खरे दान

खरे दान सत्पात्री असावे आणि त्याची वाच्यता दुसऱ्यांजवळ होऊ नये. त्याची आठवणही क्षणार्धात विसरण्याचा प्रयत्न करावा. – योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन श्रमाची कास धरा ! ईश्वरी शक्ती अगाध आहे. तुमच्या साधनेने तुमची दुःखे निश्चितच पळून जातील; पण त्यासाठी श्रमाची कास धरा. – योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन

आत्मप्रौढी नको !

स्वतःच्या प्रगतीचा विचार करावा; पण अहंकाराची जोपासना करू नये. आत्मप्रौढीपेक्षा अधिक कोणता वेडेपणा नाही. – योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन कोणतीही कृती करण्यापूर्वी थोडा वेळ थांबून ती खरोखरंच हितावह आहे का ? याचा विचार करण्याची स्वतःला सवय लावावी. – योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन

मंत्रजपाचे महत्त्व

समजा, मनाची एकाग्रता साधली नाही, तरी पावित्र्याने कर्तव्य म्हणून मंत्रजप केल्यावर मन आपोआप स्थिर होत जाईल. – योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन अहंभाव, म्हणजे मीपणा. हा अहंभाव सोडला, तर माणसांच्या समूहात तुम्ही आश्चर्यकारक एकांताचा अनुभव मिळवाल. – योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन

बुद्धीवाद संपल्यावर ईश्वरी शक्तीच्या उत्क्रांतीचा उगम होणे

बुद्धीवादाच्या मर्यादा जेथे संपतात, तेथेच ईश्वरी शक्तीच्या उत्क्रांतीचा उगम होतो. इथेच मनुष्य आध्यात्मिक विचार करू लागतो.- योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन खरा एकांत माणूस कुठेही गेला, तरी त्याला इतर कुठलेही नसेल; पण स्वतःच्या शरिराचे बंधन राहीलच; म्हणून शारीरिक आणि सांसारिक विचारांपासून मुक्त होणे, हाच खरा एकांत. – योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन

प्रत्येक कृती परमेश्वरी कार्य म्हणून करा !

जे काम कराल, ते श्रद्धेने, सचोटीने, शुद्ध मनाने आणि परमेश्वरी कार्य म्हणून करा, म्हणजे ईश्वर आपल्यापासून फार दूर नाही. – योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन सद्गुरूंना आपल्यापेक्षा वेगळे समजू नका ! जो सद्गुरूंना आपल्यापेक्षा वेगळा आणि दूर समजतो, तो त्यांच्यापासून पूर्ण लाभ मिळवू शकत नाही. – योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन

भारताच्या रक्तरंजित फाळणीचे काहीच न वाटणारे भारतीय कवी !

आमचे लेखन, भाषण, चिंतन, स्वप्न, शिंका, भावना असे सगळे अमेरिकन झाले आहे. अमेरिकन संस्कृतीने आमच्या देशाला अंतर्बाह्य व्यापून टाकले आहे. हिरोशिमावर आमचे कवी काव्य करतात ! हिटलरच्या क्रौर्याला आणि संहाराला लाजवणारे हत्याकांड फाळणीच्या प्रसंगी घडले. त्यावर किती काव्ये झाली ? किती नाटके झाली ? व्हिएतनाम, हिरोशिमा आम्हाला जर्जर करते. भारताच्या फाळणीचे ते भयानक प्रसंग मात्र… … Read more

प्रसिद्धीमाध्यमांनो याकडे लक्ष द्या!

एक मास जरी प्रसिद्धीमाध्यमांनी योग्य पद्धतीने विषयांना प्रसिद्धी दिली, तरी एका मासात देशाची स्थिती पालटेल ! – श्रीमद् जगद्गुरु शंकराचार्य स्वामी निश्चलानंदसरस्वती महाराज, पूर्वाम्नाय श्रीगोवर्धनमठ, पुरी पिठाधीश्वर (२१.११.२०१३)

स्वतंत्र आणि स्वातंत्र्य

 भारताला ‘स्वातंत्र्य’ मिळाले, म्हणजे नेमके काय झाले ? बाह्यतः परकियांची राजवट गेली आणि स्वकियांची राजवट आली, इतकेच स्वातंत्र्य मिळाले, याचा अर्थ जाणवतो. ‘स्वम् आत्मानं शास्ति सः स्वतन्त्रः ।’, म्हणजे ‘जो स्वत़ःचे, स्वतःच्या आशा-आकांक्षा, भाव-भावना, विकार आणि विचार इत्यादींचे नियमन करतो, तो स्वतंत्र’. येथे आत्मा याचा लौकिक अर्थ अपेक्षित आहे, अध्यात्माचा संबंध नाही. त्याचा भाव आणि … Read more

आध्यात्मिक सत्ता नित्य आणि सनातन आहे !

 भारताचेच उदाहरण पाहिल्यास पूर्वी हिंदुस्थान या संकल्पनेत पाकिस्तान, आताचा भारत, अफगाणिस्तान, ब्रह्मदेश, श्रीलंका, पूर्व बंगाल, जावा, सुमात्रा, तिबेट, बलुचिस्तान, नेपाळ, भूतान, अक्साई आणि चीन एवढा मोठा भूभाग समाविष्ट होता. त्याचे लचके तोडत प्रचलित भारत राष्ट्र म्हणून उभा आहे. राष्ट्राची मर्यादा काळाच्या ओघात वृद्धी वा क्षय पावू शकते. त्यामुळे राष्ट्र ही संकल्पना पालटणारी आणि परिवर्तनीय आहे; … Read more

व्यक्तीस्वातंत्र्यवाल्यांनो, व्यक्तीस्वातंत्र्यामुळे, स्वैराचारामुळे तुमची, तसेच समाज, राष्ट्र आणि धर्म यांची हानी होते, हे लक्षात घ्या !

व्यक्तीस्वातंत्र्य म्हणजे स्वेच्छेने वागणे, स्वैराचार. प्रत्येकजण स्वेच्छेने, आपल्या मनाप्रमाणे वागला, तर देशाचे काय होते, हे आपण अनुभवत आहोत. १. संयमाने चिरंतन आनंदाची प्राप्ती होते, तर स्वेच्छेने वागण्याने केवळ तात्कालिक सुख मिळते. २. व्यक्तीस्वातंत्र्य असले, तरी मुले अज्ञानी आहेत, असे म्हणून आपण मुलांना स्वेच्छेने अयोग्य वागू देत नाही. त्याचप्रमाणे आपल्या अयोग्य वागण्याचा समाज आणि राष्ट्र यांवर … Read more