खरी भावजागृती होण्यासाठी प्रयत्नशील असायला हवे !

आपण वरवर ‘भावजागृती झाली’, असे म्हणतो. हा भगवंताचा, म्हणजेच परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा अवमान आहे. त्यांच्या पूजनीय आत्मस्वरूपाचे मूल्य जाणून आपण त्याची जपणूक करू, तेव्हा खरोखरची भावजागृती होईल; याला ‘पूजा’ असे म्हणतात. त्यांचे पूजनीय पद जपणे, याला खरी पूजा म्हणतात आणि अशा प्रकारे केलेल्या पूजेद्वारे होणारी भावजागृती ही खरी भावजागृती होय.’

स्वतःतील ‘मी’ ला विसरून चैतन्याशी अनुसंधान ठेवा !

साधकांनो, आपत्काळ चालू झाल्याची चिन्हे आता दिसून येत आहेत. विविध माध्यमांतून साधकांना होणारे त्रास, हे त्याचेच लक्षण आहे. या त्रासातही आनंदी राहून परिस्थितीवर मात करण्यासाठी साधनेद्वारे चैतन्याचा जागर करा ! स्वतःतील चैतन्याचा जागर कसा करायचा ? स्वतःतील ‘मी’ ला विसरून चैतन्याशी अनुसंधान ठेवा ! आपण देवीचे तत्त्व जागृत होण्यासाठी तिचा जागर करतो. त्याचप्रमाणे आपल्यातील ‘मी’ … Read more

साधकांनो, चुका टाळण्यासाठी साधनेची खरी प्रक्रिया कृतीत आणा !

साधनेची खरी प्रक्रिया जाणून त्याप्रमाणे कृती करा ! ‘साधकांनो, परात्पर गुरु डॉ. आठवले म्हणजे भगवंताचा अंश आहे’, असे वाटले पाहिजे. चुका झाल्याने त्यांच्या आत्म्याला दु:ख होते. हे जोपर्यंत आपल्याला समजत नाही, तोपर्यंत आपल्या हातून चुका होत रहाणार. भगवंताला, म्हणजे आत्म्याला सुख मिळावे; म्हणून आनंदी राहिले पाहिजे. हे आता सर्वांना समजले पाहिजे. आत्म्याला त्रास होऊ नये; … Read more

साधकांनो, चुका टाळण्यासाठी साधनेची खरी प्रक्रिया कृतीत आणा !

२१.५.२०१७ या दिवशी दैनिक सनातन प्रभातच्या संपादकीय लेखामध्ये एका व्यक्तीचे नाव चुकीचे लिहिले गेले. या प्रसंगाला अनुसरून परात्पर गुरु पांडे महाराज यांनी चुका का होतात ?’ आणि प्रायश्‍चित्ताविषयी कसा दृष्टीकोन ठेवावा’, याविषयी सांगितलेली सूत्रे पुढे देत आहे. श्रीरामाप्रमाणे प्रायश्‍चित्त घ्यायला हवे ! ‘सध्या साधक कितीही मोठी चूक झाली, तरी लहान-सहान प्रायश्‍चित घेतात. चित्तावर पुन्हा चूक … Read more

साधकांनो, आनंद आपल्यातच आहे, हे जाणा !

‘आनंद’ हा प्रत्येक जिवाचा स्थायी भाव आहे. खरेतर जीव या आनंदालाच शोधत असतो; परंतु भ्रमामुळे त्याला आपल्यातच ‘आनंद’ आहे, हे ठाऊक नसते. त्यामुळे त्याची स्थिती कस्तुरी मृगाप्रमाणे होऊन तो विविध मार्गांनी आनंद प्राप्त करण्याच्या प्रयत्नांत रहातो. त्याच्यातील स्वभावदोषांमुळे तो दुष्कृत्यांकडे वळतो. साधनेमुळे गुुरुप्राप्ती झाल्यावर ‘खरा आनंद कशात आहे’, हे कळायला लागते आणि जीव महानंदात राहू … Read more

भूमीत जीवतत्त्व आहे !

‘बिजातून झाड उगवते, याचा अर्थ त्यात प्राणशक्ती आहेच. भूमीत जीवतत्त्व असल्याने ते वाढते. १० प्रकारची झाडे असतील, तर भूमी १० प्रकारची वेगवेगळी पोषकद्रव्ये देते.याचा अर्थ भूमीत जीवतत्त्व आहे.’

कर्माच्या सहस्रो पटींनी भगवंताशी संलग्नता वाढवायला हवी !

अशक्य ते शक्य होते; मात्र ते त्या प्रमाणात पाहिजे. ज्या प्रमाणात कर्म असेल, त्याच्या सहस्रो पटींनी भगवंताशी संलग्नता वाढवायला पाहिजे. ‘एकदा नाम घेतले की, काम होऊन जाईल’, असे नसते. नाम कर्माच्या सहस्रो पटींत पाहिजे. नामाचा पुष्कळ साठा पाहिजे. तुमची अधिकोशात जितकी जमा अधिक, तितका तुम्हाला तिचा आधार वाटतो. असे असूनही अधिकोशात जमा असलेले पैसे ऐन … Read more

भगवंताच्या अनुसंधानात राहून केलेल्या कर्मावर भगवंताचे नियंत्रण रहाणे

कोणत्याही गोष्टीवर नियंत्रण ठेवणे हे केवळ भगवंताच्या हातात असते. भगवंताच्या अनुसंधानात राहिले की, भगवंत तिच्यावर नियंत्रण ठेवतो; कारण ते त्याचे नियोजन आहे. तो निर्माता आहे. तो अंतर्बाह्य दोन्ही ठिकाणी आहे. आपण अंतरंगात जाऊ शकत नाही; परंतु भगवंत अंतरस्थ असल्यामुळे तो नियंत्रण ठेवू शकतो. तो सर्वत्र असून प्रभावशील नियोजक असतो. त्याचे नामस्मरण, भजन, क्षमायाचना आणि शरणागती … Read more

काम करतांना क्षमता आणि नियोजन दोघांनाही महत्त्व असणे

‘एक काम पूर्ण करण्यासाठी समजा एक घंटा लागतो. एकाने ते काम एका घंट्यात केले, तर दुसर्‍याने ते काम इकडे तिकडे फिरून विलंबाने केले. यात दोघांमध्ये काय भेद आहे ? हे ज्याच्या त्याच्या क्षमतेप्रमाणे असते. परात्पर गुरु डॉक्टर हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे प्रयत्न खूप लवकर करत आहेत. बाकीच्यांना इतकी वर्षे झाली, तरीही अजून जमले नाही. यावरून दिसून … Read more

नामस्मरणाद्वारे मिळणाऱ्या शक्तीचे सामर्थ्य

१. आपण आपल्या इच्छाशक्तीद्वारे कार्य करत असतो. ती शक्ती अतिशय अल्प असल्याने कार्यासाठी आपल्याला समर्थ करत नाही. यासाठी भगवंताच्या अनुसंधानात राहून नामस्मरण केल्यास भगवंताच्या शक्तीद्वारे ते कार्य सहज सुलभ फलद्रूप होऊन आनंददायी होते. २. नामस्मरणाद्वारेच जिवातील शक्ती ईश्‍वरी शक्तीने भारीत होते. अशी ईश्‍वरी शक्तीच आपले कार्य यशस्वी करते. ३. नामस्मरणामुळे भगवंताशी कायम अनुसंधानात रहात असल्यामुळे … Read more