधे

इ. साधारण तीन दिवस पुरेल एवढा सुका खाऊ आणि पिण्याचे पाणी

ई. भ्रमणभाष अन् त्याचा प्रभारक (चार्जर), विद्युत् पेढी (पॉवर बँक) आणि भ्रमणभाष क्रमांक लिहिलेली वही

उ. ‘सेल’वर चालणारी विजेरी आणि मोठा प्रकाशझोत असणारी विद्युत भारित विजेरी

ऊ. मेणबत्त्या आणि वातावरणात दमटपणा असला तरी किंवा पाणी लागले तरी पेटणारी काड्यापेटी

ए. महत्त्वाच्या कागदपत्रांच्या (उदा. शिधापत्रिका, आधारकार्ड, अधिकोशाचे ‘पासबूक’ यांच्या) छायाप्रती किंवा मूळ प्रती आणि ‘एटीएम कार्ड’

ऐ. प्रथमोपचाराचे साहित्य, तसेच नाक आणि तोंड झाकण्यासाठी ‘मास्क’

ओ. जाड दोरी, होकायंत्र आणि सर्वांना सतर्क करण्यासाठी शिटी

औ. आकाशवाणीवरून देण्यात येणार्‍या शासकीय सूचना, वृत्ते इत्यादी ऐकण्यासाठी ‘लहान रेडिओ (ट्रान्झिस्टर)’

अं. आध्यात्मिक उपायांचे साहित्य

३ उ ९. भूकंप, पूर इत्यादी आपत्काळात उपयुक्त ठरतील, अशा वस्तू

अ. तंबू, मोठी ताडपत्री आणि प्लास्टिकचा मोठा जाड कागद

काही वेळा तात्पुरता निवारा म्हणून तंबू उपयोगी ठरतो. घराबाहेर काढून ठेवावे लागलेले साहित्य भिजू नये, यासाठी ताडपत्री, प्लास्टिकचा जाड कागद इत्यादींचा उपयोग होतो.

आ. जीवरक्षक-कवच (लाईफ जॅकेट) आणि लहान नौका (डिंघी बोट)

पूरस्थिती उद्भवू शकणार्‍या ठिकाणी रहात असणार्‍या व्यक्तींसाठी या वस्तू उपयुक्त आहेत. या वस्तू ‘ऑनलाईन’ विकत मिळतात. लहान नौका खरेदी केल्यावर ती चालवण्यासही शिकावे.

इ. ‘गॅस मास्क’ (Gas Mask) आणि ‘पोर्टेबल ऑक्सिजन मास्क टँक’ (Portable Oxygen Mask Tank)

विषारी वायूची गळती झाल्यास ‘गॅस मास्क’ उपयोगी पडतो. याचा वापर करून व्यक्तीला सुरक्षित स्थळी जाण्याचा प्रयत्न करता येतो. ‘पोर्टेबल ऑक्सिजन मास्क टँक’चा उपयोग रुग्णाला तातडीने प्राणवायू देता आल्याने त्याच्या प्राणरक्षणासाठी होऊ शकतो. ‘गॅस मास्क’ आणि ‘पोर्टेबल ऑक्सिजन मास्क टँक’ ‘ऑनलाईन’ विकत मिळतात.

ई. ‘वॉकी-टॉकी’ (Walkie Talkie) आणि ‘हॅम रेडिओ’ (Ham Radio)

या बिनतारी संपर्क यंत्रणा आहेत. दूरभाष आणि भ्रमणभाष यंत्रणा बंद पडल्या, तर प्रशासनाची अनुमती घेऊन ‘वॉकी-टॉकी’ आणि ‘हॅम रेडिओ’ यांचा वापर करता येतो. ‘वॉकी-टॉकी’ आणि ‘हॅम रेडिओ’ यांविषयीची अधिक माहिती जाणकाराकडून घ्यावी.

