दगडांवर बीज रूजत नाही, तसे स्वभावदोष आणि अहं यांच्यावर साधनेचे…
दगडांवर बीज रूजत नाही, तसे स्वभावदोष आणि अहं यांच्यावर साधनेचे बीज रूजत नाही; म्हणून स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाला गुरुकृपायोगात प्राधान्य दिले आहे. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
दगडांवर बीज रूजत नाही, तसे स्वभावदोष आणि अहं यांच्यावर साधनेचे बीज रूजत नाही; म्हणून स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाला गुरुकृपायोगात प्राधान्य दिले आहे. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘एखाद्या थाळीमध्ये जंतूंची वाढ प्रमाणाबाहेर झाल्यावर जंतूंना थाळीतील अन्न पुरत नाही. त्यामुळे ते मरतात. अशीच आता पृथ्वीची स्थिती झाली आहे. पृथ्वीची क्षमता ३०० कोटी मानवांचे पालन-पोषण करण्याएवढी आहे. आता पृथ्वीवरील मानवांची संख्या ७५० कोटी झाली आहे. त्यामुळे पुढे रॉकेल, पेट्रोल, गॅस, पाणी, अन्न एवढेच नव्हे, तर शुद्ध हवाही मानवाला आवश्यकएवढी मिळणार नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात … Read more
कर्मयोग, भक्तीयोग, ज्ञानयोग, हठयोग, कुंडलिनीयोग इत्यादी कोणत्याही योगमार्गाने प्रगती होण्यासाठी स्वभावदोष आणि अहंभाव न्यून असणे आवश्यक असते. सत्य, त्रेता आणि द्वापर युगांत मानवांत स्वभावदोष आणि अहंभाव न्यून असायचा. आता कलियुगात स्वभावदोष आणि अहंभाव अधिक प्रमाणात असल्यामुळे बहुतेकांची साधनेत प्रगती होत नाही. यासाठी साधक कोणत्याही योगमार्गाने साधना करणारा असला, तरी त्याने प्रथम स्वभावदोष आणि अहं निर्मूलन … Read more
चुका झाल्यानंतर अनेक जण त्याच विचारांत रहातात आणि सेवा करतांना चुका होतील, असा विचार करून तणावाखाली सेवा करतात. चुकांचा सतत विचार करायला नको. आतापर्यंतच्या शेकडो जन्मांत आपण अनेक चुका केल्या आहेत; पण तोे भूतकाळ झाला. त्यामुळे चुकांचा विचार करण्यापेक्षा चुका न होण्यासाठी काय करायला हवे ? याचा विचार करून सतत तसे प्रयत्न करायचे. – (परात्पर … Read more
आरंभीच्या स्थितीला श्रीकृष्णाच्या अनुसंधानात रहाण्यासाठी त्याच्याशी खेळणे, बोलणे इत्यादी ठीक आहे; पण पुढच्या टप्प्यात नामजप करणे अधिक योग्य ! याचे कारण श्रीकृष्णाशी बोलतांना पुष्कळ शब्दांचा वापर केला जातो, तर नामजपात केवळ चार-पाच शब्दच येतात. अनेकातून एकात जाणे, हे आपले ध्येय आहे. त्याच्या पुढचा टप्पा म्हणजे भावाच्या स्थितीत रहाणे. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
घराचा आश्रम केल्यास घरातील सर्वांनाच त्याचा लाभ होतो. अशा घरातून चैतन्य प्रक्षेपित होत असल्याने घराच्या आसपास असलेली अन्य घरे आणि तेथे रहाणारे लोक यांनाही त्या चैतन्याचा लाभ होतो, तसेच परिसराची शुद्धी होऊ लागते. अशा प्रकारे आपल्याला संपूर्ण पृथ्वीचीच शुद्धी करायची आहे. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
१०.५.२०१५ या दिवशी पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांनी माझ्या संदर्भात सप्तर्षी जीवनाडीपट्टीचे वाचन केले. तेव्हा त्यांनी पुढे हिंदु राष्ट्र होणार आहे, असे सांगितले. यासंदर्भात काही जणांच्या मनात प्रश्न आला, हिंदु राष्ट्र होणारच आहे, तर आपण प्रयत्न कशाला करायचे ?, याचे उत्तर पुढीलप्रमाणे आहे, श्रीकृष्णाने जेव्हा केवळ उजव्या हाताच्या करंगळीवर गोवर्धन पर्वत उचलला, तेव्हा गोप-गोपींनी पर्वताला … Read more
१. दारू, सिगारेट, विडी, तंबाखू इत्यादी व्यसन लावणार्या पदार्थांचे उत्पादनच होणार नाही, असे न करता त्यांचे अनिष्ट परिणाम सरकार सांगते. २. नद्यांचे पाणी प्रदूषित होणार नाही, असे न करता जलशुद्धीकरणाचा देखावा सरकार करते. ३. मोठ्या प्रमाणात चोरटी वृक्षतोड करणार्यांवर शासन कोणतीही कारवाई करत नाही आणि झाडे लावा, झाडे जगवा सारख्या कोट्यवधी रुपयांच्या खर्चाच्या उपक्रमांतून पर्यावरण … Read more
विदेशात वस्तूंची निर्यात करायची असली, तर इतर देशांतील अनुभवी निर्यातदार विविध देशांचा दौरा करतात. याउलट भारताचे मंत्री विदेशांत भटकायचे संधी साधतात ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
धर्मामुळे मुसलमान, ख्रिस्ती आणि बौद्ध एक होतात, तर हिंदु धर्माचा अभ्यास न केलेले जात्यंध आणि बुद्धीप्रामाण्यवादी हिंदूंमध्ये जातींवरून आपसात फूट पाडतात. त्यामुळे हिंदूंना जगात काय, तर भारतातही किंमत नाही ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले