छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे शत्रूंवर जरब बसवणारे शासनकर्ते हवेत !

‘आपण आतापर्यंत पाकिस्तानबरोबरची सर्व युद्धे जिंकली, तरी आज पाक जिहादी हे आतंकवाद, बनावट चलन आदी माध्यमांतून आपल्याशी युद्ध करतच आहे. बांगलादेशाला स्वतंत्र आपण केले, तरी आज बांगलादेशात हिंदूंवर अनन्वित अत्याचार होत आहेत. आपल्या शेजारच्या राष्ट्रांवर आपण जरब न बसवल्याचाच हा परिणाम आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी शत्रूंवर एवढी जरब बसवली होती की, महाराज आग्रा येथे औरंगजेबाच्या कैदेत ३ मास अडकले असतांनाही त्या काळात स्वराज्यावर कोणीही आक्रमण केले नव्हते; उलट जिजामातेच्या नेतृत्वाखाली स्वराज्यात वाढच झाली होती ! ‘आम्हाला शिवाजी महाराजांचा अभिमान आहे’, असे सांगणारे शासनकर्ते शिवरायांच्या या आदर्शानुसार कृती करतील का ? असे शासनकर्ते सर्वत्र मिळण्यासाठी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेला पर्याय नाही !’

– (पू.) श्री. संदीप आळशी (१४.४.२०१७)