बुद्धीप्रामाण्यवादी आणि अंधश्रद्धा !

‘जन्मांधाने ‘दृष्टी, दिसणे असे काही आहे’, असे मानणे ही अंधश्रद्धा आहे’, असे म्हणावे, तसे बुद्धीप्रामाण्यवादी ‘सूक्ष्म दृष्टी असे काही आहे’, असे मानणे, ही अंधश्रद्धा आहे’, असे म्हणतात.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

सर्व गोष्टींचा कर्ता-करविता असलेल्या देवाचे अस्तित्व नाकारणारे बुद्धीप्रामाण्यवादी !

‘कर्त्याने बनवलेली गोष्ट कर्त्यापेक्षा कधीच श्रेष्ठ असू शकत नाही, उदा. सुताराने बनवलेली आसंदी (खुर्ची) सुतारापेक्षा कधीच श्रेष्ठ असू शकत नाही. असे असतांना देवाने बनवलेले काही मानव मात्र सर्व गोष्टींचा कर्ता-करविता असलेल्या देवालाच क्षुल्लक समजतात !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

अहंकारी बुद्धीप्रामाण्यवादी !

‘बुद्धीप्रामाण्यवाद्यांना ‘मला सर्व कळते’, असा अहंकार असतो. त्यामुळे काही जाणून घ्यायची जिज्ञासा नसल्याने बुद्धीपलीकडील अध्यात्मशास्त्र त्यांना मुळीच ज्ञात नसते आणि तरीही ते अध्यात्मातील अधिकारी संतांवर टीका करतात !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

विज्ञानाच्या तुलनेत अध्यात्माचे अद्वितीयत्व !

‘विज्ञानासारखे बुद्धीगम्य शिक्षण ‘जीवन सुखाने कसे जगायचे’, हे शिकवण्याचा प्रयत्न करते, तर अध्यात्म ‘जीवन आनंदाने कसे जगायचे आणि जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून कसे सुटायचे’, हे शिकवते.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘घरच्याला किंमत नसते’, ही म्हण सार्थ करणारे भारतातील हिंदू !

‘जगभरचे जिज्ञासू चिरंतन आनंदप्राप्तीसाठी अध्यात्म शिकायला जगातील इतर कोणत्याही देशात न जाता भारतात येतात, तर भारतीय केवळ सुखप्राप्तीसाठी अमेरिका, इंग्लंड इत्यादी देशांत जातात !’ – सच्चिदानंद परब्रह्म (डॉ.) आठवले

रज-तमाचे प्रदूषण हे सर्व प्रदूषणांचे मूळ !

‘ध्वनीप्रदूषण, जलप्रदूषण, वायूप्रदूषण इत्यादींसंदर्भात नेहमी बातम्या येतात; पण त्यांचे मूळ असलेल्या रज-तमाच्या प्रदूषणाकडे मात्र धर्मशिक्षणाच्या अभावी कुणाचेच लक्ष जात नाही !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

भारताची शोकांतिका !

‘भ्रष्टाचार उघडकीस आणणारे प्रशासकीय अधिकारी किंवा कर्मचारी दाखवा आणि १ लाख रुपये घ्या’, असे उद्घोषित केले, तरी कुणाला ते पारितोषिक कधी मिळेल का ?’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

बुद्धीप्रामाण्यवाद्यांना आणि विज्ञाननिष्ठांना अतिशय मर्यादित ज्ञान असण्याची कारणे

‘बुद्धीप्रामाण्यवाद्यांत आणि विज्ञाननिष्ठांत ‘मला कळते, तेच सत्य’, असा अहंकार असतो आणि नवीन जाणून घेण्याची जिज्ञासा नसते. त्यामुळे त्यांना असलेले ज्ञान अतिशय मर्यादित असते. त्यांना अनंताचे ज्ञान कधीच मिळत नाही. याउलट ऋषींना अहंकार नसल्याने आणि जिज्ञासा असल्याने त्यांची ज्ञानकक्षा वाढत वाढत जाते आणि ते अनंत कोटी ब्रह्मांडांचेही अनंत ज्ञान सांगू शकतात !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. … Read more

पाण्यात आणि मनात साम्य काय ?

पाणी आणि मन हे दोन्ही जर गढूळ असतील, तर दोन्ही आयुष्य संपवू शकतात. दोन्ही जर उथळ असतील, तर धोक्याच्या पातळी कडेच ओढतात. दोन्ही स्वच्छ असतील, तर जातील तिथे आनंदवनच फुलवतात; पण पाण्यात आणि मनात मुख्य भेद तो काय ? पाण्याला बांध घातला, तर पाणी ‘संथ’ अन् मनाला बांध घातला, तर माणूस ‘संत’ होतो. – अज्ञात

विज्ञानाच्या तुलनेत अध्यात्माचे सर्वश्रेष्ठत्व !

‘जगातील वैद्य, अभियंता, अधिवक्ता, वास्तूविशारद इत्यादी विविध विषयांतील तज्ञ, तसेच गणित, भूगोल, इतिहास, विज्ञान इत्यादी एकही विषय दुसर्‍या विषयासंदर्भात एक वाक्य सांगू शकत नाहीत. फक्त अध्यात्म हा एकच विषय विश्‍वातील सर्व विषयांशी संबंधित त्रिगुण, पंचमहाभूते, तसेच शक्ती, भाव, चैतन्य, आनंद आणि शांती इत्यादींच्या संदर्भात परिपूर्ण माहिती देऊ शकतो.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले