‘आपले आध्यात्मिक जीवन नदीच्या पाण्याच्या प्रवाहासारखे असले पाहिजे. पाणी वहात असतांना या प्रवाहाला वाटेत असंख्य दगडधोंडे, माती, झाडे अडथळे आणतात. अनेक गावांतून वहात वहात नदी पुढे पुढे जात असते आणि अगदी शेवटी कधी ना कधी ती समुद्राला जाऊन मिळतेच. येथेच तिचा प्रवास थांबतो. रोजच्या जीवनातही आपण असेच वहात राहिले पाहिजे. ‘नित्यनूतन सनातन’ या उक्तीप्रमाणे जीवनात नवनवीन शिकत राहिले पाहिजे’, हेच परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आम्हाला शिकवले आहे. आपले मनही असेच आहे. नवनवीन शिकण्यातून मनालाही आनंद मिळतो.
आपण जीवनात न शिकता एकाच ठिकाणी थांबलो, तर आपले जीवन पाण्याच्या साठलेल्या डबक्याप्रमाणे होते. या डबक्यात कालांतराने जीवजंतू तयार होतात. एकच एक करत राहिलो, तर त्याचा मनाला कंटाळा येऊन मनही एखाद्या डबक्यासारखेच बनते. यातच जीवजंतूंसारख्या प्रतिक्रिया आणि विकल्प तयार होतात. परिणामी मन निराशेत जाऊ लागते; म्हणूनच परात्पर गुरु डॉ. आठवले कायम म्हणतात, ‘प्रतिदिन शिका आणि नदीच्या वहात्या पाण्यासारखी प्रगती करून एक दिवस मोक्ष नावाच्या सागरात जाऊन विलीन व्हा !’
– पू (सौ.) अंजली गाडगीळ
खरे देवदर्शन !
देहत्याग केल्यावरही साधना होण्यासाठी आताच मनावर साधनेचा संस्कार करा !
व्यक्तीपूजेपेक्षा साधनेला महत्त्व !
नकारात्मक न बोलण्याचे लाभ
‘मी’ नष्ट झाला की भगवंत प्रकटतो !