परात्पर गुरु पांडे महाराज यांचे अनमोल विचारधन

‘भगवंताची सेवा करून ती त्याला अर्पण करणे आणि त्यातून आनंद घेणे’, हे खरे जीवन !

‘ईशावास्योपनिषदामध्ये म्हटले आहे, ‘भगवंत सर्वत्र इतका ठासून भरला आहे की, त्यात एकही अणूमात्र अवकाश नाही. त्यामुळे ‘तो नाही’, हा प्रश्‍नच येत नाही.’ त्यामुळे ‘कृपा’ हा प्रश्‍नच उद्भवत नाही. यासाठी तो म्हणतो, ‘तुला दिलेले शरीर, चित्त, मन, बुद्धी, अहं, पाच कर्मेंद्रिये, पाच ज्ञानेंद्रिये इत्यादींनी मिळून तू माझी सेवा कर. भौतिक आणि पारमार्थिक दृष्टीने या सृष्टीचा उपभोग घे अन् मला अर्पण कर. माझ्या इंद्रियांनी झालेली सेवा ही माझ्या मालकीची आहे. ती मलाच अर्पण कर आणि आनंद घे. तिची कामना ठेवू नकोस. ती सर्व मला अर्पण कर, म्हणजेच तू मुक्त होऊन आनंद घेत रहा. यामुळे तुला जन्म-मरणाच्या फेर्‍यांत अडकावे लागणार नाही. हे खरे जीवन आहे.’

Leave a Comment