उ. अन्य वस्तू

कपाळावर लावायची विजेरी (यामुळे दोन्ही हात मोकळे रहातात.), छोटी दुर्बीण, ‘सिग्नलिंग मिरर’ (या लहान आरशाच्या लुकलुकण्यामुळे आपण अडकून पडलेले ठिकाण दूरवरच्या लोकांच्या लक्षात येऊ शकते.), ‘पॅरा कॉर्ड’ (Para Cord – जास्त वजन पेलण्याची क्षमता असलेली दोरी), ‘रेन पाँचो’ (Rain Poncho – टोपी असलेला मोठा ‘रेनकोट’), व्यक्ती संकटात सापडली असता (उदा. भूकंपामुळे ढिगार्‍याखाली सापडली असता) इतरांचे लक्ष वेधून घेण्यासाठी मोठा आवाज करणारी यंत्रणा (Emergency Personal Alarm) आणि ‘थर्मल ब्लँकेट’ (कडाक्याची थंडी असणार्‍या प्रदेशात उपयुक्त)

३ उ १०. लेखमालिकेत अन्यत्र सुचवलेल्या वस्तू

आपत्काळाचा विचार करता अन्नधान्य, पाणी, वीज, प्रवास इत्यादींसंबंधित वस्तूसुद्धा (उदा. धान्यसंरक्षक औषधे, पाण्याची टाकी) खरेदी करून ठेवाव्या लागतात. अशा वस्तूंची नावे लेखांक ५ मध्ये दिली आहेत. आपत्काळात जीवितरक्षणासाठी करायच्या पूर्वसिद्धता भाग – ५

३ उ ११. घरातील वस्तू, उपकरणे इत्यादींच्या दुरुस्तीसाठी लागणारे सुटे भाग घेऊन ठेवणे, तसेच जाणकाराकडून त्या वस्तू, उपकरणे इत्यादींची दुरुस्ती करणेही शिकून घेणे

आपत्काळात घरातील पंखा, नळ, मिश्रक (मिक्सर) यांसारख्या वस्तू बिघडू शकतात. त्यांच्या दुरुस्तीसाठी लागणारे सुटे भाग आपत्काळात बाजारात मिळणे कठीण होईल आणि दुरुस्ती करणारा यंत्रज्ञ (मेकॅनिक) उपलब्ध होणेही कठीण होईल. यासाठी अशा वस्तूंचे सुटे भाग आधीच खरेदी करून ठेवावेत, तसेच त्या वस्तूंची शक्य होईल तेवढी दुरुस्तीही शिकून घ्यावी.

घरातील काही वस्तूंचे सुटे भाग, तसेच त्या वस्तूंच्या ‘दुरुस्तीसंबंधाने काय शिकावे ?’, हे पुढे काही ठिकाणी दिले आहे.

३ उ ११ अ. स्वयंपाकघराशी संबंधित वस्तूंचे सुटे भाग

‘प्रेशर कुकर’ची शिटी आणि ‘गॅस्केट (प्रेशर कुकरचे झाकण घट्ट बसण्यासाठी लावायची रबरी चकती)’, मिश्रकासाठी (‘मिक्सर’साठी) लागणारे ‘कार्बन ब्रश’ (मिश्रकाच्या ‘मोटर’मधील विद्युत् प्रवाहाचा वाहक), स्वयंपाकाच्या ‘गॅस’ची नळी (पाईप) इत्यादी

३ उ ११ आ. प्रकाश देणार्‍या पारंपरिक साधनांचे सुटे भाग

चिमणी (लहान दिवा) आणि कंदील यांची काच, वात, मोड्या (चिमणी आणि कंदील यांची ज्योत लहान-मोठी करण्याची किल्ली) इत्यादी

३ उ ११ इ. विद्युत्जोडणीशी संबंधित वस्तूंचे सुटे भाग

दंडदीपाचा (‘ट्यूबलाईट’चा) ‘स्टार्टर’, ‘इन्सुलेशन टेप (चिकटपट्टी)’, ‘फ्युज वायर आणि फ्युज’, विजेची बटणे, ‘एक्सटेन्शन वायर’, साधी ‘वायर’, छताच्या पंख्याचा ‘रेग्यूलेटर’ इत्यादी.

दंडदीपाचा ‘स्टार्टर’, विजेची बटणे इत्यादी गोष्टी पालटणे; ‘फ्युज वायर’ घालणे इत्यादी गोष्टी शिकून घ्याव्यात.

