सेवा कशी करावी ?

अ. सेवा करतांना अहंचे कार्य मोठ्या प्रमाणात चालू असते. अहंमुळे साधक सेवा करतांना मनाला वाटेल, तसे पालट करत असतो. यासाठी मनाचे न ऐकता उत्तरदायी साधकांना विचारून सेवा करायला हवी.

आ. सेवा करतांना सेवेत मन पूर्णपणे एकरूप केले, तरच मनाचे अर्पण होऊन मनाचे प्रारब्ध अल्प होणार आहे. त्यामुळे मानसिक त्रासही न्यून होणार आहेत.

इ. साधकांनी सेवा करतांना प्रार्थना करणे, देवाला सतत विचारणे, ‘आपल्याकडून देवच सर्व करून घेत आहे’, असा भाव ठेवून कृती करणे आणि देवाच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करणे, हे प्रयत्न वाढवायला हवेत.

आपण सेवा व्यवस्थित करत नाही. आपले प्रयत्न अपुरे असतात, तरी देव आपल्याला पुनःपुन्हा सेवेची संधी देतो. यासाठी आपल्याला पुष्कळ कृतज्ञता वाटायला पाहिजे !

– (पू.) सौ. संगीता जाधव (जून २०१७)

Leave a Comment