परात्पर गुरु परशराम पांडे महाराज यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन

परात्पर गुरु पांडे महाराज यांच्यासारख्या बहुविध गुणांनी नटलेल्या आणि चैतन्याने ओतप्रोत भरलेल्या महान विभूतीचा जीवनपट उलगडणे खरेतर अशक्यप्रायच !

भाव, आनंद, चैतन्य आणि ज्ञान यांचे मूर्तीमंत रूप असलेले अन् ‘बोले तैसा चाले, त्याची वंदावी पावले ।’, ही उक्ती सार्थ ठरवणारे एकमेवाद्वितीय महान तपस्वी परात्पर गुरु पांडे महाराज !

परात्पर गुरु पांडे महाराज सनातनच्या कार्याशी काया-वाचा-मनाने पूर्णपणे एकरूप झाले होते. ‘गुरुकार्य गतीने व्हावे’, यासाठी ‘संस्था स्तरावर आणखी काय करता येईल ?’ याविषयी त्यांचे सतत चिंतन चालू असायचे.

त्र्यंबकेश्‍वर ज्योतिर्लिंग

‘दक्षिण काशी’ म्हणून प्रसिद्ध असणा-या नाशिकजवळ ‘त्र्यंंबकेश्वर’ हे ज्योतिर्लिंग आहे. या ज्योतिर्लिंगावर ३ उंचवटे असून ते ब्रह्मा, विष्णु आणि महेश यांचे प्रतीक आहेत. नारायण-नागबळी, त्रिपिंडी श्राद्ध यांसारखे विधी येथे शीघ्र फलदायी होतात.

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी, तर कर्नाटक येथील ‘कुक्के सुब्रह्मण्य’ या जागृत सर्पक्षेत्री सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी केली सर्पपूजा !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांना आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य लाभावे, हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्यातील सर्व अडथळे दूर व्हावेत, सनातनच्या साधकांचे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक त्रास दूर होण्यासह सर्वांचे सर्पदोष दूर व्हावेत, यासाठी भृगु महर्षींच्या आज्ञेनुसार येथील सनातनच्या आश्रमात २६ फेब्रुवारी २०१९ या दिवशी सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी सर्पपूजा केली.

महर्षि मयन यांनी सांगितल्याप्रमाणे सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी रामेश्‍वरम् येथे केलेले परिहार (उपाय) आणि त्या वेळी आलेल्या अनुभूती

‘११.१.२०१९ या दिवशी सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी तमिळनाडूतील रामेश्वरम् येथे विशेष पूजा केली.

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी तमिळनाडूतील उत्तिरकोसमंगै येथील मंदिरात केली पूजा !

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी सनातनच्या सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी ११.१.२०१९ या दिवशी तमिळनाडूतील रामनाथपूरम् जिल्ह्यातील उत्तिरकोसमंगै या गावातील ‘मंगलेश्‍वरी समेत मंगलनाथ स्वामी’ मंदिरात जाऊन विशेष पूजा केली.

इंद्राला लागलेल्या ब्रह्महत्येच्या पातकाचे निवारण करणारा तमिळनाडू येथील ‘पापनासम्’ येथील पापनासनाथ आणि तेथे आलेल्या अनुभूती

१७.१.२०१९ या दिवशी सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी तमिळनाडूतील तिरुनेलवेली जिल्ह्यात असलेल्या ‘पापनासम्’ या तीर्थक्षेत्री जाऊन पूजा केली

भृगु महर्षींनी सांगितल्याप्रमाणे आसाममधील श्री कामाख्यादेवीच्या मंदिरात सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी केला पूजाविधी !

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेतील अडथळे दूर होण्यासाठी, परात्पर गुरु डॉ. आठवले यांना आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य लाभण्यासाठी, तसेच सर्व संत अन् साधक यांच्या रक्षणासाठी श्री कामाख्यादेवीच्या मंदिरात दुपारी १२.३० ते १.१५ या वेळेत होम करण्यात आला.

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी केली तिरुकोष्टीयुर (तमिळनाडू) येथील सौम्य नारायण मंदिरात पूजा !

 ७.१.२०१९ या दिवशी सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी तमिळनाडूतील तिरुकोष्टीयुर येथील सौम्य नारायण मंदिरात जाऊन हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी विशेष पूजा केली.

तिरूचेंदूरू (तमिळनाडू) येथे सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी केली कार्तिकस्वामींची पूजार्चना !

दक्षिण तमिळनाडूतील तूतूकुडी जिल्ह्यातील किनारपट्टीवर ‘तिरूचेंदूरू’ हे गाव आहे. या गावात अगदी समुद्राच्या काठी कार्तिकस्वामींचे मंदिर आहे.