जनतेने नशेला बळी पडू नये, यासाठीचा मूलगामी उपाय !
‘स्वातंत्र्यापासून आतापर्यंतच्या शासनांनी राष्ट्र आणि धर्म यांच्या भक्तीची गोडी निर्माण केली असती, तर कुणी दारू अन् सिगारेट यांच्या नशेला बळी पडला नसता !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘स्वातंत्र्यापासून आतापर्यंतच्या शासनांनी राष्ट्र आणि धर्म यांच्या भक्तीची गोडी निर्माण केली असती, तर कुणी दारू अन् सिगारेट यांच्या नशेला बळी पडला नसता !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘बुद्धीप्रामाण्यवाद्यांना कधी विश्वबुद्धीतून ज्ञान मिळते का ? ‘विश्वबुद्धी’ असे काहीतरी आहे आणि विश्वबुद्धीतून ज्ञान मिळते, हे तरी त्यांना ठाऊक आहे का ? ठाऊक नसल्यानेच ते बालवयातील मुले बडबडतात, तसे बडबडतात !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘अध्यात्मात भूतकाळ आणि भविष्यकाळ यांचे मूल्य शून्य आहे. त्यामुळे भूत-भविष्याच्या विचारांत न अडकता वर्तमानकाळाचे सोने करा !’ – श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ (२८.१.२०२२)
‘प्रदूषणासंदर्भात सगळीकडे गाजावाजा करून जो उपाय केला जातो, तो रोगाच्या मुळावर उपाय न करता वरवरचे उपाय करण्यासारखे आहे. प्रदूषणाला कारणीभूत असलेल्या रज-तमप्रधान मनाला आणि बुद्धीला साधनेने सात्त्विक न बनवता, म्हणजे मुळावर उपाय न करता केलेले वरवरचे उपाय हास्यास्पद आहेत. क्षयरोग झालेल्याला क्षयरोगाची औषधे न देता केवळ त्याला येणार्या खोकल्यासाठी औषध देण्यासारखे आहे !’ – सच्चिदानंद … Read more
‘व्यावहारिक जीवनात डोळ्यांच्या डॉक्टरांना डोळ्यांचा आजार होतो. हृदयरोगतज्ञ डॉक्टरांना हृदयाचा विकार होतो. मनोविकारतज्ञांना मानसिक विकार झाल्याचेही आढळते; परंतु अध्यात्मात संतांना इतरांचे आध्यात्मिक त्रास दूर केल्यावर आध्यात्मिक त्रास होत नाहीत. काही संतांना शारीरिक त्रास होत असले, तरी ते देहप्रारब्धानुसार असतात. त्याचा संतांवर परिणाम होत नाही !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘पूर्वी मला वाटायचे, ‘झाडे, डोंगर इत्यादी एकाच जागी उभे असतात. त्यांना त्याचा कंटाळा येत नसेल का ?’ याचे उत्तर माझ्या आजारपणाने मला दिले. गेली ७ वर्षे मी कुठेही बाहेर जाऊ शकत नाही, तरी केवळ खिडकीतून दिसणार्या दृश्याला पाहून मी आनंदी आहे. असेही म्हणता येईल की, ‘परिस्थितीबद्दल तक्रार न करता आहे ती स्थिती स्वीकारून आनंदी कसे … Read more
‘आद्य शंकराचार्य आणि समर्थ रामदासस्वामी यांच्या वेळी बुद्धीप्रामाण्यवादी नव्हते, हे बरे. नाहीतर त्यांनी मुलांना घरदार सोडून आश्रमात जायला साधना करायला विरोध केला असता आणि जग त्यांच्या अप्रतिम ज्ञानाला कायमचे मुकले असते.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘जन्मांधाने ‘दृष्टी, दिसणे असे काही आहे’, असे मानणे ही अंधश्रद्धा आहे’, असे म्हणावे, तसे बुद्धीप्रामाण्यवादी ‘सूक्ष्म दृष्टी असे काही आहे’, असे मानणे, ही अंधश्रद्धा आहे’, असे म्हणतात.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘कर्त्याने बनवलेली गोष्ट कर्त्यापेक्षा कधीच श्रेष्ठ असू शकत नाही, उदा. सुताराने बनवलेली आसंदी (खुर्ची) सुतारापेक्षा कधीच श्रेष्ठ असू शकत नाही. असे असतांना देवाने बनवलेले काही मानव मात्र सर्व गोष्टींचा कर्ता-करविता असलेल्या देवालाच क्षुल्लक समजतात !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘बुद्धीप्रामाण्यवाद्यांना ‘मला सर्व कळते’, असा अहंकार असतो. त्यामुळे काही जाणून घ्यायची जिज्ञासा नसल्याने बुद्धीपलीकडील अध्यात्मशास्त्र त्यांना मुळीच ज्ञात नसते आणि तरीही ते अध्यात्मातील अधिकारी संतांवर टीका करतात !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले