‘इको’ (Eco sound) नादामध्ये सात्त्विकता अल्प असते. बरेच जण मंत्रांचे ध्वनीमुद्रण करतात. मंत्रांच्या ध्वनीमुद्रणाचे संकलन करतांना त्या नादाला वेगवेगळे संगीत जोडले जाते किंवा ‘तो नाद घुमल्यासारखा वाटावा’, यासाठी त्याच्यावर संगणकीय प्रणालीद्वारे वेगवेगळे प्रयोग केले जातात. यामुळे मंत्रांतील मूळ नादातील सात्त्विकता अल्प होत जाते. मंत्रांच्या उच्चारामध्येच त्यांची सात्त्विकता दडलेली आहे. उच्चाराचा नादच जर संगणकीय विज्ञानाद्वारे नष्ट केला गेला, तर मंत्रांचा लाभच काय राहिला ? असे करणे, म्हणजे मंत्रातील सत्त्वच हरपण्यासारखे आहे. यासाठी मंत्रांचे जसेच्या तसे ध्वनीमुद्रण करून त्यावर कोणत्याही इतर असात्त्विक नादाची प्रक्रिया न करणेच अधिक फलदायी आहे.
– श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ
खरे देवदर्शन !
देहत्याग केल्यावरही साधना होण्यासाठी आताच मनावर साधनेचा संस्कार करा !
व्यक्तीपूजेपेक्षा साधनेला महत्त्व !
नकारात्मक न बोलण्याचे लाभ
‘मी’ नष्ट झाला की भगवंत प्रकटतो !