‘भगवंताच्या नामाचे महत्त्व सांगणे, ‘ते कसे घ्यायचे ?’, हे शिकवणे’, हेच खरे शिक्षण आहे. मृत्यूनंतर डोक्यातील ‘गणित आणि विज्ञान’ या सर्व जडातील विषयांची राखरांगोळी होते. केवळ शाश्वत असणारे देवाचे नामच त्या जिवाच्या समवेत जाते. शाळेतील गुरूंना अनन्यसाधारण महत्त्व आहे. उत्तम गुरु हा जीवनातील खरा मार्गदर्शक आहे. ‘गुरूंचे महत्त्व जे शाळा शिकवत नाही, ती शाळा आणि ते शिक्षण काय कामाचे ?’, अशा जडातील निरर्थक शिक्षणाने लोकांचे अनेक जन्म वाया जातात. खरी शाळा ही मोक्षप्राप्ती करून देणारी आहे. आपल्या संस्कृतीमध्ये शाळेला मंदिराचा दर्जा दिला आहे. शाळेला ‘शिक्षण मंदिर’, असे संबोधले जाते. आजच्या समाजाला मोक्षप्राप्ती करून देणार्या शिक्षण मंदिरांची नितांत आवश्यकता आहे.
– श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ
खरे देवदर्शन !
देहत्याग केल्यावरही साधना होण्यासाठी आताच मनावर साधनेचा संस्कार करा !
व्यक्तीपूजेपेक्षा साधनेला महत्त्व !
नकारात्मक न बोलण्याचे लाभ
‘मी’ नष्ट झाला की भगवंत प्रकटतो !