साधनेने व्यक्तीचा अहं अल्प होऊ लागल्यावर तिच्या जीवनाचे सारथ्य भगवंतच करतो !

व्यक्तीमधील अहंचा जोपर्यंत लय होत नाही, तोपर्यंत त्या व्यक्तीच्या देहाचा सारथी हा ‘मी’रूपी अहंच असतो, म्हणजेच मनुष्याच्या जीवनाला ‘मी’रूपी मायाच एक प्रकारे चालवत असते. ‘मी’रूपी सारथी असलेल्या गाडीला सुख-दुःखाची चाके असतात. साधनेने मनुष्याचा अहं अल्प होऊ लागला की, ‘जीवनाचे सारथ्य मग भगवंतच करतो. भगवंत चालवत असलेली ही देहरूपी गाडी मात्र सच्चिदानंदाकडे (सत् चित् आनंदाकडे) प्रवास करू लागते; म्हणून जीवनात माया त्यागून साधना करणे महत्त्वाचे असते, तरच आपल्या जीवनाच्या गाडीला भगवंतासारखा सारथी मिळतो.

– श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

Leave a Comment