भावपूर्ण आणि परिपूर्ण सेवा करण्याचे महत्त्व

‘कोणतीही कृती परिपूर्ण केली, तर ती एकप्रकारे साधनाच होते’, हा कर्मसिद्धांत परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांना शिकवला आहे. सेवा भावपूर्ण केली, तरच ती परिपूर्ण होऊ शकते. अशी सेवा केल्याने आपण गुरूंचे मन लवकर जिंकू शकतो. गुरूंचे मन जिंकले की, गुरुकृपा लवकर होऊन अध्यात्मात शीघ्र प्रगती होते.

परिपूर्ण सेवा केल्याने साधक अव्यक्त भावाच्या टप्प्याला लवकर जाऊ शकतो. साधकात व्यक्त भाव जरी असला, तरी अव्यक्त भाव निर्माण झाल्याविना ईश्‍वरप्राप्ती होऊ शकत नाही; म्हणून साधकांनी भावपूर्ण अन् परिपूर्ण सेवा करण्याकडे लक्ष दिले पाहिजे.’

– (पू.) श्री. संदीप आळशी (१६.३.२०१७)

Leave a Comment