साधकांनो, ‘चैतन्याद्वारेच कार्य होते’, हे लक्षात घ्या आणि हिंदु राष्ट्र निर्मितीसाठी सिद्ध व्हा !

‘स्वतः दृढ निश्‍चय करून उठल्यासच कार्य होते. दुसर्‍याकडून अपेक्षा करून ते होत नाही. स्वतःवरील आवरण काढले, तरच चैतन्य दिसेल आणि चैतन्यात इतके सामर्थ्य असते की, तेच कार्य करतांना दिसून येते. अशा रितीने जेव्हा मोठ्या संख्येने साधक सिद्ध होऊन कार्यरत होतात, तेव्हा दावाग्नी पेटून रज-तमात्मक अशा वातावरणातील अनिष्ट शक्तींचे निर्मूलन सहज-सुलभ रितीने होते. अशा प्रकारे हिंदु … Read more

नामस्मरण म्हणजे काय ?

अ. ‘मी जिवंत आहे. माझा प्रत्येक क्षण भगवंताच्या अनुसंधानात आहे’, हा विचार सतत असणे, हे खरे जीवन आहे. याला ‘नामस्मरण’ म्हणतात. आ. भगवंताच्या स्मरणात घडलेले प्रत्येक कर्म, म्हणजे नामस्मरण !’

परात्पर गुरु पांडे महाराज यांचे अनमोल विचारधन

‘भगवंताची सेवा करून ती त्याला अर्पण करणे आणि त्यातून आनंद घेणे’, हे खरे जीवन ! ‘ईशावास्योपनिषदामध्ये म्हटले आहे, ‘भगवंत सर्वत्र इतका ठासून भरला आहे की, त्यात एकही अणूमात्र अवकाश नाही. त्यामुळे ‘तो नाही’, हा प्रश्‍नच येत नाही.’ त्यामुळे ‘कृपा’ हा प्रश्‍नच उद्भवत नाही. यासाठी तो म्हणतो, ‘तुला दिलेले शरीर, चित्त, मन, बुद्धी, अहं, पाच कर्मेंद्रिये, … Read more

हिंदु राष्ट्राची पायाभरणी आणि दिशा ईश्वरी ज्ञानावर आधारित असणे

वर्ष २०२३ मध्ये हिंदूंना हिंदु राष्ट्र मिळाल्यानंतर आता पुढे काय ?, असा प्रश्‍न पडणार आहे; कारण हे हिंदु राष्ट्र चालवायचे कसे ?, याचे ज्ञान ना धर्मप्रेमी राज्यकर्त्यांना असणार आहे ना प्रजेला. त्यांना याविषयीची दिशा असणे आवश्यक आहे. त्यासाठी ईश्‍वरी ज्ञानाचा पाया असणे आवश्यक आहे. हे कार्य पूर्वीच्या ऋषींनी करून ठेवलेले आहे. त्यासाठी ऋषींनी अर्थशास्त्र, न्यायशास्त्र, … Read more

छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे शत्रूंवर जरब बसवणारे शासनकर्ते हवेत !

‘आपण आतापर्यंत पाकिस्तानबरोबरची सर्व युद्धे जिंकली, तरी आज पाक जिहादी हे आतंकवाद, बनावट चलन आदी माध्यमांतून आपल्याशी युद्ध करतच आहे. बांगलादेशाला स्वतंत्र आपण केले, तरी आज बांगलादेशात हिंदूंवर अनन्वित अत्याचार होत आहेत. आपल्या शेजारच्या राष्ट्रांवर आपण जरब न बसवल्याचाच हा परिणाम आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी शत्रूंवर एवढी जरब बसवली होती की, महाराज आग्रा येथे औरंगजेबाच्या … Read more

भ्रष्टाचारी कर्मचा-यांच्या कुटुंबियांनो, भ्रष्टाचा-यांना उघड करण्याची साधना करा !

‘नोकरी किंवा धंदा करणार्‍या भ्रष्टाचार्‍याची मासिकप्राप्ती त्याच्या कुटुंबियांना ज्ञात असते. एखादा मासिकप्राप्तीपेक्षा अधिक पैसे घरी आणायला लागला किंवा खर्च करू लागला, तर त्याचा निष्कर्ष एकच असतो आणि तो म्हणजे ‘ती व्यक्ती भ्रष्टाचार करून पैसे मिळवत आहे. तिच्या पापाच्या पैशांचा उपभोग घेणे, हे पाप आहे, तर तिचा गुन्हा उघडकीस आणणे, हे पुण्य आहे आणि समष्टी साधनाही … Read more

भ्रष्टाचा-यांच्या राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी कुटुंबियांना आवाहन !

‘व्यक्तीचे नोकरीच्या ठिकाणचे वेतन राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी गृहिणी, त्यांची युवक मुले आणि नातेवाईक यांना ज्ञात असते. अपेक्षेपेक्षा अधिक रक्कम ते घरी आणत असले, तर ते ‘भ्रष्टाचाराने पैसे मिळवत आहेत’, हे लक्षात घ्या. हा राष्ट्राच्या संदर्भात अक्षम्य गुन्हा आहे ! गुन्ह्याचे मूक साक्षीदार बनून तुम्ही गुन्ह्यात सहभागी होऊ नका, तसेच भ्रष्टाचाराने मिळवलेले पैसे पापाचे पैसे असतात. … Read more

हिंदु धर्माची किंमत नसलेले भारतातील हिंदू !

‘उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला प्रयाण करतात. त्याप्रमाणे साधना आणि हिंदु धर्म यांच्या शिक्षणासाठी जगभरचे जिज्ञासू आणि साधक भारतात येतात. असे असले, तरी भारतातील हिंदूंना हिंदु धर्माची किंमत नाही.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (२५.१.२०१७)

स्वेच्छा लवकर नष्ट करण्याच्या संदर्भात आश्रमात रहाण्याचे महत्त्व

‘दिवसभर साधकाच्या हातून ज्या कृती होतात, त्या स्वेच्छेने होत असतात. स्वेच्छा नष्ट करण्यासाठी आश्रमात रहाणे हा सर्वांत सोपा मार्ग आहे. आश्रमात राहिल्यावर प्रत्येक गोष्ट कोणीतरी सांगितल्याप्रमाणे करावी लागते. त्यामुळे स्वेच्छा लवकर नष्ट होण्यास साहाय्य होते.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (२४.२.२०१७)

अहंभाव असलेले लेखापरीक्षक आणि अहंभावशून्य भगवंत

‘लेखापरीक्षक काही व्यक्तींचे लेखा परीक्षण करतात आणि त्याचा त्यांना अहंभाव असतो. याउलट भगवंत अनंत कोटी ब्रह्मांडांतील प्रत्येक जिवाचा क्षणाक्षणाचा हिशोब (अकाऊंट) ठेवतो, तरी तो अहंशून्य आहे !’ आहे !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (६.१२.२०१६)