‘सर्व ईश्वरेच्छेने, म्हणजे आपल्या कल्याणासाठीच होत आहे’, असे केव्हा समजायचे ?

‘गुरु किंवा ईश्‍वर यांच्या चरणी पूर्ण समर्पित झाल्यावर स्वतःविषयीचे विचार पुष्कळ अल्प होतात. आपण सतत ईश्‍वरी अनुसंधानात असलो, तर ईश्‍वराचेही आपल्याकडे लक्ष असते. गुरुचरणी पूर्ण समर्पितता आणि सतत ईश्‍वरी अनुसंधान, असे दोन्ही असल्यावर आपल्याकडून होणारी कृती ईश्‍वरेच्छेने होते. अशी अवस्था असतांना एखाद्या वेळी आपल्या संदर्भात काहीतरी प्रतिकूल जरी घडले, तरी ‘ते ईश्‍वरेच्छेनेच झाले आहे; म्हणून कल्याणकारकच आहे’, असा विचार मनात येतो. त्यामुळे प्रतिकूल घडल्याविषयी वाईट वाटत नाही. यावरून गुरुचरणांशी पूर्ण समर्पित असणे आणि सतत ईश्‍वरी अनुसंधानात रहाणे यांचे महत्त्वही लक्षात येते.’

(पू.) श्री. संदीप आळशी

Leave a Comment