‘देवाला ‘प्रत्येक जीव माझ्याकडे परत जावा’, याची तळमळ अधिक असते. त्यासाठी तो प्रत्येक जिवाला आवश्यक ते वेळोवेळी देतच असतो. त्यामुळे आपण देवाकडे कधी काही मागण्याची आवश्यकताच उरत नाही. अशा परिस्थितीमध्ये देवाकडे काही मायेतील गोष्टी मागणे, ही एक स्वेच्छा होते.
साधना करतांना मात्र आध्यात्मिक दृष्टिकोनातून देवाला प्रार्थना करणे, हा केवळ ईश्वरावरील श्रद्धा वाढण्यासाठीचा साधनेतील एक टप्पा असतो. आध्यात्मिक पातळी वाढली, की ‘सर्व देवाच्या नियोजनाप्रमाणे होणार आहे आणि देव आवश्यक ते देणारच आहे’, ही ठाम श्रद्धा निर्माण झाल्यावर प्रार्थना करणेही थांबते आणि केवळ कृतज्ञताच व्यक्त होऊ लागते.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले