स्थूल आणि सूक्ष्म देहांच्या शुद्धीसाठी करावयाची साधना !

देहाचा प्रकार आणि करावयाची साधना १. स्थूल – उपवास, प्राणायाम, हठयोग २. सूक्ष्म ( मन ) – नामजप, स्वभावदोष निर्मूलन ३. कारण (बुद्धी) – अध्यात्माचा अभ्यास ४. महाकारण (अहं) – कृतज्ञता, शरणागती आणि श्रद्धा वाढवणे, तसेच अहंनिर्मूलनाचे प्रयत्न करणे – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

शरीरशुद्धीला महत्त्व द्या !*

‘शरीर ही पहिली वास्तू आहे. प्रथम तिच्या शुद्धीचा विचार करावा, नंतर बांधलेल्या वास्तूचा !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

ईश्वरप्राप्तीसंदर्भात मनुष्याची लाजिरवाणी उदासीनता !

‘धनप्राप्ती, विवाह, आजारपण इत्यादी अनेक कारणांसाठी अनेक जण तोडगे विचारतात; पण ईश्‍वरप्राप्तीसाठी तोडगा विचारण्याचा कोणी विचारही करत नाही !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

नोकरीसाठी शैक्षणिक पात्रतेबरोबरच वैयक्तिक गुणही महत्त्वाचे!

‘कोणत्याही क्षेत्रामध्ये एखाद्याला केवळ त्याच्या शैक्षणिक प्रमाणपत्राने नोकरी न देता त्याचे वैयक्तिक गुण पाहूनही निवड करणे आवश्यक आहे !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

जगातील सर्वश्रेष्ठ पदवी !

‘जगात अनेक विषयांच्या अनेक पदव्या आहेत. ‘डॉक्टरेट’ सारख्या अनेक उच्च स्तरावरच्या पदव्या आहेत; मात्र त्यांपेक्षाही सर्वश्रेष्ठ पदवी आहे, ‘खर्‍या गुरूंचा ‘खरा शिष्य’ ! ’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

पूर्वीचा कुटुंबाप्रमाणे एकत्र असणारा समाज आणि आताचा तुकडे तुकडे झालेला समाज !

‘पूर्वी समाजात असलेली सात्त्विकता, सामंजस्य, प्रेमभाव इत्यादी गुणांमुळे समाजव्यवस्था नीट रहावी; म्हणून काही करावे लागायचे नाही. आता समाजात ते घटक निर्माण होण्यासाठी धर्मशिक्षण दिले जात नसल्यामुळे कायद्याचे साहाय्य घेऊन समाजव्यवस्था नीट रहाण्यासाठी केविलवाणा प्रयत्न केला जातो.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

आयुष्यात प्रारंभीपासूनच साधना करण्याचे महत्त्व !

‘अनेक नवरा-बायको आयुष्यभर भांडत असतात आणि मग म्हातारपणी ‘या त्रासावर उपाययोजना, म्हणजे केवळ साधनाच आहे’, हे त्यांच्या लक्षात येते. त्या वेळी ‘आयुष्यभर साधना केली नाही’, याचा पश्‍चाताप करण्याशिवाय त्यांच्याकडे काहीच पर्याय नसतो.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

खरे अध्‍यात्‍म !

‘साधनेचे प्रयत्न करतांना प्रथम बुद्धीच्‍या स्‍तरावर ‘देवच माझ्‍या माध्‍यमातून सर्व करत आहे’, असा भाव ठेवावा लागतो. साधना वाढली की, पुढे पुढे ‘देवच माझ्‍यातून सर्व करत आहे’, अशी अनुभूती येते. ‘देवाची अनुभूती घेणे, म्‍हणजेच देवाला अनुभवणे’, हेच खरे अध्‍यात्‍म आहे !’ – (पू.) संदीप आळशी (२६.१२.२०२२)

राजकारण आणि अध्यात्म यांतील भेद

१. राजकारणातील क्षणभंगुरता अ. ‘एखादी व्यक्ती सत्तेवर असतांना तिला शासनाच्या वतीने सुख-सुविधा पुरवल्या जातात. त्या व्यक्तीला पोलिसांकडून संरक्षण दिले जाते. आ. त्या व्यक्तीचा पदाचा कालावधी पूर्ण झाला की, तिला दिलेल्या सुविधा काढून घेतल्या जातात. त्या व्यक्तीवर अकस्मात् पद (सत्ता) सोडण्याची वेळ आली, तर एका रात्रीत तिच्याकडे असलेले दायित्व काढून घेतले जाते आणि दुसर्‍या व्यक्तीला दायित्व … Read more

साधकांनो, जलद आध्यात्मिक उन्नतीसाठी मनाच्या स्तरावर साधनेचे प्रयत्न करा !

‘साधना’, म्हणजे ईश्‍वरप्राप्तीसाठी करावयाचे प्रयत्न ! अनेकजण साधना म्हणून त्या संदर्भातील अनेक ग्रंथांचा अभ्यास करतात. यामध्ये केवळ बुद्धीचा वापर होतो. साधनेच्या प्राथमिक टप्प्याला साधनेचे महत्त्व मनावर बिंबवण्यासाठी बुद्धीची आवश्यकता असते. त्यामुळे या टप्प्यावर साधनेसाठी बुद्धीचे महत्त्व ७० टक्के आणि मनाचे महत्त्व ३० टक्के असते. साधनेचे महत्त्व कळल्यावर मात्र साधनेसाठी मनाच्या स्तरावरील प्रयत्न वाढवणे आवश्यक असते, … Read more