साधकांनो आणि हिंदुत्वनिष्ठांनो, चैतन्यशक्तीला घेऊन साधना करा !

चैतन्य हे खरे कार्य करणारे आहे. (चैतन्यालाच राम किंवा कृष्ण अशी भगवंताची नावे दिली आहेत.) त्याच्या स्मरणात रहाणे, म्हणजे नामस्मरण ! त्याच्याशी सतत संग ठेवणे, म्हणजे सत्संग ! त्याच्या स्मरणात आणि सत्संगात राहून केलेले प्रत्येक कार्य ही सत्सेवा आहे. सत्सेवा झाल्यावर दुर्गुण रहात नाहीत. चैतन्यशक्ती असल्यास अनिष्ट शक्ती कार्य करू शकत नाही. भगवंतच सर्वत्र आहे. … Read more

भावजागृतीचे प्रयत्न नीट जमत नाहीत; म्हणून निराश होऊ नका, तर कर्म आणि ज्ञान या साधनामार्गांनुसार प्रयत्न करा !

‘काही साधकांना सतत भावाच्या अनुसंधानात रहाणे, देवाशी बोलणे इत्यादी भावजागृतीचे प्रयत्न नीट जमत नाहीत; म्हणून निराशा येते. भक्तीमार्गी साधकाला हे प्रयत्न चांगले जमतात; पण कर्ममार्गी आणि ज्ञानमार्गी साधकाला ते भक्तीमार्गी साधकाप्रमाणे जमू शकणार नाहीत. परात्पर गुरु डॉक्टरांनी निर्मिलेला ‘गुरुकृपायोग’ हा सर्व साधनामार्गांना सामावून घेणारा आहे. परात्पर गुरु डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे गुरुकृपायोगात भक्ती, कर्म आणि ज्ञान या … Read more

मना-विरुद्ध-नाम, तेच खरे काम !

‘मना’चे उलटे (खरे पहाता हेच सुलटे आहे) केले, तर ‘नाम’ होते. मनाला नामात गुंतवले तर उत्तम. तेच खरे कामास येते. नाम आहे म्हणून मनुष्य आहे. मनाकडे पहाण्याऐवजी, म्हणजेच मनाच्या विकारांना कुरवाळण्याऐवजी नामाकडे लक्ष दिले, तर देवाची कृपा झाल्याशिवाय रहाणार नाही. मन म्हणजे बाळ आणि जीव म्हणजे आई आहे. आई काळजी घेते, तसे जिवाने मनाची काळजी … Read more

भावपूर्ण आणि परिपूर्ण सेवा करण्याचे महत्त्व

‘कोणतीही कृती परिपूर्ण केली, तर ती एकप्रकारे साधनाच होते’, हा कर्मसिद्धांत परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांना शिकवला आहे. सेवा भावपूर्ण केली, तरच ती परिपूर्ण होऊ शकते. अशी सेवा केल्याने आपण गुरूंचे मन लवकर जिंकू शकतो. गुरूंचे मन जिंकले की, गुरुकृपा लवकर होऊन अध्यात्मात शीघ्र प्रगती होते. परिपूर्ण सेवा केल्याने साधक अव्यक्त भावाच्या टप्प्याला लवकर … Read more

भगवंताच्या दृष्टीत समत्व असते !

‘भगवंताच्या दृष्टीत समत्व असते. त्याच्यात भेद नसतो. तो मुखवट्याकडे (शरिराकडे / स्थूलदेहाकडे) पहात नाही. त्यातील आत्मतत्त्वाला पहातो. यासाठी बोलतांना आपण मुखवटे (स्थूलदेह) बाजूला करून बोलले पाहिजे. आत्मस्वरूपाशी बोलले पाहिजे; कारण मुखवट्यामध्ये विकार असतात.’ ‘जग तमोगुणी झाल्यामुळे तमोगुणानेच त्याला उत्तर दिले पाहिजे.’ – प.पू. परशराम पांडे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२४.४.२०१५)

देवतांचा आदर्श ठेवून संकटांना पुरून उरूया !

‘शिवाला प्राप्त करून घेण्यासाठी देवी सतीला अनेक संकटांचा सामना करावा लागला. प्रभु श्रीरामाला १४ वर्षे खडतर वनवास भोगावा लागला. बालपणातच श्रीकृष्णाचा वध करण्यासाठी कंसाने आणि हनुमानाचा वध करण्यासाठी रावणाने अनेक असुरांना त्यांच्यावर धाडले. संकटे तर देवतांनाही चुकली नाहीत; पण देवता या सार्‍या संकटांना पुरून उरल्या. संकटांतच आपली श्रद्धा, धैर्य, संयम आणि विवेक यांची खरी परीक्षा … Read more

हल्ली वृद्ध आई-वडिलांची काळजी त्यांची मुले घेत नाहीत. त्यांना वृद्धाश्रमात…

हल्ली वृद्ध आई-वडिलांची काळजी त्यांची मुले घेत नाहीत. त्यांना वृद्धाश्रमात पाठवतात. त्याचप्रमाणे शेतकरी वृद्ध झालेल्या गायी-बैलांना खाटिकखान्यात पाठवतात ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (२५.१.२०१७)

स्वातंत्र्यवीर सावरकर, आम्हाला तुमचा अभिमान आहे ! आम्हीही संकटांपुढे हार…

स्वातंत्र्यवीर सावरकर, आम्हाला तुमचा अभिमान आहे ! आम्हीही संकटांपुढे हार न मानता शेवटपर्यंत झुंजतच राहू !! देशाच्या स्वातंत्र्यासाठी महान क्रांतीकार्य करण्यासह अंदमानातील कारागृहात असतांना हिंदु बंदीवानांवर होणार्‍या अत्याचारांविरुद्ध तुम्ही दिलेला लढा, अतोनात शारीरिक आणि मानसिक यातना सोसूनही देशासाठी मृत्यूसमोर हार न पत्करण्याचा केलेला दृढ निर्धार, अंदमानातील अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही हिंदूंच्या शुद्धीकरणाची आणि संघटनाची केलेली खटपट, … Read more

पूर्णस्वरूप श्रीकृष्णाशी एकरूप होण्यासाठी सातत्याने करत असलेले प्रयत्न म्हणजेच साधना ! – प.पू. पांडे महाराज

या विश्‍वात श्रीकृष्णाविना दुसरे काहीच नाही; म्हणून तो अनन्य आहे. अशा शाश्‍वत तत्त्वाशी एकरूप होऊन त्याच्या पूर्ण तत्त्वाशी संलग्न होणे, म्हणजे साधना. तो आणि मी, माझा जीव आणि ते शिवस्वरूप एक होण्यासाठी सतत त्याचे चिंतन करावे. जीवनातील प्रत्येक कर्म त्याच्या अनुसंधानात राहून करावे. प्रत्येक कार्य आणि कृती त्याची भावपूर्ण सेवा करत आहे, हा भाव ठेवून … Read more

साधना करण्यासंदर्भातील स्वेच्छा ही स्वेच्छा नसून ईश्‍वरेच्छाच असणे !

साधनेत सांगतात, स्वेच्छा नको. प्रथम सर्व परेच्छेने करण्यास शिका. नंतर ईश्‍वरेच्छा काय आहे ते कळेल आणि त्यानुसार सर्व करा. असे जरी असले, तरी साधना करण्यासाठी नोकरीच काय, तर घरदारही सोडण्याचा विचार करण्याची स्वेच्छा झाली, तरी ती योग्यच आहे. ही स्वेच्छा नसून ईश्‍वरेच्छाच असते. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१.११.२०१६)