देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमाला रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची सदिच्छा भेट !

रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री आणि भाजपचे नेते श्री. रवींद्र चव्हाण यांनी ७ जुलै या दिवशी सनातनच्या देवद येथील आश्रमाला सदिच्छा भेट दिली.

विनामूल्य आयुर्वेदिक न्यूरो थेरपी वैद्यकीय शिबिरात सहभागी झालेल्या वैद्यांची सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट !

म्हापसा येथे २४ ते ३० जून कालावधीत पार पडलेल्या विनामूल्य आयुर्वेदिक न्यूरो थेरपी वैद्यकीय शिबिरात सामाजिक कर्तव्य म्हणून सेवाभावी वृत्तीने सहभागी झालेल्या वैद्यांनी येथील सनातनच्या आश्रमाला २ जुलै या दिवशी सदिच्छा भेट दिली.

सनातन संस्था ही सर्व संतांनी सांगितलेले ज्ञान संकलित करते ! – रवींद्र प्रभुदेसाई, पितांबरी व्यवस्थापकीय संचालक

सनातन संस्था ही सर्व संतांनी सांगितलेले ज्ञान संकलित करते, असे प्रतिपादन पितांबरी आस्थापनाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. रवींद्र प्रभुदेसाई यांनी केले.

सनातनचा रामनाथी आश्रम हा पृथ्वीवर वैकुंठस्वरूप ! – अधिवक्ता प्रशांत गोरे, अकोला

अधिवक्ता प्रशांत गोरे यांनी त्यांच्या मार्गदर्शनाचा प्रारंभ करतांना विष्णुस्वरूप गुरुमाऊली परात्पर गुरु डॉ. आठवले यांना वंदन करून केला. त्यांच्या मार्गदर्शनात ते म्हणाले, ‘‘सनातनचा रामनाथी आश्रम हा पृथ्वीवर वैकुंठस्वरूप आहे. या वैकुंठाची अनुभूती मी अनेक वेळा घेतली आहे…

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या दैवी शक्तीमुळे हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचेे ध्येय निश्‍चितच साध्य होईल ! – कर्नल अशोक किणी, अध्यक्ष, फेथ फाऊंडेशन, नवी देहली

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या दिशेने चालू असलेली वाटचाल योग्य असल्याची अनुभूती रामनाथी आश्रमात आली. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या दैवी शक्तीमुळे हे ध्येय निश्‍चितच साध्य होईल, याची शाश्‍वती वाटते.

श्रीलंका येथेही एखादा (सनातन) आश्रम असावा ! – कन्हैया दिनेश्‍वरन्

श्रीलंका येथे एखादा आश्रम असावा. तेथे गुरुजींनी (परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी) यावे आणि त्यांच्या वतीने तेथे हिंदूंना धर्मशिक्षण दिले जावे, तसेच हिंदूंमध्ये श्रद्धा निर्माण होण्यासाठी आम्हाला मार्गदर्शन करावे, अशी आमची अपेक्षा आहे…

सनातन संस्थेचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांचा समर्पणभाव शिकण्यासारखा ! – श्री. जितेंद्र ठाकूर, अखिल भारतीय हिंदू महासभा

हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिरे आयोजित केली पाहिजेत. यातून त्यांच्यात राष्ट्रभक्ती, धर्मप्रेम, नेतृत्वगुण निर्माण होतो….

सप्तम ‘अखिल भारतीय हिदू अधिवेशना’ला उपस्थित हिदुत्वनिष्ठांची रामनाथी येथील सनातनच्या आश्रमाला भेट !

अखिल भारतीय हिंदू अधिवेशनात सहभागी झालेल्या हिंदुत्वनिष्ठांनी रामनाथी येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिली आणि येथील कार्याची ओळख करून घेतली.

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या समवेत मी यापुढे नेहमी कार्य करीन ! – स्वामी संवित् सोमगिरीजी महाराज

हिंदु राष्ट्र स्थापनेचे पवित्र कार्य हाती घेतल्याविषयी मी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांना धन्यवाद देतो. हे कार्य मौलिक असल्याने तुमच्यासमवेत मी यापुढे नेहमी कार्य करीन !…

सनातन संस्था ही धर्मजागृती करण्याचे अतिशय चांगले कार्य करत आहे !

सनातन संस्थेचे साधक अतिशय मधुरभाषिक असतात. ते न्यूनतम आवश्यकतांमध्ये जगतात आणि राष्ट्र अन् धर्म यांचे अधिकाधिक कार्य करण्याची कामना करतात. कठीण प्रसंगातही स्वत:चे निरीक्षण करणे, ही अतिशय आश्‍चर्याची गोष्ट मी त्यांच्यात पाहिली आहे.