यश मिळण्यास आरंभ होण्याचे आणि ते टिकण्याचे तुलनात्मक प्रमाण

हिंदु राष्ट्रासाठीच नव्हे, तर कोणत्याही उपक्रमासाठी प्रयत्न करण्याचा स्तर आणि यश मिळण्याचे, तसेच यश मिळण्यास आरंभ होण्याचे आणि ते टिकण्याचे तुलनात्मक प्रमाण प्रयत्न करण्याचा स्तर यश मिळण्याचे तुलनात्मक प्रमाण (टक्के) यश मिळण्यास आरंभ होण्याचा तुलनात्मक कालावधी यश टिकण्याचे तुलनात्मक प्रमाण (टक्के) १. शारीरिक ३० अल्प ५ २. मानसिक ५० मध्यम ३० ३. आध्यात्मिक १०० अधिक … Read more

त्याग केल्यावर ईश्‍वरप्राप्ती होते !

साठवण्याने जडत्व येते. आपल्याकडे आहे त्या तन-मन-धन या सर्वांचा अधिकाधिक त्याग करण्याने हलकेपणा येत जातो. त्यामुळे वर वर देवाच्या दिशेने साधकाची प्रगती होते. शेवटी सर्वस्वाचा त्याग केला की, ईश्‍वरप्राप्ती होते. – (प.पू.) डॉ. आठवले (२५.८.२०१४) ज्या साधकांची साधना ईश्‍वरप्राप्तीसाठी असते, त्यांना एखाद्या संस्थेतील, संघटनेतील, पक्षातील पद, तसेच लोकप्रतिनिधीपद, मंत्रीपद किंवा अगदी पंतप्रधानपद यांची ओढ असेल … Read more

व्यष्टी आणि समष्टी साधना करणार्‍यांनी शरीर सुदृढ रहावे, यासाठी प्रयत्न करणे आवश्यक !

व्यष्टी किंवा समष्टी साधना करणार्‍यांनी हे लक्षात घेतले पाहिजे की, शरीरमाद्यं खलु धर्मसाधनम् ।, म्हणजे धर्माचरणासाठी, म्हणजेच साधना करण्यासाठी शरीर हे महत्त्वाचे साधन आहे. याचा अर्थ असा की, शरीर सुदृढ असेल, तरच साधना चांगल्या तर्‍हेने करता येते; म्हणून व्यायाम, प्राणायाम, आसने इत्यादी करणे, तसेच योग्य आहार घेणे आवश्यक आहे. १. व्यष्टी साधना करणारे यांच्या दृष्टीने … Read more

‘मनाला सातत्याने वळण लावून आत्म्याशी अनुसंधानित करण्याचे प्रयत्न करावा. प्रत्येक कृती, उदा. चालणे, बोलणे, पहाणे आत्म्याशी अनुसंधानित करावी. ‘स्वतः करतो’, अशी जाणीव असल्यास कृती करतांना थकवा येतो; मात्र अनुसंधानित कृतीमुळे थकवा येत नाही.’ – प.पू. पांडे महाराज, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२२.८.२०१४)

कुठे शोधिसी रामेश्‍वर अन् कुठे शोधिसी काशी ।

अशी गीते लिहून कवींनी आणि ती वारंवार ऐकवून सर्वपक्षीय राज्यकर्त्यांनी हिंदूंच्या मनात तीर्थक्षेत्रांविषयी नकारात्मक भावना निर्माण केली. त्याचे फळ म्हणजे हल्लीची हिंदूंची कमालीची दुरवस्था ! – (प.पू.) डॉ. आठवले

सनातनचे प्रत्येक क्षेत्रातील साधक<br>ती गोष्ट सात्त्विक असावी, यादृष्टीने प्रयत्न करतात !

याचे एक उदाहरण म्हणजे वास्तूविशारद वास्तू बनवतात ती आर्थिकदृष्ट्या अल्प किमतीत आणि दिसायला चांगली हवी, या दृष्टीकोनातून बनवतात. याउलट सनातनचे वास्तूविशारद वास्तू बनवतात ती आध्यात्मिकदृष्ट्या सात्त्विक कशी असेल, याचा विचार करून ! – (प.पू.) डॉ. आठवले

एखाद्या बाळाने आई-वडील कोण ? यांचा शोध घ्यायचा प्रयत्न करून…

एखाद्या बाळाने आई-वडील कोण ? यांचा शोध घ्यायचा प्रयत्न करून उत्तर मिळाले नाही की, आई-वडील नसतातच असे म्हणणे जितके हास्यास्पद आहे, तितकेच बुद्धीप्रामाण्यवाद्यांनी देव नसतो, असे म्हणणेे हास्यास्पद आहे ! – (प.पू.) डॉ. आठवले

त्याग केल्यावर ईश्‍वरप्राप्ती होते !

देशासाठी प्राण अर्पण करणार्‍या क्रांतीकारकांना कुटुंबीय विरोध करत नाहीत; पण ईश्‍वरप्राप्तीसाठी कुटुंब सोडणार्‍याला सर्वच विरोध करतात. – (प. पू.) डॉ. आठवले ‘ईश्वर, अध्यात्म नाही’ असे म्हणणे हास्यास्पद ‘एखाद्या अशिक्षिताने ‘विज्ञान नाही’, असे म्हणणे जेवढे हास्यास्पद आहे, त्याहूनही जास्त हास्यास्पद बुद्धीवाद्यांनी ‘ईश्वर, अध्यात्म नाही’, असे म्हणणे आहे !’ – (प. पू.) डॉ. आठवले

कोणीतरी निर्माण केल्याशिवाय काहीही आपोआप निर्माण होत नाही. असे असतांना…

कोणीतरी निर्माण केल्याशिवाय काहीही आपोआप निर्माण होत नाही. असे असतांना बुद्धीच्या निर्मात्याचा, ईश्‍वराचा शोध न घेता बुद्धीद्वारे त्याने निर्माण केलेल्या गोष्टींचा शोध घेत असतांना ईश्‍वर नाही, असे म्हणणे, ही आहे बुद्धीप्रामाण्यवाद्यांच्या बुद्धीची झेप ! – (प.पू.) डॉ. आठवले

केवळ साधकांच्या सेवावृत्तीमुळे आणि हितचिंतकांमुळे सनातन संस्थेचे अन् हिंदू जनजागृती समितीचे कार्य चालते, हे लक्षात घ्या !

बर्‍याच जणांना वाटते सनातन संस्थेचे आणि हिंदू जनजागृती समितीचे प्रतिमास लाखो रूपये लागतील, एवढे कार्य होते कसे ? कार्य होण्यात काहीच गुपित नाही. सनातन संस्थेचे हजारो साधक सेवा म्हणून कार्य करतात. त्यातले काही जण आधुनिक वैद्य, वकील, अभियंता, संगणकतज्ञ इत्यादी आहेत. व्यवहारात असतांना त्यांना हल्लीच्या १ लाख रूपयांहूनही अधिक मासिक मिळकत होती. आता तेही सर्व … Read more