व्यक्तीस्वातंत्र्यवाल्यांनो, व्यक्तीस्वातंत्र्यामुळे, स्वैराचारामुळे तुमची, तसेच समाज, राष्ट्र आणि धर्म यांची हानी होते, हे लक्षात घ्या !

व्यक्तीस्वातंत्र्य म्हणजे स्वेच्छेने वागणे, स्वैराचार. प्रत्येकजण स्वेच्छेने, आपल्या मनाप्रमाणे वागला, तर देशाचे काय होते, हे आपण अनुभवत आहोत.



१. संयमाने चिरंतन आनंदाची प्राप्ती होते, तर स्वेच्छेने वागण्याने केवळ तात्कालिक सुख मिळते.



२. व्यक्तीस्वातंत्र्य असले, तरी मुले अज्ञानी आहेत, असे म्हणून आपण मुलांना स्वेच्छेने अयोग्य वागू देत नाही. त्याचप्रमाणे आपल्या अयोग्य वागण्याचा समाज आणि राष्ट्र यांवर परिणाम होतो, हे लक्षात न घेणारे मुलांप्रमाणे अज्ञानीच होत; म्हणून त्यांच्यावर बंधन घालणे आवश्यक असते.



व्यक्तीपेक्षा समाज आणि समाजापेक्षा राष्ट्र महत्त्वाचे आहे, हे न समजणारे व्यक्तीस्वातंत्र्यवाले स्वतःला, समाजाला आणि देशाला विनाशाकडे नेत आहेत ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले




३. व्यक्तीस्वातंत्र्याचे सांसारिक जीवनातील परिणाम म्हणजे वाढते घटस्फोट आणि विवाहाशिवाय एकत्र रहाणे



४. व्यक्तीपेक्षा समाज आणि समाजापेक्षा राष्ट्र मोठे, हे व्यक्तीस्वातंत्र्यवाले विसरतात. राष्ट्रामुळे समाजाचे रक्षण होते आणि समाजामुळे व्यक्तीचे रक्षण होते. असे असतांना आपल्या वागण्याचा समाज आणि राष्ट्र यांवर काय परिणाम होतो. हे लक्षात न घेता व्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली कसेही वागणे अयोग्य ठरते.



५. साधनेत स्वेच्छेने वागण्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रथम परेच्छेने वागण्यास आरंभ करतात. त्यामुळे पुढे प्रगती होऊन ईश्‍वरेच्छा काय आहे, हे लक्षात येते आणि त्यानुसार वागणे होते.



६. खरे म्हटले, तर भगवंतही स्वेच्छेने वागत नाही. तो भक्तांच्या स्वाधीन असतो. जेथे भगवंतही स्वेच्छेप्रमाणे वागत नाही, तेथे व्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली स्वेच्छेने वागणे किती हास्यास्पद आहे, हे लक्षात आले.



– डॉ. आठवले (२०.६.२०१४)

Leave a Comment