काळ हा आपल्याला अध्यात्म शिकवणारा उत्तम शिक्षक आहे. तो आपल्यासाठी परिस्थिती, परिणाम, प्रारब्धामुळे येणार्या सुख-दुःखाच्या गोष्टी असे सर्व घेऊन येत असतो. काळाला ईश्वर समजून सामोरे गेले, तर जीवनातील नित्य घडणार्या गोष्टींचे काहीच वाटत नाही. त्यामुळे आपल्याला प्रारब्धावर सहजतेने मात करता येते.
देवाप्रतीच्या भावामुळे साधकाला कोणत्याही परिस्थितीत स्थिर रहाता येते !
साधकाने परिस्थितीला गुरु मानून तिच्याकडून शिकत राहिल्याने त्याच्यावर गुरुकृपा होऊन त्याला आनंद मिळतो !
समष्टी साधनेत व्यष्टी साधनेचे महत्त्व !
खरा अभ्यास !
भक्ताच्या निर्विचार अवस्थेत देव त्याचा विचार करतो.