वेळ न मिळणे

जे व्यय (खर्च) करायचे आहे, ते तुम्ही गोळा (जमा) करता व जे गोळा करायचे आहे, ते व्यय करता. याउलट कसे करायचे ते शिका. भावार्थ :‘जे व्यय करायचे आहे, ते तुम्ही गोळा करता’ म्हणजे पैसा गोळा करता आणि ‘जे गोळा करायचे आहे, ते व्यय करता’ म्हणजे साधना करण्याचा बहुमूल्य वेळ वाया घालविता. ‘याउलट कसे करायचे ते … Read more

आवरण वाढण्याची कारणे आणि उपाय

स्वस्तुतीने आवरण वाढते, तर ईश्‍वराची स्तुती केल्याने आवरण घटते. आत्मानुसंधानात न राहिल्याने आपल्याभोवती त्रासदायक आवरण वाढते. त्यामुळे आत्मशक्ती उणावते (बॅटरीतील वीज न्यून होते). सतत आत्मानुसंधानात रहाणे, हाच यावरील उपाय आहे. – प.पू. पांडे महाराज, सनातन आश्रम, देवद, पनवेल.(१५.७.२०१४)

आत्मशक्तीवर शारीरिक क्षमता अवलंबून असणे

‘आमची क्षमता शरिरावर नाही, तर आत्म्यावर आहे. आत्मानुसंधानाने ईश्‍वरी शक्ती मिळते. अर्जुनाकडे शक्ती होती; पण श्रीकृष्णाने आत्मशक्ती दिल्यावर तो लढू शकला.’ – प.पू. पांडे महाराज, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१५.७.२०१४)

काळजी म्हणजे भगवंतावर अश्रद्धा !

‘आईच्या पोटात असतांना आपली काळजी कोण घेत होते ?’ सहा मासांचे (महिन्यांचे) असतांना दूध मिळेल का ? याची काळजी होती का ? मग आता का आहे ? आतापर्यंतचे आयुष्य एका क्षणात गेले. मग पुढील १० वर्षांची काळजी कशाला ? कोणत्याही प्रकारची काळजी करणे म्हणजे श्रीकृष्णावरील अश्रद्धा होय. काळजी आणि चिंता आपल्याला मागे खेचते. आजपर्यंत इतके … Read more

स्वेच्छा, परेच्छा किंवा ईश्‍वरेच्छा याप्रमाणे वागणे

हे शब्द साधनेच्या संदर्भात आहेत, हे लक्षात न घेता एका साधकाने बायकोच्या साधनेला असलेल्या विरोधाला परेच्छा समजून साधना करणे बंद केले. एका जिज्ञासूने विचारले, मित्राने दारू पिण्याचा आग्रह केल्यास परेच्छा म्हणून दारू प्यायची का ? येथे लक्षात घेतले पाहिजे की, अशा वेळी परेच्छेऐवजी ईश्‍वरेच्छा काय असेल ?, याचा विचार करावा. ईश्‍वर कधी साधना करू नको … Read more

सनातन संस्थेच्या साधकांची जलद आध्यात्मिक प्रगती होण्याचे कारण

बर्‍याच जणांना आश्‍चर्य वाटते की, फक्त सनातनचे अनेक साधक जलद गतीने प्रगती कशी करतात ? त्यांच्यापैकी अनेकजण संत कसे होतात ? यांचे उत्तर पुढीलप्रमाणे आहे. १. इतरत्र शिकवतात, तशी वर्षानुवर्षे केवळ तात्त्विक माहिती सनातनमध्ये सांगण्यात येत नाही, तर प्रत्यक्ष साधना करण्याच्या कृती शिकवण्यात येतात. २. सर्वांना एकच साधना न सांगता व्यक्ती तितक्या प्रकृती, तितके साधनामार्ग … Read more

पर्यटकांना आकृष्ट करणारे अध्यात्मशास्त्र भारतात असतांना त्याचा लाभ न घेता केवळ मौजमजेच्या जाहिराती करणारी सर्वपक्षीय केंद्र आणि राज्य सरकारे देशाला अत्यंत हानीकारक !

पर्यटकांनी आकृष्ट व्हावे; म्हणून सर्वपक्षीय केंद्र आणि राज्य सरकारे जाहिरातींवर प्रतीवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करतात. वर्ष २०१६ मध्ये केवळ केरळ राज्य ८० कोटी रुपये खर्च करणार आहे ! पाश्‍चात्त्य विचारसरणीचे अंधानुकरण करणार्‍या सरकारांनी भारतात आदर्श पर्यटन आयोजित करावे, हे अपेक्षित नाही ! अध्यात्म लाखो जणांना शेकडो वर्षे भारताकडे खेचत आहे. हा केवळ इतिहासच नाही, तर … Read more

सांप्रदायिकांनो, आपल्या संप्रदायाचा अहंकार सोडा, तरच प्रगती होईल !

हिंदुत्वासाठी कार्य करणार्‍या विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांनो, इतर संघटनाही आपल्याच आहेत, हा दृष्टीकोन ठेवा, तरच हिंदु राष्ट्राची स्थापना लवकर होईल ! अनेक सांप्रदायिकांना आपल्या संप्रदायाचा अहंकार असतो. इतर सर्व संप्रदाय तुच्छ आहेत, असे त्यांना वाटते. त्यांनी हे लक्षात घेतले पाहिजे की, विविध संप्रदाय हे भवरोगातून मुक्त व्हायचे, ईश्‍वरप्राप्तीचे विविध मार्ग आहेत. रोगापासून मुक्त होण्यासाठी ज्याप्रमाणे निरनिराळी … Read more

संत नको म्हणत असतांना त्यांना आपल्या स्वेच्छेने नमस्कार करणे अयोग्य

मी कोणाकडून नमस्कार करून घेत नाही; कारण मला मी प.पू. भक्तराज महाराज यांचा शिष्य आहे, याची सतत जाणीव असते. हे सनातनच्या साधकांना ज्ञात आहे; मात्र भेटायला येणारे नको म्हटले, तरी नमस्कार करतात. त्या नमस्कारावरून ते स्वेच्छेने भावनेपोटी नमस्कार करत असल्याचे लक्षात येते; कारण साधनेत असलेला आपल्यापेक्षा साधनेत पुढे असलेल्याचे आज्ञापालन करतो, म्हणजेच परेच्छेने वागतो. – … Read more

संतांकडे आशीर्वाद मागावा लागत नाही !

काही जण संतांकडे गेल्यावर आशीर्वाद मागतात. त्यांनी लक्षात घेतले पाहिजे की, साधना चांगली असेल, तर आशीर्वाद न मागताही मिळतो आणि साधना चांगली नसेल, तर आशीर्वाद मागूनही मिळत नाही. सनातन संस्थेला अनेक संतांनी स्वतःहून आशीर्वाद दिले आहेत, ते कार्य चांगले असल्यामुळेच ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले