साधनामार्गात कितीही अडथळे आले, तरी आपल्यात जिद्द, चिकाटी, श्रद्धा आणि शरणागत भाव असेल, तर आपण सर्व अडथळे पार करून ईश्वतरप्राप्तीचे ध्येय गाठू शकतो !

एका साधकाने भ्रमणभाषवर चलचित्र पाठवले होते. त्यामध्ये एक बदक आपल्या ११ पिल्लांसह आहे. बदक आपल्या अन्नाच्या शोधात आपल्या छोट्या छोट्या पिल्लांना घेऊन जात आहे. मार्गात पायर्‍या लागतात. बदक त्या चढून सहज वर जाते; मात्र बदकाच्या पिल्लांना पायर्‍या चढणे सहज जमत नाही. ती छोटी छोटी पिल्ले एक एक पायरी चढण्यासाठी पुष्कळ श्रम घेतात. त्यात ती एक एक पायरी चढण्यासाठी वर उडी मारतांना कितीतरी वेळा खाली पडतात, तरीही ती आपली जिद्द सोडत नाहीत. ती परत उठतात आणि पायरीच्या कुठच्या बाजूने आपल्याला वर उडी मारता येईल, याचा अंदाज घेत शेवटी बदकाची ती सर्व पिल्ले उडी मारत मारत पायर्‍या चढून वर आपल्या आईपाशी जातात. त्यांची आई आपली सर्व पिल्ले येईपर्यंत थांबलेली असते. सर्व पिल्ले आल्यावर ती पुढील मार्गक्रमण करते.

हे चलचित्र माझ्या मनःपटलावर बराच वेळ होते. या गोष्टीतून लक्षात आले की, साधनेचा मार्गही असाच असतो. त्यात कितीतरी अडथळे येतात. ते सर्व पार करण्यासाठी त्या पिल्लांसारखी आपल्यात जिद्द, चिकाटी, श्रद्धा आणि शरणागत भाव असेल, तसेच आपले ध्येय ठरलेले असेल आणि आपण आपले क्रियमाण योग्य प्रकारे वापरले, तर आपणही सर्व अडथळे पार करून आपले ईश्‍वरप्राप्तीचे ध्येय गाठू शकतो. ईश्‍वर आपली वाट बघतच असतो.

गुरुदेवांच्या चरणी अर्पण !

Leave a Comment