३ उ ११ ई. नळजोडणीशी संबंधित सुटे भाग

नळ, ‘वॉशर’, ‘टेफलॉन टेप’, नळदुरुस्तीसाठी आवश्यक असणारे पान्हे, ‘एम्-सील (M-seal)’, ‘ग्लू स्टिक’ [ही प्लास्टिकची कांडी वितळवून पाण्याच्या प्लास्टीकच्या नळीला पडलेल्या छिद्रावर लावल्यास ते छिद्र (लिकेज) बंद होऊ शकते.], सायकलच्या जुन्या ‘ट्यूब’च्या कापलेल्या पट्टया (यांचा वापर पाण्याची गळती रोखण्यासाठी करता येतो.), पाण्याच्या नळ्या (पाईप) इत्यादी

३ उ ११ उ. वाहनांशी संबंधित सुटे भाग

आपल्याकडील सायकल, सायकल-रिक्षा, दुचाकी, चारचाकी, बैलगाडी, घोडागाडी इत्यादी वाहनांचे काही सुटे भाग घेऊन ठेवू शकतो, उदा. सायकल असेल, तर टायर, ट्यूब, ‘पंक्चर’ काढण्याचे साहित्य इत्यादी.

आपल्याकडील वाहनांची देखभाल आणि दुरुस्ती करण्यासही शिकून घ्यावे, उदा. सायकल असेल, तर तिचा ‘पंक्चर’ काढणे शिकून घ्यावे.

संकलक : परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले
संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी दैनंदिन स्तरावर सिद्धता करा !’

(प्रस्तुत लेखमालिकेचे सर्वाधिकार (कॉपीराईट) ‘सनातन भारतीय संस्कृती संस्थे’कडे संरक्षित आहेत.)

भाग ७ वाचण्यासाठी भेट द्या. आपत्काळात जीवितरक्षणासाठी करायच्या पूर्वसिद्धता भाग – ७

‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने भारतभर
नियोजित असलेल्या औषधी वनस्पतींच्या लागवडीसाठी साहाय्य करा !

आगामी भीषण काळातील तिसरे महायुद्ध आणि नैसर्गिक आपत्ती यांना तोंड देता येण्याच्या सिद्धतेचा एक भाग म्हणून ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने लवकरात लवकर भारतभर औषधी वनस्पतींची लागवड करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी शेतकरी; मोठे भूखंडधारक; वनस्पतीशास्त्र (बॉटनी), कृषी, तसेच आयुर्वेद या शास्त्रांतील तज्ञ; औषधी वनस्पतींचे ज्ञान असलेले जाणकार अशा अनेकांच्या साहाय्याची आवश्यकता आहे. स्वतःची आवड आणि क्षमता यांनुसार पुढील सेवांमध्ये आपणही हातभार लावू शकता.

१. प्रत्यक्ष लागवडीसंदर्भातील सेवा

भूमीमध्ये औषधी वनस्पतींची लागवड करणे; औषधी वनस्पतींच्या लागवडीसाठी आवश्यक असलेली रोपे बनवणे; लागवडीसाठी भूखंड, मनुष्यबळ किंवा अवजारे उपलब्ध करून देणे; शास्त्रीय पद्धतीने लागवड करवून घेणे; प्रत्यक्ष श्रमदान करणे

२. अन्य सेवा

औषधी वनस्पती ओळखणे; लागवड कशी करावी, याविषयी मार्गदर्शन करणे; तांत्रिक अडचणी सोडवणे; औषधी वनस्पतींच्या लागवडीविषयी माहिती देणारे ग्रंथ किंवा लेखन उपलब्ध करून देणे; शासकीय योजना मिळवण्यास साहाय्य करणे; लागवडीसाठी आर्थिक साहाय्य करणे; वनस्पतींपासून औषधे बनवण्यास साहाय्य करणे

औषधी वनस्पतींच्या लागवडीच्या सेवेत सहभागी होण्यासाठी संपर्क

श्री. विष्णु जाधव, ‘सनातन आश्रम’, २४/बी, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा. पिन – ४०३ ४०१.

भ्रमणभाष क्रमांक : ८२०८५ १४७९१

संगणकीय पत्ता : [email protected]

भावी हिंदु राष्ट्रात आयुर्वेद हीच मुख्य उपचारपद्धत असेल ! त्यासाठीही आतापासूनच औषधी वनस्पतींचे संवर्धन करणे महत्त्वाचे आहे.

Leave a Comment