साधना सदा सर्वकाळच करावी !
देव हा वेळ आणि काळ यांच्याही पलीकडे आहे. त्यामुळे देवाला कोणत्याही वेळेत बांधण्याचा प्रयत्न करू नये. यामुळे मुहूर्त पाहून साधना करू नये. साधना सदा सर्वकाळच करावी. – श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ
देव हा वेळ आणि काळ यांच्याही पलीकडे आहे. त्यामुळे देवाला कोणत्याही वेळेत बांधण्याचा प्रयत्न करू नये. यामुळे मुहूर्त पाहून साधना करू नये. साधना सदा सर्वकाळच करावी. – श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ
आपल्यात ‘कुटुंबभाव’ असेल, तर समष्टीला आपण आपल्याजवळ आणू शकतो, आपण समष्टीशी एकरूपता साधू शकतो, आपण समष्टीचे मन जिंकू शकतो. – श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ
कोणत्याही मनुष्याला हाक मारल्यावर तो मागे वळून पहातो. जेव्हा आपण भगवंताचे नाम घेऊन त्याला हाक मारतो, तेव्हा तो आपल्यासाठी येणार नाही का ? – श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ
‘इको’ (Eco sound) नादामध्ये सात्त्विकता अल्प असते. बरेच जण मंत्रांचे ध्वनीमुद्रण करतात. मंत्रांच्या ध्वनीमुद्रणाचे संकलन करतांना त्या नादाला वेगवेगळे संगीत जोडले जाते किंवा ‘तो नाद घुमल्यासारखा वाटावा’, यासाठी त्याच्यावर संगणकीय प्रणालीद्वारे वेगवेगळे प्रयोग केले जातात. यामुळे मंत्रांतील मूळ नादातील सात्त्विकता अल्प होत जाते. मंत्रांच्या उच्चारामध्येच त्यांची सात्त्विकता दडलेली आहे. उच्चाराचा नादच जर संगणकीय विज्ञानाद्वारे नष्ट … Read more
कलियुगात १५ वर्षे खडतर साधना करणे, म्हणजे पूर्वीच्या युगांतील अनेक वर्षांची साधना करण्यासारखे आहे; कारण कलियुगात साधनेसाठी परिस्थिती अत्यंत प्रतिकूल आहे. त्यामुळेच या युगात इतर युगांच्या तुलनेत देव लवकर प्रसन्न होतो; म्हणूनच कलियुगाला ‘संधिकाल’ म्हटले आहे. संधिकाल म्हणजे थोडी साधना आणि पुष्कळ पुण्य ! – श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ
आत्म्यावरील आवरण काढून आत्मशक्ती निर्माण झाली की, ‘तो जीव कोणतेही कार्य सहज सुलभ रितीने करू शकतो.’ जिवाची इच्छाशक्ती आणि ज्ञानशक्ती मिळून जेव्हा कार्य होते, तेव्हा ते कार्य चैतन्याद्वारे सुलभ रितीने पार पडते. – परात्पर गुरु पांडे महाराज, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२७.४.२०१५)
साधनेला महागाईची अडचण नसते. साधनेला कशाची आवश्यकता नसते. कुठेही बसून साधना करता येते. – परात्पर गुरु पांडे महाराज, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२७.४.२०१५)
भौतिक सुखाने तुमची चैतन्य शक्ती, सामर्थ्य वाढत नाही, उलट तुम्ही निर्बल, दुर्बल होता. यासाठी साधना करून आत्मशक्ती (चैतन्य शक्ती) वाढवणे आवश्यक आहे. – परात्पर गुरु पांडे महाराज, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२७.४.२०१५)
‘वेदांमध्ये म्हटले आहे, ‘हे इंद्रा, तू सर्वार्थांनी लायक आहेस. तू राजा हो.’ असे लोकांनी राजासाठी म्हणायला पाहिजे; परंतु भारतात मात्र ‘मी राजा होतो, मला निवडून द्या’, असे शब्द ऐकू येतात.’ – परात्पर गुरु पांडे महाराज, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२७.४.२०१५)
देवाप्रती असलेल्या भावामुळे साधकाला निर्णयक्षमता प्राप्त होते, म्हणजेच कोणत्याही परिस्थितीत स्थिर रहाता येते. दैवी प्रेरणा आणि शांत मन यांच्या साहाय्य्याने तो योग्य तो निर्णय घेऊ शकतो. त्यामुळे त्याला परिस्थितीतून जलद पुढे जाता येते. – श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