
‘हिंदूंनो, आपत्काळ जवळ येत चालला आहे. या काळात श्रीराम आणि मारुति यांच्या आशीर्वादाने आपण तरून जाऊ शकतो. या आपत्काळानंतर रामराज्याचीही स्थापना होणार आहे. आपत्काळात स्वतःसह, कुटुंबीय, गाव आणि राष्ट्र यांचे रक्षण व्हावे, तसेच आगामी रामराज्यासाठी उपयुक्त असे रामभक्त निर्माण व्हावेत, या व्यापक उद्देशाने प्रतिदिन एकवेळा श्रीरामरक्षा आणि मारुतिस्तोत्र अथवा हनुमानचालिसा म्हणावी. सोबत स्वतःची नियमित साधनाही चालू ठेवावी. एखाद्या प्रांतात हनुमानाचे अन्य स्तोत्र प्रचलित असल्यास त्याचे पठण करावे. स्तोत्र म्हणतांना त्याचा अधिक परिणाम होण्यासाठी स्तोत्रातील प्रत्येक शब्दाचा अर्थ आणि भावार्थ लक्षात घेऊन ते भावपूर्ण म्हणावे. या दोन देवतांची उपासना करणे, ही काळानुसार साधना आहे.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (२३.१.२०२६)
देवघरामध्ये श्रीरामासह हनुमानाचीही पूजा करावी !

‘श्रीराम आणि हनुमान, हे एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याप्रमाणे आहेत. त्यामुळे श्रीरामाच्या उपासनेमध्ये हनुमानाचेही स्थान आहे. श्रीरामरक्षेतही हनुमानाचा उल्लेख आलेलाच आहे. यासाठी देवघरामध्ये श्रीरामाचे चित्र अथवा प्रतिमा असल्यास सोबत हनुमानाचेही चित्र अथवा प्रतिमा ठेवून त्याचीही नियमित पूजा करावी.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (२३.१.२०२६)
(श्रीरामरक्षा आणि मारुतीस्तोत्र ऐकण्यासाठी भेट द्या : www.Sanatan.org/mr/audio-gallery )
‘Paranoid personality disorder’ या मानसिक विकारावर उपाय म्हणून सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेला नामजप...
श्रावण मासात अध्यात्मप्रसाराच्या दृष्टीने पुढील प्रयत्न करून गुरुकृपा संपादन करा !
‘सनातन’चे साधक-हितचिंतक यांच्या ‘सोशल मिडिया पोस्ट’संदर्भात सनातन संस्थेची भूमिका !
सनातन संस्थेच्या नावाने येणार्या फसव्या ई मेलपासून सावध रहा !
एखाद्याला प्राणशक्तीवहन उपाय पद्धतीनुसार उपाय शोधून देतांना त्याला होणार्या त्रासाचे कारण शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक...
शाळा आणि महाविद्यालये यांमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धांमध्ये विजेत्या विद्यार्थ्यांना सनातनचे ग्रंथ अन् लघुग्रंथ पारितोषिक...