खर्‍या हिंदु राष्ट्राच्या निर्मितीसाठी एक-दोन पिढ्या लागणार असल्याचे कारण

मुले इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकतात, हेच त्यांचे शिक्षण योग्य नसल्याचे एकमेव कारण नाही. घरी होणारी भांडणे, तसेच दैनिकांत आणि दूरचित्रवाहिन्यांवर येणार्‍या स्वैराचार, भ्रष्टाचार, जात्यंधता, अपहरण, बलात्कार, खून इत्यादी बातम्या यांमुळेही त्यांच्यावर अनिष्ट संस्कार होतात. पुढे अशा बातम्यांचे त्यांना काही वाटेनासे होते आणि काही काळानंतर त्यांच्यातील काहीजण या गोष्टी स्वतःही करू लागतात. मुलांवर अनिष्ट संस्कार होऊ … Read more

व्यष्टी आणि समष्टी साधनेतील भेद आणि समष्टी साधनेचे महत्त्व

१. ईश्‍वर सूक्ष्मातीसूक्ष्म आहे, तसाच सर्वव्यापीही आहे. त्यामुळे ईश्‍वरप्राप्तीचे, म्हणजे ईश्‍वराशी एकरूप होण्याचे सूक्ष्मातीसूक्ष्म होणे, म्हणजेच शून्यात जाणे किंवा सर्वव्यापी होणे, हे दोन मार्ग आहेत. सूक्ष्मातीसूक्ष्म होणे हा मार्ग व्यष्टी साधना करणार्‍यांचा असतो, तर समष्टीशी एकरूप होण्यासाठी आपली व्यापकता वाढवणे, हा मार्ग समष्टी साधना करणार्‍यांचा असतो. व्यष्टी साधना करता करता पुढे शून्यात जाऊन ईश्‍वराशी एकरूप … Read more

व्यष्टी साधनेसाठी गुरुमंत्र, समष्टी साधनेसाठी कालमहात्म्यानुसारचा जप आवश्यक

काही जणांना प्रश्‍न पडतो, आम्हाला गुरुमंत्र मिळालेला असतांना आम्ही कालमहात्म्यानुसारचा श्रीकृष्णाचा जप करायचा का ? याचे उत्तर आहे, गुरुमंत्र व्यष्टी साधनेसाठी आहे, तर समष्टी साधनेसाठी कालमहात्म्यानुसार श्रीकृष्णाचा जप वर्ष २०२३ पर्यंत आवश्यक आहे. वर्ष २०२४ पासून श्रीरामाचा जप आवश्यक असेल. गुरुमंत्र काळानुसार पालटत नाही, तर समष्टी साधनेसाठीचा जप कालमहात्म्यानुसार पालटतो. – (प.पू) डॉ. आठवले (२४.११.२०१४)

हिंदु राष्ट्राची स्थापना कोण करू शकतील ?

हिंदु राष्ट्राची स्थापना स्वार्थी राजकारणी नाही, तर सर्वस्वाचा त्याग करणारे राष्ट्र आणि धर्मप्रेमी, तसेच साधकच करू शकतील ! – (प.पू) डॉ. आठवले (७.५.२०१४) राजकारणी पैसा, पद देऊ, असे सांगतात, तर सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती सर्वस्वाचा त्याग करा, म्हणजे ईश्‍वरप्राप्ती होईल, असे सांगतात. – (प.पू) डॉ. आठवले (४.१२.२०१४)

हिंदुत्ववादी सनातन संस्थेशी आणि हिंदु जनजागृती समितीशी जोडले जातात, यात आश्‍चर्य ते काय ?

