राष्ट्रप्रेमी, धर्मप्रेमी आणि साधक यांनी समाजाची दुःस्थिती पाहून निराश न होता तन-मन-धनाने हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या महान कार्यात सहभागी व्हावे !

सध्या दूरचित्रवाहिन्या आणि वृत्तपत्रे यांच्या माध्यमातून समाजाची बिकट स्थिती लक्षात येते. समाजात देवता आणि महापुरुष यांचे विडंबन, आर्थिक घोटाळे, बलात्कार इत्यादी समाज, राष्ट्र आणि धर्म यांवर घाला घालणारे प्रसंग घडत आहेत. अशा वेळी राष्ट्रप्रेमी, धर्मप्रेमी आणि साधक यांना आपण त्यासाठी काहीतरी केले पाहिजे आणि ही स्थिती पालटायला पाहिजे, असे वाटते; पण नेमकेपणाने त्यासाठी काय करायला पाहिजे ?, ते त्यांना कळत नाही. त्यामुळे त्यांना चीड येते आणि अस्वस्थ वाटू लागते. राष्ट्र आणि धर्म यांची दुःस्थिती तर डोळ्यांसमोर दिसते आणि आपण काहीच करू शकत नाही, याचे त्यांना दुःख वाटते आणि काही वेळा निराशाही येते.

राष्ट्र आणि धर्म यांवर होणारे आघात पाहून चीड येणे, हे क्षात्रवृत्तीचे लक्षण आहे; पण अस्वस्थ वाटणे, दुःख वाटणे किंवा निराशा येणे, हे मात्र स्वतःच्या साधनेच्या दृष्टीने सर्वथा चुकीचे आहे. सध्या सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती या संस्था हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासाठी अथक प्रयत्न करत आहेत. याचाच एक भाग म्हणून या संस्था समाजात धर्मजागृती सभा, स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्ग, शौर्य जागरण अभियान यांसारखे अनेक उपक्रम आयोजित करत आहेत. या माध्यमांतून या संस्था समाजामध्ये राष्ट्र आणि धर्म यांविषयी आपली भूमिका काय असली पाहिजे ? समाजाची सद्यस्थिती पालटण्यासाठी आपण काय केले पाहिजे ?, आदींविषयी योग्य मार्गदर्शन करत आहेत. राष्ट्रप्रेमी, धर्मप्रेमी आणि साधक यांनी आपापल्या क्षमतेनुसार अशा उपक्रमांत सहभागी झाले पाहिजे. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितले आहे, समाजातील एक एक समस्या सोडवण्यापेक्षा हिंदु राष्ट्र स्थापन करणे महत्त्वाचे आहे. जे जे या कार्यात सहभागी होतील, त्यांची अध्यात्मात प्रगती होईल. हिंदु राष्ट्र स्थापन झाल्यावर इतर समस्या आपोआप सुटतील. त्यामुळे राष्ट्रप्रेमी, धर्मप्रेमी आणि साधक यांनी समाजाची दुःस्थिती पाहून निराश न होता तन-मन-धनाने हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या महान कार्यात सहभागी व्हावे.

Leave a Comment