हिंदु राष्ट्राची पायाभरणी आणि दिशा ईश्वरी ज्ञानावर आधारित असणे

वर्ष २०२३ मध्ये हिंदूंना हिंदु राष्ट्र मिळाल्यानंतर आता पुढे काय ?, असा प्रश्‍न पडणार आहे; कारण हे हिंदु राष्ट्र चालवायचे कसे ?, याचे ज्ञान ना धर्मप्रेमी राज्यकर्त्यांना असणार आहे ना प्रजेला. त्यांना याविषयीची दिशा असणे आवश्यक आहे. त्यासाठी ईश्‍वरी ज्ञानाचा पाया असणे आवश्यक आहे. हे कार्य पूर्वीच्या ऋषींनी करून ठेवलेले आहे. त्यासाठी ऋषींनी अर्थशास्त्र, न्यायशास्त्र, राजा आणि प्रजा यांसाठीची मार्गदर्शक सूत्रे लिहून ठेवलेली आहेत. त्याचा उपयोग हिंदूंना होणार आहे; पण आताचा काळ आणि परिस्थिती यानुरूप बहुतांश सूत्रे ईश्‍वरी संकेतानुसार नव्याने लिहावी लागणार आहे. ज्यामुळे भारतात हिंदु राष्ट्राची घडी लवकर आणि योग्य तर्‍हेने बसेल. हे कार्य सनातन संस्थेतील एका द्रष्ट्याच्या हातून घडणार आहे.