रामनाथी आश्रमातील पारिजातकाच्या झाडाची फुले आश्रमाच्या दिशेला असलेल्या फांद्यांना अधिक प्रमाणात लागतात. आंब्यांच्या झाडाचेही तसेच आहे, आश्रमाच्या दिशेला असलेल्या फांद्यांना जास्त आंबे लागतात. फुले-फळेही आश्रमाच्या दिेशेने जास्त प्रमाणात येतात, तर हिंदुत्ववादी सनातन संस्थेशी आणि हिंदु जनजागृती समितीशी जोडले जातात, यात आश्‍चर्य ते काय ? – (प.पू.)डॉ. आठवले (५.४.२०१४) रामनाथी आश्रमात आल्यावर तीर्थक्षेत्री गेल्याप्रमाणे लाभ होतो. … Read more

नामजप करतांना मन एकाग्र होण्यासाठी वापरावयाच्या पद्धती

" जप करतांना मन एकाग्र झाल्यासच त्याचा लाभ होतो. नामजप करतांना आरंभी मन एकाग्र होणे कठीण जाते; कारण पंचज्ञानेंद्रियांकडून मनाकडे येणार्‍या विविध संवेदना आणि चित्ताकडून मनामध्ये येणारे विविध विचार आणि भावना यांमुळे मन एकाग्र होत नाही. यावर मात करण्यासाठी पुढील उपाय करता येतात. टप्पा १ १ अ. पंचज्ञानेंद्रिये १. नाक : नामजपाच्या ठिकाणी दुर्गंध नसावा. … Read more

प.पू. डॉ. आठवले यांचा कर्मकांडांकडे पहाण्याचा दृष्टीकोन पालटणे !

कर्मकांडानंतर उपासनाकांड येते. मी उपासनाकांडांतर्गत नामजपापासून साधनेला आरंभ केला. त्यामुळे मला यज्ञयागादीच नाही, तर साध्या पूजापाठाचीही ओढ नव्हती. असे असले, तरी विविध ठिकाणी होणार्‍या कर्मकांडांचे गेली १५ वर्षे ध्वनीचित्रीकरण करवून घेऊन मी ते संग्रही ठेवले आहे. त्याचा काय उपयोग हे मला ज्ञात नव्हते. २० ते २६ जून २०१४ मध्ये गोव्यात झालेल्या तिसर्‍या अखिल भारतीय हिंदू … Read more

प्रकृतीनुसार आणि काळानुसार त्या त्या देवतेची उपासना करणे आवश्यक

गुरुप्राप्ती होईपर्यंत पुढील तत्त्वे लक्षात घेऊन त्यानुसार साधना केल्यास प्रगती लवकर होते. १. व्यष्टी साधना : प्राथमिक टप्प्याची साधना म्हणजे कुलदेवतेची उपासना आणि त्या त्या देवतेची तिच्या त्या त्या सणांच्या दिवशी, तसेच अमावास्या इत्यादी दिवशी करायची उपासना. पुढे गुरुप्राप्ती झाल्यावर गुरु सांगतील, ती उपासना करायची असते. २. समष्टी साधना : ही अधिकतर काळानुसार असते, उदा. … Read more

सध्याचे राजकारणी व हिंदवी स्वराज्य स्थापन करणारे छ. शिवाजी महाराज यामधील भेद!

छ. शिवाजी महाराजांनी समर्थांच्या आशीर्वादाने हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. संतांकडून असा आशीर्वाद मिळण्यासाठी एकतरी राजकारणी लायक आहे का ? – डॉ. आठवले (१५.७.२०१४)

त्रासांसंदर्भात तज्ञांचा सल्ला आणि साधना

जीवनातील ८० टक्के त्रास प्रारब्धामुळे होतात. त्यात शारीरिक, मानसिक, आर्थिक, कौटुंबिक असे विविध प्रकारचे त्रास असतात. त्या त्या विषयातील तज्ञ त्यांना प्रारब्ध इत्यादी ज्ञात नसल्याने लक्षणांनुसार आणि वरवरच्या कारणांनुसार सल्ला देतात. त्यामुळे लाभ व्हायचे प्रमाण बरेच अल्प असते. याउलट साधना केली की, चिरंतन आनंदाच्या, म्हणजे ईश्‍वरप्राप्तीच्या दिशेने वाटचाल होते आणि आनुषंगिक लाभ म्हणून त्रासही दूर … Read more