नामजप आणि यज्ञ

१. ‘नामजप आणि मंत्रजप करणे या व्यष्टी साधना आहेत, तर यज्ञ करणे ही समष्टी साधना आहे. २. काही साध्य करण्यासाठी एखाद्याला नामजप अनेक दशके करावा लागतो. याउलट यज्ञ काही सात्त्विक पुरोहितांनी काही तास किंवा दिवस केल्यास २० – २५ किलोमीटर अंतरातील सहस्रो लोकांनाही त्याचा लाभ होतो. ’ – (परात्पर गुरु) डॉ. जयंत बाळाजी आठवले

भारत देशाचे महत्व

पाश्‍चात्त्य देश मायेत पुढे जायला शिकवतात, तर भारत ईश्‍वरप्राप्तीच्या मार्गाने कसे जायचे ते शिकवतो ! -(परात्पर गुरु) डॉ. जयंत बाळाजी आठवले

हिंदु राष्ट्रातील शिक्षणपद्धत कशी असेल ?

हिंदु (ईश्‍वरी) राष्ट्रातील शिक्षणपद्धत कशी असेल ?, असा प्रश्‍न काही जण विचारतात. त्याचे उत्तर आहे, नालंदा आणि तक्षशिला विश्‍वविद्यालयांत ज्याप्रमाणे १४ विद्या आणि ६४ कला शिकवायचे, त्याप्रमाणे शिक्षण दिले जाईल; मात्र त्यांत या माध्यमांतून ईश्‍वरप्राप्ती कशी करायची ?, हेही शिकवले जाईल. -(परात्पर गुरु) डॉ. जयंत बाळाजी आठवले

हिंदु संस्कृती

‘पाश्‍चात्त्य संस्कृती शरीर, मन आणि बुद्धी यांना सुख देण्यासाठी धडपडते, तर हिंदु संस्कृती ईश्‍वरप्राप्तीचा मार्ग दाखवते.’ -(परात्पर गुरु) डॉ. जयंत बाळाजी आठवले

मोक्षप्राप्तीमध्ये सर्वश्रेष्ठ आहे सद्गुरुतत्त्व !

‘आयुर्वेदो अमृतानाम् ।’ म्हणजे ‘अमृतकर अशा गोष्टींमध्ये आयुर्वेद (आयुर्वेदप्रणीत तत्त्वे, पथ्य, नियम, औषधे) श्रेष्ठ आहे.’ त्याचप्रमाणे म्हणावेसे वाटते की, ‘सद्गुरुः मोक्षाय ।’ म्हणजे ‘मोक्षप्राप्तीची साधने, मार्ग अनंत असले, तरी त्यात सर्वश्रेष्ठ आहे ते सद्गुरुतत्त्व !’ (संदर्भ : ‘विश्‍वपंढरी’, फेब्रुवारी २००७)

महिलांना मान देण्याविषयी मनुस्मृतीतील श्लोक

सुवासिनी: कुमारीश्‍च रोगिणो गर्भिणीः स्त्रियः । अतिथिभ्योऽग्र एवैतान् भोजयेदविचारयन् ॥ – मनुस्मृति, अध्याय ३, श्‍लोक ११४ अर्थ : सुवासिनी, कुमारिका, रोगी आणि गर्भवती स्त्रिया यांना अतिथीच्याही आधी भोजन द्यावे.

भावासहीत नामजप पापाचा नाश करते !

‘नामजप जर भावासहीत केला, तर तो आपल्या प्रारब्धाची तीव्रता नष्ट करतो, तसेच त्यामुळे आपले संचित कर्म नष्ट करून आपल्यासाठी मुक्तीचे द्वार उघडतो. यन्नामकीर्तनं भक्त्या विलापनमनुत्तमम् । मैत्रेयाशेषपापानां धातूनामिव पावक: ॥ – विष्णुपुराण, अंश ६, अध्याय ८, श्‍लोक २० अर्थ : जसा अग्नी सुवर्णासारख्या धातूतील मळ जाळून नष्ट करतो, तसेच भक्तीने केलेले भगवंताचे कीर्तन (नाम) सर्व … Read more

आध्यात्मिक क्षेत्रातील लिखाण

‘राजकीय क्षेत्रातील कार्यकर्त्यांचे विषय मायेतील असल्यामुळे त्यांचे लिखाण अधिक काळ टिकत नाही. याउलट आध्यात्मिक क्षेत्रातील लिखाण बराच काळ किंवा युगानुयुगेही टिकते, उदा. वेद, उपनिषदे, पुराणे इत्यादी.’ – (परात्पर गुरु) डॉ. जयंत बाळाजी आठवले

उदासीनता घालवून कार्यप्रवृत्त करणारा आणि राष्ट्रामध्ये नवचैतन्य निर्माण करणारा स्वामी विवेकानंद यांचा आध्यात्मिक संदेश !

‘सद्यःकाळात श्रीकृष्णाने सांगितलेली गीता सिंहगर्जनेने कथन करा ! त्याचे बासरीवादन आणि अन्य लीला सांगून राष्ट्रामध्ये नवचैतन्य निर्माण होत नाही. सांप्रत आपणा सर्वांना आपाद्मस्तक राजसभाव अंगी बाणलेला आदर्श नेता हवा आहे, ज्याच्या नसानसांमधून प्रचंड चैतन्य ओसंडत आहे. असा युवक नेता हवा आहे, ज्याच्या अंगी रणांगणावरील योद्ध्याचा आदेश भरून राहिला आहे. आयुष्याच्या रणभूमीवर सध्या आपणांस लढाऊ, शूर … Read more