धनाचा त्याग त्याग करणे बहुतेकांना कठीण वाटते; कारण आपली भविष्यकाळातील काळजी धनच घेईल, असे त्यांना वाटते. साधनेच्या संदर्भात तन-मन-धनाच्या त्यागांपैकी धनाचा त्याग सर्वांत कनिष्ठ आहे; कारण त्याच्यामुळे स्वभावदोष निर्मूलन होत नाही, म्हणजेच मनाचा त्याग होत नाही. उलट धनाचा त्याग केल्यामुळे अहं वाढतो. त्यामुळे तनाचा त्याग करणे, म्हणजे सेवा करणे, हेही अशक्य होते. यासंदर्भातील एक अनुभव असा आहे.
एका साधकाने त्याचे घर आणि संपत्ती एका संस्थेला अर्पण केली; पण त्यामुळे त्याचा अहं न्यून झाला नाही कि त्याच्यात प्रीती निर्माण झाली नाही. त्याचे इतर एकाही साधकाशी जुळत नव्हते. शेवटी कंटाळून तो साधना सोडून द्यावी, असा विचार करू लागला !
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले
आत्मशक्ती आणि चैतन्याचे सामर्थ्य
साधना ही सर्व बंधनापलीकडे आहे
आत्मशक्तीचे सामर्थ्य !
देवाप्रतीच्या भावामुळे साधकाला कोणत्याही परिस्थितीत स्थिर रहाता येते !
साधकाने परिस्थितीला गुरु मानून तिच्याकडून शिकत राहिल्याने त्याच्यावर गुरुकृपा होऊन त्याला आनंद मिळतो !
समष्टी साधनेत व्यष्टी साधनेचे महत्त्व !