साधकांनो, काळानुसार साधना म्हणून रामराज्याच्या स्थापनेसाठी ‘श्रीराम जय राम जय जय राम ।’ हा नामजप करा !

Article also available in :

साधकांना सूचना

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. वर्ष १९९९ पासून साधक प्रामुख्याने प्रतिदिन पुढील व्यष्टी साधना करत आहेत.

१ अ. कुलदेवतेचा जप : हा जास्तीतजास्त वेळ करणे. हा जप प्रारब्धाचे त्रास अल्प करण्यास साहाय्य करतो.

१ आ. दत्ताचा जप – श्री गुरुदेव दत्त । : त्रासाच्या तीव्रतेनुसार हा जप ३ ते ९ माळा करणे. हा जप पूर्वजांमुळे होणारा त्रास अल्प करण्यास साहाय्य करतो.

 

२. वर्ष २०१० पासून व्यष्टी साधना करणार्‍यांनी समष्टीसाठी करावयाचा जप

वर्ष २०१० मध्ये ‘काळानुसार समष्टी साधना करणार्‍या साधकांनी ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय ।’ हा जप जास्तीतजास्त वेळ करावा’, असे सांगितले होते.

 

३. वर्ष २०२१ मध्ये ‘निर्विचार’ हा नामजप करण्यास सांगितले होते.

 

४. वर्ष २०२६ च्या महाशिवरात्रीपासून व्यष्टी आणि समष्टी साधना करणार्‍यांनी करावयाचा नामजप

‘आता तिसर्‍या महायुद्धाचा काळ जवळ येणार असल्याने त्यामध्ये आपले रक्षण व्हावे आणि पुढे ‘रामराज्याची स्थापना व्हावी’, यांसाठी ‘श्रीराम जय राम जय जय राम ।’ हा जप कमीतकमी १० माळा आणि जास्तीतजास्त जमेल तितका करावा.

याच बरोबर दिवसातून एकदा रामरक्षा आणि हनुमानचालिसा (हिंदी येणार्‍यांनी) अथवा मारुतीस्तोत्र (मराठी येणार्‍यांनी) त्यांचे अर्थ समजून घेऊन भावपूर्ण पठण करावे.

हा नामजप आता तिसरे महायुद्ध संपून रामराज्याची स्थापना होईपर्यंत करायचा आहे.

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले (३१.१.२०२६)

 

५. महाशिवरात्रीपासून हा नामजप सुरू करण्याचे कारण

स्वतः शिवही नेहमी रामनामाचा जप करतो. त्यामुळे त्याच्या आशीर्वादाने काळानुसार साधना म्हणून हा नामजप सुरू करणार आहोत.’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले (३१.१.२०२६)

 

काही सूचना

१. व्यष्टी साधनेच्या दृष्टीकोनातून नामजप

१ अ. नवीन साधकांसाठी नामजप : नवीन साधकांनी कुलदेवतेचा नामजप किमान १ तास आणि दत्ताचा नामजप पूर्वजांच्या त्रासानुसार ३, ६ किंवा ९ माळा करावा आणि मग उरलेल्या वेळेत श्रीरामाचा नामजप करावा.

१ आ. वाईट शक्तींचा त्रासाच्या निवारणार्थ ‘प्राणशक्तीवहन पद्धतीनुसार’ शोधलेल्या नामजप अथवा आजारासाठी काही विशिष्ट नामजप सांगितलेला असल्यास तो पूर्ण झाल्यावर उरलेल्या वेळेत श्रीरामाचा नामजप करावा.

१ इ. ज्या साधकांना बसून नामजप करणे शक्य नाही, ते येता-जाता अथवा शारीरिक सेवा करतांना हा नामजप करू शकतात. अशा वेळी तो भावपूर्ण होत आहे ना, याकडेही लक्ष द्यावे; मात्र शक्य असेल, तेव्हा १० माळा नामजप बसून करण्याचा प्रयत्न करावा.

२. समष्टी साधनेच्या दृष्टीकोनातून नामजप

जे साधक श्रीकृष्ण अथवा निर्विचार हे नामजप करत होते, त्यांनी तो थांबवून आता केवळ श्रीरामाचा जप करावा.

३. यापूर्वी महर्षींनी सांगितल्यानुसार ‘हरे राम हरे राम राम राम हरे हरे । हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे  हा जप १०८ वेळा करावा.

४. देवघरामध्ये श्रीरामासह हनुमानाचीही पूजा करावी !

‘श्रीराम आणि हनुमान, हे एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याप्रमाणे आहेत. त्यामुळे श्रीरामाच्या उपासनेमध्ये हनुमानाचेही स्थान आहे. श्रीरामरक्षेतही हनुमानाचा उल्लेख आलेलाच आहे. यासाठी देवघरामध्ये श्रीरामाचे चित्र अथवा प्रतिमा असल्यास सोबत हनुमानाचेही चित्र अथवा प्रतिमा ठेवून त्याचीही नियमित पूजा करावी.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (२३.१.२०२६)

Leave a Comment