आतापर्यंत कोणत्याही वाईट गोष्टीच्या संदर्भात आपण शारीरिक, मानसिक कि आध्यात्मिक कारणामुळे त्रास होत आहे, याचा विचार करून त्यानुसार उपाययोजना करत होतो. हे व्यष्टी जीवनाशी संबंधित असते. आता समष्टी जीवनातील आपत्काळ आल्यामुळे अवर्षण, आतंकवाद अशा त्रासांना सामोरे जावे लागत आहे. व्यष्टी जीवनाशी संबंधित त्रासांसंदर्भात आपण उपाय करतो, तसे समष्टी जीवनाशी संबंधित त्रासांसंदर्भात उपाय सांगता येत नाहीत. तेव्हा प्रतिकूल काळ संपेपर्यंत वाट पहाणे एवढेच आपल्या हातात असते. त्या काळात साधनारत राहिल्यासच येणार्या भीषण काळाला आपण तोंड देऊ शकू. तसे करता यावे; म्हणून आताच साधना वाढवणे आवश्यक आहे. – डॉ. आठवले (चैत्र कृष्ण पक्ष ५, कलियुग वर्ष ५११५ (३०.४.२०१३))
खरे देवदर्शन !
देहत्याग केल्यावरही साधना होण्यासाठी आताच मनावर साधनेचा संस्कार करा !
व्यक्तीपूजेपेक्षा साधनेला महत्त्व !
नकारात्मक न बोलण्याचे लाभ
‘मी’ नष्ट झाला की भगवंत प्रकटतो !