‘अध्यात्म जाणणे आणि जगणे’ म्हणजे काय ?
अध्यात्मात जे शिकलो, ते लगेच कृतीत आणणे, हेच ‘अध्यात्म जाणणे आणि जगणे’ आहे ! ईश्वराप्रती असलेल्या भावानेच अध्यात्मशास्त्र जाणता येते. – श्रीचित्शक्ति सौ. अंजली गाडगीळ
अध्यात्मात जे शिकलो, ते लगेच कृतीत आणणे, हेच ‘अध्यात्म जाणणे आणि जगणे’ आहे ! ईश्वराप्रती असलेल्या भावानेच अध्यात्मशास्त्र जाणता येते. – श्रीचित्शक्ति सौ. अंजली गाडगीळ
अध्यात्मशास्त्र हे एका अथांग सागराप्रमाणे अमर्याद आहे. अध्यात्मात शिकू तेवढे अल्प आहे. शिकण्यासाठी अनेक जन्मही अपुरे पडतील. त्यामुळे अध्यात्माचा बुद्धीने अभ्यास करण्यापेक्षा त्यामधील तत्त्व ओळखून त्यामागील शास्त्र जाणून घ्यायला हवे. – श्रीचित्शक्ति सौ. अंजली गाडगीळ
अध्यात्म सुंदर आहे. ते जगणे आणि अनुभवणे, म्हणजे साक्षात् ईश्वराची अनुभूती घेणे ! -श्रीचित्शक्ति सौ. अंजली गाडगीळ
भावजागृतीचे प्रयत्न केल्यास तुम्हाला देवाच्या विश्वात रमता येते. देवाचे विश्व तुम्हाला शाश्वत आनंद देते. – श्रीचित्शक्ति सौ. अंजली गाडगीळ
आयुष्याच्या या साधना प्रवासात जेथे देव मिळतो, तेथे अजून काही मिळवण्याची आशा-आकांक्षा रहात नाही. देवाचे विश्व पुष्कळ सुंदर आणि अद्भुत् आहे. त्यात रमले की, कशाचीच आठवण येत नाही. – श्रीचित्शक्ति सौ. अंजली गाडगीळ
‘व्यक्तीमधील स्वभावदोष आणि अहं यांमुळे व्यक्तीला शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक आणि आर्थिक अशा विविध स्तरांवर हानी सहन करावी लागते. ही हानी त्याच्यापुरतीच मर्यादित न रहाता तिचे दुष्परिणाम त्या व्यक्तीच्या संपर्कात येणार्यांनाही सहन करावे लागतात. त्यामुळे त्या व्यक्तीने स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन केल्यास त्याचा लाभ केवळ त्या व्यक्तीपुरताच मर्यादित न रहाता तिच्या संपर्कात येणार्यांनाही होतो. त्याचप्रमाणे … Read more
खरा परमार्थी असतो तो सतत आत्मपरीक्षण करत असतो, त्याला दुसर्याचे अवगुण दिसतच नाहीत, त्याला आपल्याच अवगुणांचे इतके दर्शन होते की त्याला इतर सर्वजण परमेश्वररूप भासतात. – ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज
‘द्वापर आणि त्रेता युगांत सर्वसामान्य व्यक्तीही सात्त्विक होती. त्या काळात आयुष्यमानही अधिक होते. त्यामुळे जीवनातील शारीरिक, मानसिक, आर्थिक यांसारख्या समस्यांसाठी उपवास, तीर्थयात्रा यांसारख्या कर्मकांडाच्या स्तरावरील उपायांसाठी वेळ देणे त्यांना शक्य होते. त्यातून त्यांच्या अडचणी सुटतही होत्या. अडचणी सुटल्या की, उरलेला वेळ साधनेला देणे शक्य होते. सध्या कलियुगात मनुष्य रज-तम प्रधान आहे आणि त्याचे आयुमानही अल्प … Read more
‘व्यष्टी साधना करणार्या साधकाची साधना ‘माझी साधना कशी होईल ? माझी साधना होण्यासाठी मी अजून काय करू ?’, या प्रमुख विचारांच्या आधारे चालू असते. यामध्ये केवळ स्वतःच्याच साधनेचा विचार प्राधान्याने केला जातो. या विचारानुसार साधना करणार्या काही साधकांच्या विचारांचे रूपांतर पुढे स्वतःच्याच विचारांत गुरफटून ‘स्वार्थीपणा’मध्ये होण्याची शक्यता अधिक असते. याउलट समष्टी साधना करणार्या साधकाची साधना … Read more
‘कोणत्याही संकटाच्या वेळी, उदा. येणार्या आपत्काळात साधना न करणार्या केवळ ‘जन्महिंदूंना, अगदी कुटुंबीय किंवा नातेवाईक यांनाही देव वाचवील’, अशी आशा करू नका. ‘नमे भक्तः प्रणश्यति ।’ या वचनाप्रमाणे राष्ट्र-धर्म यांसाठी काही करणारे किंवा साधना करणारे यांनाच देव वाचवील.’ – (परात्पर गुरु) डॉ. जयंत आठवले