साधना न केल्याने शासनकर्त्यांच्या हातून पापकर्म घडून लोकशाहीची दयनीय स्थिती होणे

पूर्वीच्या काळी राजेसुद्धा साधना करत असल्याने ते धर्माचरणी असणे; परंतु सध्याचे राजकारणी साधना करत नसल्याने त्यांच्या हातून सतत पापच घडत रहाणे

‘शेवटी माणूस त्याच्या स्वभावदोषाप्रमाणेच वागतो. स्वभावदोष-निर्मूलन करणे, म्हणजेच ‘साधना करणे’, हाच यावर उपाय आहे. पूर्वीच्या काळी राजेसुद्धा साधना करत असल्याने ते धर्माचरणी होते आणि त्याप्रमाणे ते राज्यकारभार करत होते. राजेसुद्धा संन्यास घेऊन साधनेसाठी अरण्यात जात असत; कारण ‘मानवाचा जन्म केवळ ईश्‍वरप्राप्तीसाठीच झाला आहे’, हे त्यांना ज्ञात होते. त्यामुळे स्वतःच्या हातून पापकृत्य न होता अधिकाधिक धर्माचरण घडण्यासाठी ते प्रयत्नरत रहात असत. यासाठी पूर्वीच्या राजांना ‘गोब्राह्मणप्रतिपालक’ संबोधले जात असे, म्हणजेच त्यांचा कल सत्त्वगुणाकडे असे; परंतु सध्याचे राजकारणी अशा दृष्टीने कृत्य करतच नाहीत. त्यामुळे त्यांच्या हातून सतत पापच घडत रहाते आणि हे त्यांच्या लक्षातही येत नाही.’

Leave a Comment